By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 14 Dec 2024 Paper 2 Marathi Language Question Paper with Answer Key

You are reading the question paper with answers. This is not the timed test: no clock is running and nothing is being scored.

Go to the timed test →

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
श्रावण वाघ नुकताच वयात यायला लागला होता. त्याच्या बाजूला दुसऱ्या पिंजऱ्यात एक वाघीण होती. ती वाघीण माजावर आली आणि ती श्रावणच्या पिंजऱ्याजवळ गेली. वाघिणीचं असं वागणं त्याला समजलं नाही. त्याला तिचा राग आला आणि काही कळायच्या आतच त्यानं तिची शेपटी जोरात पकडून तोडून टाकली. त्यांच्या आवाजांनी प्राणीसंग्रहालय भयचकीत झालं. दुसऱ्या दिवशी त्याची बातमी झाली. मी त्यावेळी हत्तींच्या अभ्यासाबरोबर पूर्णवेळ पत्रकारिता करत होतो. घडलेला प्रकार अंगावर काटा आणणारा असला तरीसुद्धा ज्या धीरानं तिथल्या सगळ्यांनी त्या दिवशी काम केलं त्याला तोड नव्हती. डॉक्टरांनी वाघिणीला उपचाराकरता ताबडतोब दुसऱ्या पिंजऱ्यात हलवलं. दुर्दैवानं तिचीही शेपटी कापायला लागली आणि मला पुन्हा बांडी आठवली. एरवी श्रावण खरोखरच चांगला वाघ होता. अगदी गुणी बाळ! पण त्याच्या अशा वागण्यानं सगळे चकित झाले. तिथल्या डॉक्टरांनी मला विचारलं, “अरे तू हत्तींशी बोलतोस. मग आमच्या श्रावणला शांत व्हायला मदत करशील का?” मी म्हणालो, “अहो, आमचा हत्ती शाकाहारी आहे!” पण डॉक्टरांचा माझ्यावर विश्वास होता. जसा एखादा कसलेला शिक्षक आपला विद्यार्थी किती पाण्यात आहे हे सहज ओळखतो तसं त्यांनी कदाचित मला ओळखलं होतं. माझा हत्तींचा अभ्यास चालू असताना त्रिवेंद्रम प्राणीसंग्रहालयातल्या ऐश्वर्या सिंहिणीला पिल्लू झालं होतं आणि तिनं ते कुणाला दिसू नये अशा पद्धतीनं लपवून ठेवलं होतं. तिनं पिल्लू दाखवावं म्हणून डॉ. जेकब यांच्या अनुपस्थितीत तेव्हाच्या संचालकांनी माझी मदत घेतली होती. जेव्हा मी पूर्णवेळ हत्तींसंबंधी काम करण्यासाठी नोकरी सोडली, तेव्हा डॉक्टरांनी मला प्राणीसंग्रहालयात इंटर्नशिप करण्याबाबत मार्गदर्शन केलं. माझा हत्तींवरचा रीसर्च पेपर प्रसिद्ध झाल्यामुळे प्राणीसंग्रहालयाचे संचालक के. गंगाधरन यांनी मला ‘नेक्स्ट लेव्हल कम्युनिकेशन’ साठी इंटर्नशिप दिली. आता मी एकाच श्रावणबरोबर नाही, तर सात वाघांबरोबर काम करणार होतो. जोडीला नऊ बिबटे आणि पाच सिंहसुद्धा होते. त्यातला श्रावण आणि जॉर्ज या दोन वाघांबरोबरचा अभ्यास जास्त महत्त्वाचा होता. त्या संपूर्ण काळात वाघांची मानसिकता, संभाषणाचे प्रकार, घडणाऱ्या घटनांना त्यांची येणारी प्रतिक्रिया, अशा सगळ्या बाजूंनी अभ्यास करायचा होता. माझे तासंतास आता वाघाच्या पिंजऱ्याबाहेर जायला लागले. त्यांच्या हालचाली टिपणं, रेकॉर्डिंग करणं, डॉक्टरांना वेळ मिळेल तेव्हा त्यांना ते रेकॉर्डिंग दाखवून त्यावर मार्गदर्शन घेणं, असा अभ्यास जोरात चालू होता. मी वाघांचे पिंजरे असलेल्या परिसरात गेल्यावर श्रावणचे हुंकार (मोठ्या आवाजातले) ऐकायला यायचे. तेच हुंकार इतर वाघांनी वापरायला सुरुवात केली त्या वेळी लक्षात आलं, की वाघांनी मला स्वीकारलं आहे. एके दिवशी दुपारी मी श्रावणच्या पिंजऱ्याबाहेर बसून लिखाण करत होतो. तेव्हा श्रावण जवळ येऊन पिंजऱ्याला अंग घासू लागला. नंतर पिंजऱ्याला अगदी चिकटून बसला. जणू काही त्याला मला टेकून बसायचं होतं. पिंजऱ्याच्या जाळीतून मी त्याला जेमतेम स्पर्श केला आणि मांजरीनं जसं वळून बघावं तसं त्यानं वळून बघितलं. त्याच्या वागण्यात कुठेही राग दिसत नव्हता. त्या देहबोलीमध्ये ‘अजून गोंजारून हवं आहे’ असं सांगणं होतं.

