By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 14 Dec 2024 Paper 2 Marathi, Question 148

Topic: Pedagogy of language

Q148

पुढील उतारा वाचा आणि मजकूर कोणत्या विषयाच्या नोंदीशी संबंधित आहे ते सुचवा.
“क्रांती झाल्यानंतर, अचानक हे बदलता येऊ शकते असे वाटले. युरोप आणि एशिया सह जगातील अनेक भागात वैयक्तिक अधिकार आणि नियंत्रित सामाजिक अधिकार याबाबत नवीन विचारांवर चर्चेला सुरुवात झाली. भारतात, राजा राममोहन राय आणि डिरोझियो यांनी फ्रेन्च राज्य क्रांतीच्या प्रस्तुतत्तेची चर्चा केली. वसाहतींच्या विकासानंतर या विचारांची सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात पुनर्मांडणी झाली.”

  1. (1) क्रांती नोंद
  2. (2) विज्ञान नोंद
  3. (3) राजकीय नोंद
  4. (4) समाजविज्ञान नोंदCorrect answer

Solution.

CBSE answer: (4)

उत्तर: (4) समाजविज्ञान नोंद

  1. उताऱ्यात फ्रेंच राज्यक्रांती, वैयक्तिक अधिकार, राजा राममोहन राय, डिरोझियो आणि वसाहती यांचा उल्लेख आहे.
  2. ही इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाची भाषा आहे, आणि इतिहास हा समाजविज्ञानाचा भाग आहे; म्हणून ही समाजविज्ञानाची नोंद (Register).

सावधान: ‘क्रांती’ हा शब्द उताऱ्यात आहे म्हणून (1) निवडू नका; ‘क्रांती नोंद’ असा भाषा-प्रकार नसतो. (3) राजकीय नोंद भाषणे, घोषणा यांची असते.