By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 2 Marathi Language Question Paper with Answer Key

You are reading the question paper with answers. This is not the timed test: no clock is running and nothing is being scored.

Go to the timed test →

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
लहानपणी पक्ष्यांची रंगीत पिसे गोळा करताना आपल्या मनात अनेक प्रश्न आले असतील की, इतके सुंदर रंग पक्ष्यांनाच का? पोपटाचा हिरवागार, खंड्या पक्ष्याचा सुंदर निळा, रोहित पक्ष्याचा गुलाबी, भारद्वाज पक्ष्याचा केशरी आणि मोराचे तर मनमोहक मोरपंखी, गडद निळा, हिरवा, केशरी असे अनेक रंग... पक्षी हे रंग कसे ‘तयार’ करत असतील? ह्या रंगांचा त्यांना उपयोग काय? माणसांना किंवा इतर प्राण्यांना असे रंग का नाहीत? असे रंग तयार करता येतात का?
पक्ष्यांच्या या वेगवेगळ्या रंगांचे गुपित सरळ साधे नाहीये. पिसांच्या अनेक रंगांपैकी निळा आणि त्याच्या अनेक छटा बहुतेक वेळा पिसांच्या सूक्ष्म रचनेमुळे निर्माण होतात. प्रकाश जेव्हा पिसांच्या विशिष्ट सूक्ष्म रचनेच्या पृष्टभागावरून परावर्तित होतो, तेव्हा त्या पिसांना निळ्या रंगाच्या छटा येतात. मोराचा झळाळता निळा, हिरवा, मोरपंखी रंग त्याच्या शरीरावरील पिसांच्या अशाच प्रकारच्या सुक्ष्म रचनेमुळे तयार होतो. त्या सूक्ष्म रचनांवर प्रकाश किती, कुठल्या कोनात पडतो आणि कसा परावर्तित होतो, त्यानुसार हे रंग बदलते किंवा झळाळते दिसतात. पिवळा, लाल असे इतर रंग मात्र केरॉटेनोइड नावाच्या रंगद्रव्यापासून मिळतात. महत्त्वाची गोष्ठ अशी की बहुतेक सर्व पक्ष्यांना ही रंगद्रव्ये त्यांच्या शरीरात तयार करता येत नाहीत. त्यांच्या खाण्यातून त्यांना ही रंगद्रव्ये मिळवावी लागतात. उदाहरणार्थ, रोहित पक्ष्यांचा सुंदर गुलाबी-केशरी रंग मोठ्या प्रमाणावर कोळंबी खाऊन, त्यातील घटकांपासून मिळतो. मात्र याला अपवाद आहे पोपटांचा. पिसांच्या रंगांच्या उत्क्रांतीच्या संदर्भात पाहिले, तर पोपटांचा गट पक्ष्यांच्या इतर गटांपेक्षा वेगळा आहे. कारण पोपट गटातील पक्ष्यांमध्ये रंगद्रव्य शरीरात तयार करण्याची क्षमता आहे. पोपटांच्या लोकप्रियतेमधील महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांचे चित्ताकर्षक रंग! पोपटांच्या सगळ्या जातींमध्ये नर आणि मादी यांच्या रंगात आणि दिसण्यात फार फरक नसतो, पण वेगवेगळ्या जातींमध्ये आकार आणि रंग दोन्हीत खूप वैविध्य आहे.
पोपटांना फार दूरवर उडता येत नाही. ते थव्याने राहणारे पक्षी आहेत. पोपटांच्या अनेक जाती 30-40 वर्षे जगू शकतात. इतर प्राण्यांच्या, तसेच माणसांच्या आवाजाची नक्कल करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. पकडून पिंजऱ्यात ठेवले, तरी ते अनेक वर्ष जगतात. या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे पाळीव पक्षी म्हणून पोपटांना जगभर मागणी असते. वर्ष 2011 मध्ये केलेल्या गणनेनुसार सुमारे पाच कोटी, म्हणजे जगातले जवळजवळ निम्मे पोपट पाळीव अवस्थेतच आहेत.

Q91

मोरपिसांचे विविधरंग दिसण्यामागचे प्राथमिक कारण कोणते?