Q91

वाघांनी आपल्याला स्वीकारले हे लेखकाच्या कशावरून लक्षात आले?

  1. (1) हालचाली टिपल्यामुळे
  2. (2) वाघांचे हुंकार ऐकल्याने
  3. (3) पिंजऱ्याबाहेर बसून लेखन केल्यामुळे
  4. (4) रेकॉर्डिंग ऐकवल्यामुळे
See answer and solution
Q92

‘नऊ बिबटे’ हे कोणते संख्याविशेषण आहे?

  1. (1) क्रमवाचक
  2. (2) अपूर्णांकवाचक
  3. (3) पूर्णांकवाचक
  4. (4) साकल्यवाचक
See answer and solution
Q93

ऐश्वर्या हे कोणाचे नाव आहे?

  1. (1) वाघाचे
  2. (2) सिंहिणीचे
  3. (3) संचालकाचे
  4. (4) डॉक्टरांचे
See answer and solution
Q94

लेखक काम करीत असलेल्या सिंहांची संख्या किती होती?

  1. (1) दोन
  2. (2) नऊ
  3. (3) सात
  4. (4) पाच
See answer and solution
Q95

‘गोंजारणे’ या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा.

  1. (1) स्पर्श करणे
  2. (2) विश्वासात घेणे
  3. (3) जवळ करणे
  4. (4) माया लावणे
See answer and solution
Q96

जॉर्ज कोण होता?

  1. (1) मांजर
  2. (2) वाघ
  3. (3) बिबट्या
  4. (4) हत्ती
See answer and solution
Q97

‘श्रावण वाघ’ हे कोणते नाम आहे?

  1. (1) भाववाचकनाम
  2. (2) विशेषनाम
  3. (3) समुदायवाचकनाम
  4. (4) सामान्यनाम
See answer and solution
Q98

‘चांगला वाघ’ यातील अधोरेखित काय आहे?

  1. (1) क्रियापद
  2. (2) नाम
  3. (3) सर्वनाम
  4. (4) विशेषण
See answer and solution
Q99

प्राणीसंग्रहालय भयचकीत का झाले?

  1. (1) वाघिणीचे वागणे न समजल्यामुळे
  2. (2) श्रावणने वाघिणीची शेपटी तोडल्यामुळे
  3. (3) हत्तीचा अभ्यास करीत असल्यामुळे
  4. (4) श्रावणला राग आल्यामुळे
See answer and solution

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्याय निवडा.
खाली रांगोळी पुसट
तुळशीचें वृंदावन
वाढणाऱ्या काळोखाची
मुकी भुकी दटावण,

आंतबाहेर दाटला
कडूलिंबाचा सुवास
क्षण अनावर झाला
घुसमटूनिया श्वास

..... भळभळणारें रक्त
खोल रुतलेली कांच
माझ्या हातांत बांगड्या
होत्या सहा किंवा पाच?

ओसरल्या रक्तामध्यें
कांपे जुंनी आठवण
आहे मनगटावर
एक पुसटसा वण.

Q100

‘सहा किंवा पाच’ यातील अधोरेखित काय आहे?

  1. (1) गुणविशेषण
  2. (2) शब्दयोगी अव्यय
  3. (3) उभयान्वयी अव्यय
  4. (4) संख्याविशेषण
See answer and solution
Q101

‘तुळस’ हे काय आहे?

  1. (1) समुहवाचकनाम
  2. (2) विशेषनाम
  3. (3) सामान्यनाम
  4. (4) भाववाचकनाम
See answer and solution
Q102

रक्त कशामुळे वाहते आहे?

  1. (1) काळोख दाटल्यामुळे
  2. (2) काच रुतल्यामुळे
  3. (3) बांगडी फुटल्यामुळे
  4. (4) श्वास घुसमटल्यामुळे
See answer and solution
Q103

नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले आहे?

  1. (1) हातातील बांगड्यांमुळे
  2. (2) कडूलिंबाच्या सुवासामुळे
  3. (3) भळभळणाऱ्या रक्तामुळे
  4. (4) श्वास घुसमटल्यामुळे
See answer and solution
Q104

अनावर होणे म्हणजे __________.

  1. (1) आतबाहेर होणे
  2. (2) अनियंत्रित होणे
  3. (3) आवरून घेणे
  4. (4) अबाधित राहणे
See answer and solution
Q105

‘काळोख’ हे काय आहे?

  1. (1) विशेषण
  2. (2) कर्म
  3. (3) कर्ता
  4. (4) क्रियापद
See answer and solution
Q106

‘साधनांची अधिकृतता’ म्हणजे __________.

