By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 14 Dec 2024 Paper 2 Marathi, Question 100

Topic: Grammar

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्याय निवडा.
खाली रांगोळी पुसट
तुळशीचें वृंदावन
वाढणाऱ्या काळोखाची
मुकी भुकी दटावण,

आंतबाहेर दाटला
कडूलिंबाचा सुवास
क्षण अनावर झाला
घुसमटूनिया श्वास

..... भळभळणारें रक्त
खोल रुतलेली कांच
माझ्या हातांत बांगड्या
होत्या सहा किंवा पाच?

ओसरल्या रक्तामध्यें
कांपे जुंनी आठवण
आहे मनगटावर
एक पुसटसा वण.

Q100

‘सहा किंवा पाच’ यातील अधोरेखित काय आहे?

  1. (1) गुणविशेषण
  2. (2) शब्दयोगी अव्यय
  3. (3) उभयान्वयी अव्ययCorrect answer
  4. (4) संख्याविशेषण

Solution.

CBSE answer: (3)

उत्तर: (3) उभयान्वयी अव्यय

  1. 'किंवा' हा शब्द 'सहा' आणि 'पाच' या दोन शब्दांना जोडतो.
  2. दोन शब्द किंवा वाक्ये जोडणारे अविकारी शब्द उभयान्वयी अव्यय असतात (आणि, व, किंवा, पण).
  3. 'किंवा' विकल्प (पर्याय) दाखवणारे उभयान्वयी अव्यय आहे.

सावधान: 'सहा', 'पाच' संख्याविशेषणे आहेत, 'किंवा' नाही; शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येते.