  1. (1) कॅरोटेनोईड रंग
  2. (2) पिसांमधून वाऱ्याचे अपवर्तन
  3. (3) विशिष्ट कोनात प्रकाश परावर्तित करणाऱ्या पिसांच्या सूक्ष्म रचना
  4. (4) त्वचेची वैशिष्ट्यपूर्ण रचना
See answer and solution
Q92

पक्ष्यांचे खाद्य आणि त्यांच्या पिसांचे रंग यांच्यात कोणता संबंध दिसतो?

  1. (1) जे पक्षी वैविध्यपूर्ण पदार्थ खातात त्यांची पिसे विविधरंगी असतात.
  2. (2) जे पक्षी कॅरोटेनोईड समृद्ध पदार्थ खातात त्यांच्या पिसांना पिवळा किंवा लाल रंग येतो.
  3. (3) फक्त कीटक आहारावर जगणारे पक्षी रंगीबेरंगी असतात.
  4. (4) खाद्य पदार्थ आणि पिसांचे रंग यांच्यात कोणताही संबंध नसतो.
See answer and solution
Q93

‘पोपटांना फार दूरवर उडता येत नाही’. वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणता व्याकरणिक घटक जोडला गेला आहे?

  1. (1) गुण विशेषण
  2. (2) उभयान्वयी अव्यय
  3. (3) आत्मवाचक सर्वनाम
  4. (4) शब्दयोगी अव्यय
See answer and solution
Q94

पुढीलपैकी कोणत्या मूख्य कारणास्तव पोपट हे जगात सर्वात लोकप्रिय आहेत?

  1. (1) त्यांचे वयोमान आणि माणसाच्या आवाजाची नक्कल करण्याची क्षमता.
  2. (2) त्यांचा आकार आणि फार दूरवर उडता येत नसल्यामुळे.
  3. (3) शरीरातच रंगद्रव्ये तयार करता येण्याच्या क्षमतेमुळे.
  4. (4) पिंजऱ्यात सहज ठेवता येत असल्यामुळे.
See answer and solution
Q95

रोहित पक्ष्यांच्या उदाहरणातून लेखकाने कोणती महत्त्वाची बाब निदर्शनास आणून दिली आहे?

  1. (1) रंगद्रव्ये तयार करण्यात प्रकाशाचे महत्त्व
  2. (2) चटकदार रंग मिळविण्यासाठी पक्षी स्थलांतर करतात
  3. (3) त्यांना खाद्य पदार्थातून रंगद्रव्ये मिळवावी लागतात
  4. (4) सर्व पक्ष्यांना एकसारखे रंग धारण करता येतात
See answer and solution
Q96

‘अपवाद’ शब्दाचा आशय व्यक्त करणारा पर्याय निवडा.

  1. (1) एक प्रकारची उदास, निराशाजनक आणि निष्क्रिय मनःस्थिती
  2. (2) प्रगती किंवा कार्याला थांबवणारी गोष्ट
  3. (3) सर्वसाधारणपणे उपलब्ध होणारी गोष्ट
  4. (4) सामान्य नियमांच्या चौकटीत न बसणारी गोष्ट
See answer and solution
Q97

‘निम्मे पोपट’! अधोरेखित शब्दाच्या विशेषणाचा प्रकार कोणता?

  1. (1) अपूर्णांक वाचक गणना विशेषण
  2. (2) आवृत्तिवाचक संख्याविशेषण
  3. (3) गुणविशेषण
  4. (4) सार्वनामिक विशेषण
See answer and solution
Q98

उताऱ्याप्रमाणे पोपट गटातील पक्ष्यांतील रंग तफावतीच्या संदर्भात कोणते विधान अचूक आहे?

  1. (1) नर आणि मादी पोपटांच्या रंगात फार फरक असतो.
  2. (2) वेगवेगळ्या जातींमध्ये आकार आणि रंग यांच्यात वैविध्य असते.
  3. (3) पोपटांच्या सर्व जातींमध्ये रंगसंगती सारखीच असते.
  4. (4) जे पोपट थव्यात राहतात त्यांचे रंग फार चित्ताकर्षक असतात.
See answer and solution
Q99

उताऱ्यातून प्रमुख्याने कोणत्या बाबीवर चर्चा करण्यात आली आहे?