  1. (1) विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरून आणलेली साधन/सामग्री
  2. (2) शिक्षिकेने तिच्या वर्गासाठी लिहिलेली साधन/सामग्री
  3. (3) अधिकारी वर्गाकडून साधन/सामग्री लिहिली जाणे, विकसित होणे
  4. (4) वास्तव जीवन संदर्भात लिहिली गेलेली, विकसित झालेली साधन/सामग्री
See answer and solution
Q107

इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी अपर्णा, हिला समजते की ऐकण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक ध्वनी, शब्द, नंतर वाक्य यांचा व्याख्यान किंवा ध्वनिफितीतील अर्थ लावण्यात अंतर्भाव असतो. ऐकणे शिकणे यासाठी ती कोणत्या पद्धतीवर विश्वास ठेवते?

  1. (1) अधोगामी किंवा ऊर्ध्वगामी कोणतीही नाही
  2. (2) अधोगामी–पद्धती (Top-down)
  3. (3) ऊर्ध्वगामी–पद्धती (Bottom-up)
  4. (4) अधोगामी आणि ऊर्ध्वगामी दोन्ही पद्धती
See answer and solution
Q108

भाषा शिक्षणात ‘सर्वांगीण क्षमता’ (Systemic Competence) म्हणजे __________

  1. (1) प्रत्येक माणसाकडे अनेक भाषांची व्यवस्था असते असे समजणे.
  2. (2) भाषा एकव्यवस्था म्हणून कार्य करते, असे समजणे आणि वापरणे.
  3. (3) भाषेची एक व्याकरण व्यवस्था असते, असे समजणे आणि वापरणे.
  4. (4) प्रत्येक भाषेची एकसारखी संरचनात्मक व्यवस्था असते असे समजणे.
See answer and solution
Q109

पुढे एक मजकूर किंवा विधान दिले आहे. सदर मजकूर किंवा विधान कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे?
“भारतीय राज्य घटना प्रत्येक व्यक्तीला समान मानते. याचा अर्थ देशातील प्रत्येक माणूस, म्हणजे स्त्री–पुरुष, सर्व जातीची माणसे, धर्माची माणसे, आदिवासी आणि सर्व शैक्षणिक व आर्थिक पार्श्वभूमीची माणसे एक आहेत. याचा अर्थ असा नाही की विषमता नाहीशी होणार, ती होऊ शकणार नाही. परंतु भारतीय लोकशाहीत सर्व माणसांसाठी समानतेचा सिद्धांत हा मान्य केला गेला आहे.”

  1. (1) शास्त्रीय नोंद
  2. (2) राजकीय नोंद
  3. (3) समाजविज्ञान नोंद
  4. (4) कायदेशीर नोंद
See answer and solution
Q110

इयत्ता सहावीची शिक्षिका, विद्यार्थ्यांनी पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी त्याची पूर्व तयारी करण्यासाठी पाठातील मजकुराचा त्यांच्या पूर्वज्ञानाशी आणि अनुभवाशी संबंध लावते. ती कथा/मजकूर प्रत्यक्षात शिकवण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहण्यास सांगते : तिला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे?

  1. (1) त्यांना चित्रे समजून घ्यायला लावणे.
  2. (2) चित्रांच्या माध्यमातून कथेची कल्पना करणे.
  3. (3) चित्रांचे कौतुक करणे.
  4. (4) कथेच्याबाबत अनुमान लावणे.
See answer and solution
Q111

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगांचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे __________.

  1. (1) नैदानिक चाचणी (Diagnostic Test)
  2. (2) पोर्टफोलियो (Portfolio)
  3. (3) सातत्यपूर्ण विस्तृत मूल्यमापन (Continuous Comprehensive Assessment)
  4. (4) नैपुण्य मूल्यमापन (Proficiency Assessment)
See answer and solution
Q112

पुढीलपैकी कोणते ग्रहण कौशल्य आहे?

  1. (1) ऐकणे व वाचणे
  2. (2) ऐकणे व लिहिणे
  3. (3) वाचणे व बोलणे
  4. (4) बोलणे व लिहिणे
See answer and solution
Q113

अनेक भारतीय परदेशात व्यवसायानिमित्त/रोजगारासाठी जातात नि तिथली भाषा शिकतात. या प्रेरणेला काय म्हणता येईल?

  1. (1) नैमित्तिक किंवा एकात्मता यापैकी कोणतीही प्रेरणा नाही
  2. (2) एकात्मता आणि नैमित्तिकता या दोन्ही प्रेरणा
  3. (3) एकात्मता प्रेरणा
  4. (4) नैमित्तिक प्रेरणा
See answer and solution
Q114

पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही?

  1. (1) हिंदी
  2. (2) तामिळ
  3. (3) संस्कृत
  4. (4) तेलुगु
See answer and solution
Q115

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार विदेशी भाषा अध्ययन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही?

