By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 14 Dec 2024 Paper 2 Marathi, Question 131

Topic: Reading comprehension

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्याय निवडा.
पावसाळ्यात माझा सगळ्यात आवडता उद्योग म्हणजे अंगावर पांघरूण घेऊन, डोळे मिटून कौलारावर वाजणारा पाऊस ऐकणे. खूप मजा येई असा पाऊस ऐकताना. कौलांवर वाजणाऱ्या जलधारा, त्यातून आत उडणारे तुषार, सगळीकडे कुंद वातावरण आणि तोंडावर पांघरूण घेऊन, कानात प्राण आणून पाऊस ऐकणारी मी. पण हा आनंद फार वेळ घेता येत नसे. कारण सकाळी सव्वा नऊ–साडे नऊ वाजता वडील शाळेत जायला निघत तेव्हा आईचा सगळा स्वयंपाक झालेला असे. आमची न्याहारी आणि वडिलांचे जेवण बरोबरच झाले पाहिजे, हा नियमच होता. त्यामुळे पावसाचं गाणं अर्धवट सोडून उठावचं लागे. पावसाच्या आणि थंडीच्या दिवसात आमची न्याहारी म्हणजे एक मज्जाच होती. माझी आई बाजरीच्या भाकरी करी. त्या दुरडीत न ठेवता मोठ्या परातीत थोड्या पसरून ठेवी. त्यातली वाफ जाऊन त्या थंड झाल्या की माझे वडील त्या भाकरी परातीत बारीक कुस्कुरीत. त्यात ओंजळभर साजूक तूप घालीत. बारीक फोडलेला गूळ घालीत. त्या काल्याचा एक एक भला मोठा लाडू बनवीत आणि आम्हाला प्रत्येकाला देत. माझ्या वडिलांच्या भारदस्त हातांनी बनविलेला तो गुळ–तुपाचा लाडू संपता संपत नसे. पण तो संपवावाच लागे. कारण आमचं खाणं झाल्याशिवाय वडील तिथून उठत नसत.
आमची न्याहारी आणि वडिलांचं जेवण झालं की वडील शाळेत जायला निघत. पांढरेशुभ्र, तलम असे टाटा फिनलेचे धोतर, पांढराशुभ्र नेहरू शर्ट, त्यावर बिन बाह्यांचा खादीचा कब्जा किंवा लांब हातांचा काळा कोट, डोक्यावर गांधी टोपी, पायात रबर सोल मारलेल्या कोल्हापुरी वहाणा अशा वेषात माझे वडील शाळेत निघाले की मी त्यांचं बोट पकडून त्यांच्या मोठ्या काळ्या छत्रीत रस्त्यापर्यंत जात असे. कोणी ना कोणी थांबवून वडिलांशी बोलत उभे राहत तेव्हा मी वडिलांच्या धोतराचा सोगा पकडून उभी राही. माझे वडील दूर जाऊ नयेत असे मला वाटे. ते मला म्हणत, ‘उजा! शाळेत जायचं बरं का. पळा आता.’ मग मी भिजत भिजत धावतच घरी येई.

Q131

लेखिकेचा आवडता छंद कोणता?

  1. (1) शाळेत जाणे
  2. (2) पावसाचे तुषार उडवणे
  3. (3) वडिलांबरोबर जेवण करणे
  4. (4) कौलारांवरच्या पावसाचा आवाज ऐकणेCorrect answer

Solution.

CBSE answer: (4)

उत्तर: (4) कौलारांवरच्या पावसाचा आवाज ऐकणे

  1. उताऱ्याचे पहिलेच वाक्य सांगते: पावसाळ्यातील तिचा सगळ्यात आवडता उद्योग म्हणजे पांघरूण घेऊन, डोळे मिटून कौलारावर वाजणारा पाऊस ऐकणे.
  2. तुषार आत उडतात असा उल्लेख आहे, पण ती ते उडवत नाही.
  3. न्याहारी आणि वडिलांना निरोप देणे हे रोजचे नियम आहेत, छंद नाहीत.