  1. (1) पक्ष्यांची चित्ताकर्षक रंगसंगती
  2. (2) पोपट आणि इतर पक्ष्यांची बुद्धिमत्ता
  3. (3) पोपटांची पाळीव अवस्था
  4. (4) पक्ष्यांचे रंग यामागील जैविक आणि वैज्ञानिक कारणांचे स्पष्टीकरण
See answer and solution

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थासही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लाभायचा अन मनासारखे शब्दही यायचे
नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे
निघोनी घरी शेवटी जात असता वळुनी कितीदा तरी पहायचे
उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबात ही दुखः दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता, नभाला किती खिन्न वाटायचे
असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे
ऋतुंना ऋतुंनी जरा भागिले की नव्याने जुने झाड उगवायचे.
मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे
मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे.
आता सांजवेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे
आता पाऊलेही दुःखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे.

Q100

‘उर’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

  1. (1) हृदय
  2. (2) जत्रा
  3. (3) शिल्लक
  4. (4) आशा
See answer and solution
Q101

कवीच्या मते आकाशाला केव्हा नैराश्य यायचे?

  1. (1) मनासारखा अर्थ लाभल्यावर
  2. (2) तारा निखळल्यावर
  3. (3) सांजवेळ होताना
  4. (4) पावसाळ्यात
See answer and solution
Q102

पुढीलपैकी विशेषनाम कोणते?

  1. (1) घर
  2. (2) दिशा
  3. (3) चंद्र
  4. (4) ऋतू
See answer and solution
Q103

भोवती चंद्र नसताही कोणती गोष्ट कवीच्या अनुभवास येत असे?

  1. (1) खिन्नता
  2. (2) दिशाहीनता
  3. (3) निरर्थकता
  4. (4) शुभ्रता
See answer and solution
Q104

जुने झाड नव्याने केव्हा उगवायचे?

  1. (1) ऋतूंना ऋतूंनी भागिल्यावर
  2. (2) पाऊले दुःखू लागल्यावर
  3. (3) मनात काळोख दाटल्यावर
  4. (4) मनासारखे शब्द आल्यावर
See answer and solution
Q105

कवीच्या मते अबोलपणे व्यक्त होण्याचे विशेष कोणत्या घटकांचे?

  1. (1) तारा-नभ
  2. (2) ऋतू-झाड
  3. (3) काळोख-काजवे
  4. (4) नदी-सागराचे तट
See answer and solution
Q106

पुढीलपैकी कोणाचा संबंध भाषेतील अर्थाच्या पैलूशी आहे?

  1. (1) स्वनविज्ञान (Phonetics)
  2. (2) शब्दार्थ मीमांसा (Semantics)
  3. (3) वाक्य विन्यास (Syntax)
  4. (4) रूपविज्ञान (Morphology)
See answer and solution
Q107

पुढीलपैकी कोणता सिद्धांत भाषा शिक्षण यासंबंधीचा नाही?

  1. (1) भाषा शिक्षणात नैपुण्य आणि ज्ञान या दोहोंचा अंतर्भाव असतो.
  2. (2) विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षण पद्धतीच्या आवडीत वैविध्य असू शकते.
  3. (3) भाषा हे संभाषणाचे साधन असते.
  4. (4) भाषा ही व्याकरणाचे नियम/रुप यांना पाठ करुन शिकली जाते.
See answer and solution
Q108

इयत्ता सहावीची शिक्षिका फळ्याच्या मध्यभागी एक शब्द लिहिते आणि विद्यार्थ्यांना त्या शब्दाशी संबंधित सर्व शब्दांवर विचार करण्यास सांगते.
या उपक्रमातील महत्त्वाचे उद्दिष्ट ...

  1. (1) लेखन कौशल्यात वाढ करणे
  2. (2) विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रहात सुधारणा करणे
  3. (3) व्याकरण समजावणे
  4. (4) वाचन कौशल्यात वाढ करणे
See answer and solution
Q109

खालील वाक्ये वाचा :
विधान (A) : सुरवातीच्या वर्षांत भाषा शिकण्यात उशीर झाल्यामुळे मुलांना नवीन भाषा आत्मसात करण्यात अडचण येते.
कारण (R) : भाषा आत्मसात करण्याच्या दृष्टीने मुलांची सुरुवातीची वर्षे ही अत्यंत महत्त्वाची असतात.
अचूक पर्याय निवडा.