  1. (1) एक अतिरिक्त भाषा म्हणून फ्रेंच भाषा सुचविण्यात आलेली आहे.
  2. (2) माध्यमिक पातळीवर विदेशी भाषा एक अतिरिक्त पर्याय म्हणून अभ्यासणे.
  3. (3) त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव.
  4. (4) विदेशी भाषेचा त्रिभाषा धोरणात एक भाषा म्हणून अंतर्भाव नसणे.
See answer and solution
Q116

पुढीलपैकी कशाचा संबंध ‘भाषेबद्दलचे ज्ञान’ याच्याशी आहे?

  1. (1) नीतीगत क्षमता (Strategic Competence)
  2. (2) निर्देशक ज्ञान (Declarative Knowledge)
  3. (3) प्रक्रियाधिष्ठित ज्ञान (Procedural Knowledge)
  4. (4) व्याकरणिक ज्ञान (Grammatical Knowledge)
See answer and solution
Q117

इयत्ता सहावीची शिक्षिका बोलण्याच्या उपक्रमासाठी खालील कृती विकसित करते.
“वाळवंट आणि तिथल्या वातावरणावर पाच वाक्ये बोला”. ही कृती योग्य आहे किंवा नाही? हे ठरविण्यासाठी पुढीलपैकी योग्य कारण असलेले विधान निवडा.

  1. (1) ही योग्य कृती नाही कारण वाळवंट आणि तिथले वातावरण यावर बोलण्यासाठी अपेक्षित माहिती नाही.
  2. (2) ही एक योग्य कृती आहे, कारण विद्यार्थ्यांनी भूगोलाच्या वर्गात वाळवंटाचा अभ्यास केला असणार, म्हणजे त्यांना यावर बोलता येईल.
  3. (3) ही एक योग्य कृती आहे, कारण यातून विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर बोलता येईल, जसे वाळवंट.
  4. (4) ही योग्य कृती नाही कारण काही विद्यार्थ्यांना वाळवंटाबद्दल माहिती नसणार.
See answer and solution
Q118

भाषेची बोली या संदर्भातले पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

  1. (1) काही वेळा विविध सामाजिक गट एकाच भाषेच्या विविध बोली बोलतात.
  2. (2) भाषेच्या बोली परिसरानुरुप बदलतात.
  3. (3) एका भाषेच्या विविध बोली बोलणारी माणसे दुसऱ्या बोलीतला माणूस काय बोलतो ते समजतात.
  4. (4) बोली ही व्यापक श्रेणीत असते आणि भाषा ही लहान श्रेणीत असते.
See answer and solution
Q119

पुढीलपैकी कोणते कार्य समाकलित (integrated) शिक्षण कौशल्याला उत्तेजन देते?

  1. (1) लेख लिहिणे
  2. (2) भूमिकाभिनय
  3. (3) नियत कार्य (Assignment)
  4. (4) प्रकल्प कार्य
See answer and solution
Q120

ससंदर्भ व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात पुढील धोरणाला काय म्हणता येईल?
‘भाषिक घटकांचा ससंदर्भ परिचय, विद्यार्थ्यांना भाषा घटकांकडे लक्ष देण्यास सांगणे, वास्तव जीवन संदर्भात त्यांचा वापर करण्यास सक्षम करणे आणि भाषा घटकांना ओळखण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे’.

