By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 14 Dec 2024 Paper 2 Marathi, Question 102

Topic: Poem comprehension

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्याय निवडा.
खाली रांगोळी पुसट
तुळशीचें वृंदावन
वाढणाऱ्या काळोखाची
मुकी भुकी दटावण,

आंतबाहेर दाटला
कडूलिंबाचा सुवास
क्षण अनावर झाला
घुसमटूनिया श्वास

..... भळभळणारें रक्त
खोल रुतलेली कांच
माझ्या हातांत बांगड्या
होत्या सहा किंवा पाच?

ओसरल्या रक्तामध्यें
कांपे जुंनी आठवण
आहे मनगटावर
एक पुसटसा वण.

Q102

रक्त कशामुळे वाहते आहे?

  1. (1) काळोख दाटल्यामुळे
  2. (2) काच रुतल्यामुळेCorrect answer
  3. (3) बांगडी फुटल्यामुळे
  4. (4) श्वास घुसमटल्यामुळे

Solution.

CBSE answer: (2)

उत्तर: (2) काच रुतल्यामुळे

  1. कवितेत 'भळभळणारें रक्त / खोल रुतलेली कांच' अशा ओळी आहेत.
  2. हातात काच खोल रुतली आहे, म्हणून रक्त वाहते आहे.

सावधान: पुढच्या ओळीत बांगड्यांचा उल्लेख आहे, पण 'बांगडी फुटली' असे कवितेत थेट नाही; थेट कारण काच रुतणे आहे.