  1. (1) विधान A आणि कारण R दोन्ही बरोबर असून R हे A चे योग्य विश्लेषण आहे.
  2. (2) विधान A आणि कारण R दोन्ही बरोबर आहेत मात्र R हे A चे अचूक विश्लेषण नाही.
  3. (3) विधान A बरोबर नाही, कारण R बरोबर आहे.
  4. (4) विधान A बरोबर आहे, कारण R बरोबर नाही.
See answer and solution
Q110

आधारभूत पातळीसाठीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (2022) नुसार बहुभाषिकतेच्या संबंधीचा महत्त्वाचा सिद्धांत कोणता?

  1. (1) वर्गातील बहुभाषिक स्वरुपामुळे अभ्यासक्रमाच्या देवाण-घेवाण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.
  2. (2) मुलांना सुरूवातीच्या वर्षांमध्ये एकापेक्षा अधिक मौखिकभाषा आत्मसात करता येत नाही.
  3. (3) बहुभाषिकतेचे ज्ञानात्मक आणि समाज सांस्कृतिक दोन्ही प्रकारचे लाभ आहेत.
  4. (4) मुलांना त्यांची घरगुती भाषा विसरुन जायला मदत करणे आणि शाळेचा भर मुलांनी शाळेची भाषा शिकावी यावर असला पाहिजे.
See answer and solution
Q111

काही भाषिक समूहांमध्ये भाषेची दोन वेगळी रूपे अस्तित्वात असून प्रत्येकाचे सामाजिक कार्य हे वैशिष्टपूर्ण असते ही परिस्थिती म्हणजे

  1. (1) कूट मिश्रण (Code mixing)
  2. (2) प्रयुक्ती (Register)
  3. (3) द्वैभाषिकता (Diglossia)
  4. (4) बोली (Dialect)
See answer and solution
Q112

विद्यार्थीं जोडीने काम करतात. एका मजकुराचे दोन भाग करण्यात येतात. आलटून पालटून एक मुलगा मजकूर वाचतो नि दुसरा लिहितो नंतर दोघेही एकत्रितपणे पूर्ण मजकूर तयार करतात. या उपक्रमाला काय म्हणतात?

  1. (1) धावते श्रुतिलेखन (Running Dictation)
  2. (2) शब्द जाळे (Word Web)
  3. (3) अंशतःश्रुतिलेखन (Partial Dictation)
  4. (4) कथाकथन (Story telling)
See answer and solution
Q113

‘भाषा वर्गात साहित्यिक मजकूर अभ्यासणे’ या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही?

  1. (1) साहित्यिक मजकूर व्याकरण शिकविण्यासाठी वापरावा.
  2. (2) भाषा शिकण्यासाठी साहित्यिक मजकूर म्हणजे सांस्कृतिक आदान (inputs) असते.
  3. (3) साहित्यिक मजकुरामुळे समीक्षात्मक चिंतन आणि प्रतिसाद वाढीस लागतो.
  4. (4) साहित्यिक मजकूर म्हणजे रसग्रहण आणि आनंद.
See answer and solution
Q114

इयत्ता सहावीचा विद्यार्थी, नवीन हा मजकूर वाचताना अडखळतो. शिक्षिका त्याला सोपा मजकूर वाचायला देते. ती त्याच्यासाठी सहवाचनाचे सत्र देखील घेते, शिक्षिकेकडून त्याला मिळणारी वागणूक म्हणजे

  1. (1) वाचन तयारी (Reading readiness)
  2. (2) परातीकरण (Scaffolding)
  3. (3) बुद्धिमंथन (Brainstorming)
  4. (4) काहीतरी बोलणे/करणे (ice-breaking)
See answer and solution
Q115

भाषा अध्ययन अध्यापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब असे मानते की ‘भाषा ही एक सवय’ आहे?