  1. (1) जाणीव उन्नत करणे (Consciousness Raising)
  2. (2) मनोबंध तयार करणे (Schema)
  3. (3) निगमन पद्धती (Deductive Method)
  4. (4) शोध पद्धती (Discovery Method)
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्याय निवडा.
छोटेसे घर, त्या भोवती दाटीवाटीने लावलेला बगीचा. त्यातील अनेकरंगी फुले आम्हाला वेड लावत. आजूबाजूचा परिसरही बंगले व बगीचा यांनी भरलेला. मग काय विचारायलाच नको! हवी तेवढी फुले उपलब्ध. श्रावणात तर लाखोली वाहण्यासाठी आम्ही मुले सकाळपासूनच त्या झाडाखाली. ज्यांचे व्रत असेल त्याला ती गोळा करून देणे, हे आमचे कामच! कोणाची मंगळागौर असो, की हरतालिका असो. आम्ही मैत्रिणी फुलझाडे धुंडाळत फिरत असू. गच्च भरलेली जास्वंदीची झाडे, त्यांची भरीव एकेरी लाल गुलाबी फुले, गोकर्णीची कानाच्या आकाराची पांढरी, निळी फुले.
मधूनच छोट्या वेलीला आलेली गणेश फुले, काय तोडू नी काय नको, असे होऊन जात असे. मंगळागौर कोण्या नव्या नवरीची, पण उत्साह आमचाच जास्त. पहिलटकरणीचे डोहाळजेवण व झुला सजवायलाही आम्ही मैत्रिणी हजर. पाने–फुले यांच्या महिरपीने झोका गच्च भरून सजविला जाई. हरतालिकेला धोतऱ्याची झाडे, रुईची जांभळी फुले आणण्यासाठी पानांची माळ लागे. झाडा–झुडपांतून ती पाने शोधावी लागत. तेही संशोधन आम्ही विनातक्रार कित्येकदा केले आहे.
शाळेत जाताना बुचाची फुले गोळा करावी, त्याची गुंफून वेणी करावी व लगेच केसात माळावी, हा नेहमीचाच उद्योग. बुचाचे झाड ताडासारखे उंच. त्यामुळे ती फुले तोडणे शक्यच नसायचे. म्हणून वाऱ्याच्या झोताबरोबरच फुले पडतील या आशेने अर्धा–अर्धा तास आम्ही झाडाखालीच घालवत असू. हे सारे महाविद्यालयात गेल्यावर तर कधीही फुलांशिवाय माझे पान हालत नसे. रोजच गजरा. कधी अबोली, कधी जाई–जुई, तर कधी मोगरा. अगदी जांभळी, पांढरी, सोनेरी, कोरांटीची फुलेसुद्धा माझ्या केसावर फुलून येई. दसरा–दिवाळीच्या वेळी तर बागा अनेक तऱ्हेच्या शेवंतीने बहरून यायच्या. हा मोसम म्हणजे फुलांची पर्वणीच! छोटी बट शेवंती, गोंडा शेवंती, सोनेरी, पांढरी, पिवळी, अगदी गर्द लाल शेवंतीही या ऋतुत फुलून यायची आणि हिरव्यागार बागेला झेंडूची सोनपिवळी किनार नजर लागावी इतकी सुंदर दिसत असे. या सणांच्या दिवसांत अंगणात रांगोळीदेखील फुलांचीच असे.
रात्री जेवणानंतर शतपावलीची सवय लागली ती फुलांच्या ओढीनेच. जिवाला वेड लावणारे ते रातराणी, मधुकामिनी, मधुमालती, जाई–जुईचा मादक वास मन धुंद करून टाकत. अन् अवचित ती सुगंधाची खाण शोधण्यासाठी मन सैरभैर होई. खरे तर रातराणीचा जीव किती लहान, अगदी नखाएवढा! पण, सारा आसमंत भारून टाकण्याचे सामर्थ्य त्या चिमुकल्या फुलांमध्ये एकवटलेले असते. रात्रीची शोभा वाढविणारे जाई–जुईचे, सायलीचे नाजूक घोस अंधारातही इतरांना जीव तोडून सुगंध देत असतात. निसर्गाने दिलेले दान इतरांना मुक्तपणे वाटत असतात. कधी कधी कुंपणावर विविधरंगी बोगनवेलेही विराजमान झालेल्या दिसत; पण मला मात्र ते कागदी फूल कधीच आवडले नाही.
मला फुले आवडतात – अगदी फळांचीसुद्धा. पेरूची पांढरी पारदर्शक फुले, डाळिंबाची केशरी फुले, वांग्याची जांभळी, तर भेंडीची काहीशी लालसर मोठी फुले मी मन लावून बघते. त्यातील अनोखे लावण्य भुरळ घालते. बालकवींनी नाही का अगदी क्षुद्र वाटणाऱ्या गवतफुलाला आपल्या कवितेने अजरामर करून टाकले.
सृष्टीचे सारे सौंदर्य परमेश्वराने फुलांत उधळले आहे. नाजूक रंगरूप, अनोखे आकार, सुवास या सर्वांचे लेणे लेवून फुले जन्माला येतात. अगदी परमेश्वराच्या अंगाखांद्यावर खेळण्याचे भाग्यही त्यांनाच लाभले; पण ही फुले मात्र क्षणभंगुरतेचा शाप घेऊन सृष्टीवर येतात व मानवाला त्याच्या जन्मापासून तर अगदी मृत्यूपर्यंत साथ देतात. झाडावरून तोडले जाताना तोडणाऱ्याची इच्छा पुरवितात. न तोडता झाडावरच काही फुले राहतात, ती बिचारी आपला कार्यकाल संपताच निमुटपणे मातीत मिसळून जातात. अशा फुलांच्या निकट राहण्याचे भाग्य आपल्याला मिळाले. आता नवीन पिढी संकुचित घरात, टीचभर जागेत हा आनंद मिळवू शकणार नाहीत.

Q121

डाळिंबाची फुले कोणत्या रंगाची असतात?

  1. (1) लालसर
  2. (2) जांभळी
  3. (3) केशरी
  4. (4) पांढरी
See answer and solution
Q122

पुढीलपैकी कोणत्या फुलांचा गजरा लेखिकेने माळल्याचा उल्लेख येत नाही?

  1. (1) अबोली
  2. (2) चाफा
  3. (3) मोगरा
  4. (4) कोरांटी
See answer and solution
Q123

‘नाजूक रंगरूप’ यातील अधोरेखित शब्द काय आहे?

  1. (1) गुणविशेषण
  2. (2) क्रमविशेषण
  3. (3) क्रियाविशेषण
  4. (4) गणनाविशेषण
See answer and solution
Q124

‘शेवंतीही या ऋतूत फुलून यायची आणि हिरव्यागार बागेला झेंडूची सोनपिवळी किनार’ यातील अधोरेखित काय आहे?

  1. (1) केवलप्रयोगी अव्यय
  2. (2) शब्दयोगी अव्यय
  3. (3) उभयान्वयी अव्यय
  4. (4) क्रियाविशेषण अव्यय
See answer and solution
Q125

सृष्टीचे सौंदर्य लेखिकेला कशात दिसते?

  1. (1) फुलांच्या क्षणभंगूरतेत
  2. (2) फुलांच्या नाजूकपणात
  3. (3) फुलांच्या उधळणीत
  4. (4) फुलांवरील कवितेत
See answer and solution
Q126

लेखिकेला न आवडणारे फुल कोणते?

  1. (1) गोकर्णी
  2. (2) पांढरी कोरांटी
  3. (3) बोगनवेल
  4. (4) गुलबक्षी
See answer and solution
Q127

फुलांच्या बाबतीत लेखिकेला कशामुळे दुःख वाटते?

  1. (1) फुलांचे नाजूकपण
  2. (2) फुलांचे अल्पायुष्य
  3. (3) फुलांचे आकार
  4. (4) फुलांचे रंग
See answer and solution
Q128

‘मला फुले आवडतात’ यातील अधोरेखित काय आहे?

  1. (1) क्रियापद
  2. (2) कर्म
  3. (3) कर्ता
  4. (4) विशेषण
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्याय निवडा.
पावसाळ्यात माझा सगळ्यात आवडता उद्योग म्हणजे अंगावर पांघरूण घेऊन, डोळे मिटून कौलारावर वाजणारा पाऊस ऐकणे. खूप मजा येई असा पाऊस ऐकताना. कौलांवर वाजणाऱ्या जलधारा, त्यातून आत उडणारे तुषार, सगळीकडे कुंद वातावरण आणि तोंडावर पांघरूण घेऊन, कानात प्राण आणून पाऊस ऐकणारी मी. पण हा आनंद फार वेळ घेता येत नसे. कारण सकाळी सव्वा नऊ–साडे नऊ वाजता वडील शाळेत जायला निघत तेव्हा आईचा सगळा स्वयंपाक झालेला असे. आमची न्याहारी आणि वडिलांचे जेवण बरोबरच झाले पाहिजे, हा नियमच होता. त्यामुळे पावसाचं गाणं अर्धवट सोडून उठावचं लागे. पावसाच्या आणि थंडीच्या दिवसात आमची न्याहारी म्हणजे एक मज्जाच होती. माझी आई बाजरीच्या भाकरी करी. त्या दुरडीत न ठेवता मोठ्या परातीत थोड्या पसरून ठेवी. त्यातली वाफ जाऊन त्या थंड झाल्या की माझे वडील त्या भाकरी परातीत बारीक कुस्कुरीत. त्यात ओंजळभर साजूक तूप घालीत. बारीक फोडलेला गूळ घालीत. त्या काल्याचा एक एक भला मोठा लाडू बनवीत आणि आम्हाला प्रत्येकाला देत. माझ्या वडिलांच्या भारदस्त हातांनी बनविलेला तो गुळ–तुपाचा लाडू संपता संपत नसे. पण तो संपवावाच लागे. कारण आमचं खाणं झाल्याशिवाय वडील तिथून उठत नसत.
आमची न्याहारी आणि वडिलांचं जेवण झालं की वडील शाळेत जायला निघत. पांढरेशुभ्र, तलम असे टाटा फिनलेचे धोतर, पांढराशुभ्र नेहरू शर्ट, त्यावर बिन बाह्यांचा खादीचा कब्जा किंवा लांब हातांचा काळा कोट, डोक्यावर गांधी टोपी, पायात रबर सोल मारलेल्या कोल्हापुरी वहाणा अशा वेषात माझे वडील शाळेत निघाले की मी त्यांचं बोट पकडून त्यांच्या मोठ्या काळ्या छत्रीत रस्त्यापर्यंत जात असे. कोणी ना कोणी थांबवून वडिलांशी बोलत उभे राहत तेव्हा मी वडिलांच्या धोतराचा सोगा पकडून उभी राही. माझे वडील दूर जाऊ नयेत असे मला वाटे. ते मला म्हणत, ‘उजा! शाळेत जायचं बरं का. पळा आता.’ मग मी भिजत भिजत धावतच घरी येई.

Q129

‘सव्वा नऊ–साडे नऊ वाजता वडील शाळेत जायला निघत.’ या वाक्यातील अधोरेखित शब्द ओळखा.

  1. (1) संख्याविशेषण
  2. (2) विशेषनाम
  3. (3) सर्वनाम
  4. (4) क्रियापद
See answer and solution
Q130

‘बाजरीच्या भाकरी’ हे काय आहे?

  1. (1) भाववाचक नाम
  2. (2) विशेषनाम
  3. (3) नाम
  4. (4) सर्वनाम
See answer and solution
Q131

लेखिकेचा आवडता छंद कोणता?