  1. (1) श्रव्यभाषिकता (Audiolingualism)
  2. (2) संभाषणात्मक भाषा शिक्षण (Communicative language teaching)
  3. (3) नैसर्गिक पद्धती (Natural Approach)
  4. (4) सहभागी भाषा अध्ययन (Cooperative Language learning)
See answer and solution
Q116

एका विद्यार्थ्याला एक अपठित उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. या प्रकारचे वाचन म्हणजे

  1. (1) न्याहाळणे (Scanning)
  2. (2) अनन्य वाचन (Exclusive reading)
  3. (3) चाळणे (Skimming)
  4. (4) विस्तृत वाचन (Extensive Reading)
See answer and solution
Q117

शिक्षिका विद्यार्थ्यांना पाच चित्र दाखवते आणि त्यांना त्या आधारे एक गोष्ट लिहिण्यास सांगते. हे कशाचे उदाहरण आहे?

  1. (1) दाखवणे आणि सांगणे (Show and tell)
  2. (2) जिगसॉ श्रुतिलेखन (Jigsaw Dictation)
  3. (3) सह वाचन (Shared reading)
  4. (4) सर्जनशील लेखन (Creative writing)
See answer and solution
Q118

भाषेत कामगिरी आधारित मुल्यमापनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते?

  1. (1) बहुपर्यायी प्रश्न (Multiple choice questions)
  2. (2) चर्चारहित सादरीकरण (Non interactive performance)
  3. (3) संदर्भरहित चाचणी सामग्री (Decontexualized test items)
  4. (4) ससंदर्भ संभाषणात्मक नियुक्त कार्य (Contexualized communication tasks)
See answer and solution
Q119

खालील वाक्ये वाचा :
(A) : वाचन म्हणजे फक्त वर्ण-ध्वनि यांचा संबंध समजणे आणि शब्द अचूक उच्चारणे
(B) : वाचन म्हणजे-अर्थ लावण्यासाठी चिन्हांचा (Symbols) उलगडा करणे
अचूक पर्याय निवडा.

  1. (1) A आणि B दोन्ही बरोबर आहेत
  2. (2) A बरोबर आहे मात्र B चूक आहे
  3. (3) B बरोबर आहे मात्र A चूक आहे
  4. (4) A आणि B दोन्ही चूक आहेत
See answer and solution
Q120

शिक्षिकेला तिच्या विद्यार्थांच्या श्रवण कौशल्याचे मूल्यमापन करायचे आहे. पुढीलपैकी कोणत्या उपक्रमाचा तिला ‘श्रवण मूल्यमापन’ म्हणून वापर करता येईल?

  1. (1) मौखिक सादरणीकरणाच्या आधारे विद्यार्थ्यांची वर्गवारी लावणे.
  2. (2) शिक्षिका एक गोष्ट सांगते आणि नंतर आकलन आधारित प्रश्न विचारते.
  3. (3) शिक्षिका विद्यार्थ्यांना एक गोष्ट वाचण्यास सांगते आणि नंतर आकलन आधारित प्रश्न विचारते.
  4. (4) शिक्षिका शब्दसंग्रह आधारित नियुक्त कार्य देते.
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

‘जीवो जीवस्य जीवनम्’ हा पृथ्वीवरचा नियम आहे. तद्वतच कोणीतरी भक्ष्य असती, तर कोणी त्याचा भक्षक असतो. ही भक्ष्य-भक्षकांची नाती अन्नसाखळी आणि अन्नजाळी निर्माण करत असतात. कोणत्याही परिसंस्थेत संतुलन राहण्यासाठी या अन्नसाखळ्या मदत करत असतात. पण आपला जीव वाचवण्यासाठी हे भक्ष्य प्राणी अनेकविध उपाय योजत असतात, तर भक्षकदेखील भक्ष्याला न कळता त्यावर घाला घालण्यासाठी आपले नियोजन करत असतात. आपापल्या परिसरात मिसळून जाण्यासाठी प्राणी अनेक प्रकारची अनुकूलने दाखवत असतात. त्यात शरीराचा रंग, गंध, आकार, स्वरूप, त्यांची चाल अशा मुद्यांचा अनेक अंतर्भाव होतो.