  1. (1) शाळेत जाणे
  2. (2) पावसाचे तुषार उडवणे
  3. (3) वडिलांबरोबर जेवण करणे
  4. (4) कौलारांवरच्या पावसाचा आवाज ऐकणे
See answer and solution
Q132

‘पारदर्शक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

  1. (1) ऊर्जा
  2. (2) अपारदर्शक
  3. (3) वास्तवता
  4. (4) स्वच्छता
See answer and solution
Q133

‘आईचा सगळा स्वयंपाक झालेला असे.’ यातील अधोरेखित काय आहे?

  1. (1) शब्दयोगी अव्यय
  2. (2) अकर्मक क्रियापद
  3. (3) संयुक्त क्रियापद
  4. (4) सकर्मक क्रियापद
See answer and solution
Q134

‘पांढरेशुभ्र तलम असे टाटा फिनलेचे धोतर’ यातील अधोरेखित काय आहे?

  1. (1) विशेषनाम
  2. (2) विशेषण
  3. (3) कर्म
  4. (4) अव्यय
See answer and solution
Q135

‘तुषार’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

  1. (1) धारा
  2. (2) पाणी
  3. (3) बिंदू
  4. (4) फवारे
See answer and solution
Q136

“अश्विनीला ओरिया भाषा तिच्या जन्मापासून येते आणि ती इंग्रजी आणि हिंदी शिकते.” या विधानाच्या आधारे पुढीलपैकी कोणता पर्याय हा बरोबर नाही?

  1. (1) तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणे आहे.
  2. (2) तिचे ओरिया शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणे आहे.
  3. (3) तिचे हिंदी शिक्षण म्हणजे भाषा शिक्षण
  4. (4) तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा शिक्षण
See answer and solution
Q137

नैमित्तिक प्रेरणा तेंव्हा असते जेंव्हा __________

  1. (1) माणूस पुस्तक लिहिण्यासाठी भाषा शिकतो.
  2. (2) माणूस रोजगारासारख्या कारणास्तव भाषा शिकतो.
  3. (3) माणूस त्या मूळभाषक लोकांशी जवळीक साधण्यासाठी भाषा शिकतो.
  4. (4) माणूस त्या लोकांच्या सामाजिक, धार्मिक सोहळ्यांसाठी भाषा शिकतो.
See answer and solution
Q138

कृपा आणि करण हे दोघे जुळे भाऊ मणिपुरीची एक बोली वापरतात मात्र बोलताना त्यांच्यात फरक जाणवतो. बोलीभाषा बोलण्याची त्यांची वैयक्तिक शैली म्हणजे __________.

  1. (1) मणिपुरी (Manipuri)
  2. (2) आयडियोलेक्ट (Idiolect)
  3. (3) बोली (Dialect)
  4. (4) भाषण कृती (Speech Act)
See answer and solution
Q139

भारतीय राज्य घटनेमध्ये इंग्रजीला कोणता दर्जा देण्यात आला आहे?

  1. (1) संवैधानिक संस्थांची भाषा
  2. (2) कार्यालयीन भाषा
  3. (3) सहयोगी कार्यालयीन भाषा
  4. (4) विदेशी भाषा
See answer and solution
Q140

प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतंत्रपणे उणिवा आणि क्षमता जाणून घेण्यासाठी केलेली चाचणी म्हणजे __________.

  1. (1) संस्कारक्षम चाचणी (Formative test)
  2. (2) उद्दिष्ट चाचणी (Objective test)
  3. (3) वैधता चाचणी (Validity test)
  4. (4) नैदानिक चाचणी (Diagnostic test)
See answer and solution
Q141

अदितीला भूतकाळाचे नियम माहित आहेत, पण तिला त्याचा योग्य संदर्भात वापर करता येत नाही. तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे?

  1. (1) ज्ञानाचे उपयोजन (Application of Knowledge)
  2. (2) भाषा आत्मसात करण्याचे तंत्र (Language acquisition device)
  3. (3) प्रक्रियात्मक ज्ञान (Procedural Knowledge)
  4. (4) निर्देशक ज्ञान (Declarative Knowledge)
See answer and solution
Q142

भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

  1. (1) काही भाषा फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी चांगल्या प्रकारे समजवू शकतात.
  2. (2) भाषा ओळख अभिव्यक्त करते.
  3. (3) भाषा ही इतिहासाचे अवशेष आहे.
  4. (4) मानवीय ज्ञानात भाषा भर टाकते.
See answer and solution
Q143

भाषावर्गात प्रकल्प विकसित करणे आणि प्रकल्प कार्य करणे यात कोणत्या क्रमाने क्रिया सहभागी असतात?

  1. (1) शिक्षक आणि विद्यार्थी त्यांना हवा तसा प्रकल्प तयार करून सादर करू शकतात.
  2. (2) गट निर्मिती, नियोजन, माहिती संग्रहण, माहितीचे विश्लेषण, आराखडा लिहिणे, विषय ठरवणे, अंतिम अहवाल तयार करणे.
  3. (3) गट निर्मिती, विषय ठरवणे, नियोजन, माहिती संग्रहण, माहितीचे विश्लेषण, आराखडा लिहिणे, अंतिम अहवाल तयार करणे.
  4. (4) गट निर्मिती, विषय ठरवणे, नियोजन, माहिती संग्रहण, आराखडा लिहिणे, माहितीचे विश्लेषण, अंतिम अहवाल तयार करणे.
See answer and solution
Q144

‘ऐकणे’ यासाठी अधोगामी (Top-down) पद्धतीत याचा समावेश असतो.

  1. (1) प्रत्येक ध्वनी, शब्द, कथन, पदबंध आणि वाक्य ऐकणे.
  2. (2) विशिष्ट तपशिलावर भर देणे.
  3. (3) व्याख्यान, मजकूर किंवा ध्वनिफितीचा आशय ऐकणे.
  4. (4) व्याख्यान, मजकूर किंवा ध्वनिफितीतील एकूण संदेश ऐकणे.
See answer and solution
Q145

इयत्ता सातवीच्या शिक्षिकेला लेखन कार्यात एका माणसाचे तपशील लिहायला सांगायचे आहेत. ती वर्गाबाहेर जाऊन एका फेरीवाल्याला त्याच्या टोपली सह घेऊन येते. ती त्याला जवळपास सात मिनिटे वर्गात थांबायला सांगते आणि विद्यार्थ्यांना गटात बसून त्या फेरीवाल्याचे विवरण/तपशील लिहिण्यास सांगते. या उपक्रमात त्या फेरीवाल्याची काय भूमिका आहे?

  1. (1) साधन
  2. (2) शिक्षण सहाय्यक
  3. (3) फेरीवाला
  4. (4) उपक्रमात सहभाग घेणारा
See answer and solution
Q146

इयत्ता सातवीची शिक्षिका मुलांना मजकुरातील लोक आणि समाज यांचे महत्त्व आणि ओळख या बद्दल समजून घेण्यास सांगते. या उपक्रमातून शिक्षिकेला विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेला उत्तेजन देण्याचे लक्ष्य आहे?

  1. (1) साहित्यिक कौशल्य
  2. (2) भाषा साक्षरता
  3. (3) सर्जनशील साक्षरता
  4. (4) विश्लेषणात्मक वाचन
See answer and solution
Q147

राष्ट्रीय शैक्षणिक नीती (NEP) 2020 ने पुरस्कृत केलेल्या अभिजात भाषेच्या अभ्यासासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

  1. (1) अभिजात भाषेचा माध्यमिक पातळीवर एक मुख्य भाषा म्हणून अभ्यास
  2. (2) अभिजात भाषेचा माध्यमिक पातळीवर एक अतिरिक्त भाषा म्हणून अभ्यास
  3. (3) अभिजात भाषेचा त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून अभ्यास
  4. (4) अभिजात भाषेचा पूर्व तयारीच्या (Preparatory) पातळीवर अभ्यास
See answer and solution
Q148

पुढील उतारा वाचा आणि मजकूर कोणत्या विषयाच्या नोंदीशी संबंधित आहे ते सुचवा.
“क्रांती झाल्यानंतर, अचानक हे बदलता येऊ शकते असे वाटले. युरोप आणि एशिया सह जगातील अनेक भागात वैयक्तिक अधिकार आणि नियंत्रित सामाजिक अधिकार याबाबत नवीन विचारांवर चर्चेला सुरुवात झाली. भारतात, राजा राममोहन राय आणि डिरोझियो यांनी फ्रेन्च राज्य क्रांतीच्या प्रस्तुतत्तेची चर्चा केली. वसाहतींच्या विकासानंतर या विचारांची सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात पुनर्मांडणी झाली.”

  1. (1) क्रांती नोंद
  2. (2) विज्ञान नोंद
  3. (3) राजकीय नोंद
  4. (4) समाजविज्ञान नोंद
See answer and solution
Q149

इयत्ता आठवीचे शिक्षक सुभाष खेदाने म्हणतात, “भाषिक मूल्यमापन सर्वसाधारणपणे ग्रहण कौशल्यांना (Receptive Skills) महत्त्व देत नाही.” त्यांच्या मते ग्रहण कौशल्ये म्हणजे __________.

  1. (1) बोलणे आणि लिहिणे
  2. (2) ऐकणे आणि लिहिणे
  3. (3) बोलणे आणि वाचणे
  4. (4) ऐकणे आणि वाचणे
See answer and solution
Q150

विद्यार्थ्याला कळते, समजते की भाषा ही एक व्यवस्था म्हणून कार्य करते __________.

  1. (1) धोरणात्मक सामर्थ्य (Strategic Competence)
  2. (2) संज्ञापनात्मक सामर्थ्य (Communicative Competence)
  3. (3) व्यवस्थाधिष्ठित सामर्थ्य (Systemic Competence)
  4. (4) समाजभाषा वैज्ञानिक सामर्थ्य (Sociolinguistic Competence)
See answer and solution