या सर्वात सामान्यतः केला जाणारा उपाय म्हणजे स्वतःची रंगसंगती निसर्गात बेमालूमपणे मिसळणे, जेणेकरून आपल्या भक्षकाच्या नजरेस न पडणे. तसेच भक्ष्याला कळणार नाही अशा पद्धतीने भक्षकदेखील लपालपी करतात. निसर्गात रंगांची रेलचेल वनस्पतींत खूपच जास्त दिसते, पण प्राणिजगतातदेखील विविध रंगद्रव्ये, त्यांचे प्रमाण, प्रसार आणि संगती यावरून त्यांचा रंग ठरतो. काही जलचर आणि पक्षी, या वर्गात निसर्गाने मुक्त हस्ते रंगांची उधळण केली आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर आपला राष्ट्रीय पक्षी मोर. मोर-नरामध्ये खूप तऱ्हेतऱ्हेचे रंग दिसतात. लांडोर त्या मानाने रंगहीन असते. पक्षिजगतात नर हे जास्त प्रमाणात रंगीत पिसाऱ्याचे असतात. मूलतः प्रणयाराधनाच्या वेळा मादीचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही रंगाची उधळण दिसते. त्याउलट पिल्ले मात्र फिकट रंगाची दिसतात, कारण त्यांच्याकडे कोणाचे लक्ष जाऊ नये.

सरीसृप वर्गात अनेक प्रकारचे साप, सरडे असे भूचर प्राणी वेगळ्या पद्धतीने आपल्या रंगाचा वापर करतात. साप जितका विषारी, तितका तो स्वतःच्या विषारीपणाची जणू जाहिरातच करतो. डौलदार फणा, त्यावरचा दहाचा आकडा. रंगाने पिवळाधम्मक असा नाग आपले अस्तित्व इतर जगाला दाखवून देण्यासाठीच सावकाश सरपटत जातो आणि आपल्या फण्याचेदेखील प्रदर्शन करतो. असे प्राणी जे त्यांच्या भडक रंगाचे प्रदर्शन करतात, ते धोक्याची सूचना देत असल्याने अशा रंगसंगतीला इंग्लिशमध्ये ‘वॉर्निंग कलरेशन’ असे म्हणतात.

स्वतः विषारी असणारे प्राणी त्यांच्या रंगाद्वारे अशी जाहिरात करून जणू काही ‘आमच्यापासून दूर राहा’ असे इतरांना बजावत असतात. त्याउलट दुबळे प्राणी निसर्गात लपून जाण्यासाठी ‘कॅमोफ्लॅज किंवा क्रिप्टिक कलरेशन’ दर्शवतात. कॅमोफ्लॅज म्हणजेच छद्मावरण! हे भक्षकापासून वाचण्यासाठी उपयुक्त ठरते. शिवाय भक्ष्याला पत्ता न लागू देता त्याला सहज टिपण्यासाठीदेखील काही भक्षक असे छद्मावरण वापरतात. कमीलियन सरडा या बाबतीत सर्वश्रुत आहे. उत्क्रांतीच्या प्रदीर्घ प्रवासात या रंगसंगतीला महत्त्व आहे. डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धान्तानुसार जी जाती, प्रजाती आपल्या परिसराशी अनुकूलित होते, ती या जगण्याच्या रेट्यात यशस्वी होते. जी प्रजाती आपले वंशसातत्य टिकवू शकते, ती उत्क्रांत होते.

Q121

कोणत्याप्रकरचे प्राणी ‘कॅमोफ्लॅज किंवा क्रिप्टिक कलरेशन’ आत्मसात करतात?

  1. (1) विषारी प्राणी
  2. (2) भक्षक पक्षी
  3. (3) दुर्बल प्राणी
  4. (4) सरपटणारे प्राणी
See answer and solution
Q122

नर पक्षी हा मादीच्या तुलनेत अधिक रंगीबेरंगी असण्याचे प्राथमिक कारण कोणते?

  1. (1) भक्षकाला चकवता यावे म्हणून
  2. (2) भक्षकापासून वाचता यावे म्हणून
  3. (3) आमच्यापासून लांब राहा, हे सुचविण्यासाठी
  4. (4) मादीचे लक्ष वेधता यावे म्हणून
See answer and solution
Q123

‘साप सावकाश सरपटत जातो.’ वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा

  1. (1) शब्दयोगी अव्यय
  2. (2) उभयान्वयी अव्यय
  3. (3) क्रियाविशेषण अव्यय
  4. (4) कालवाचक विशेषण
See answer and solution
Q124

डार्विनच्या सिद्धांतानुसार कोणती प्रजाती यशस्वी होते?

  1. (1) जी आपल्या परिसराशी जुळवून घेते.
  2. (2) ज्यांचे रंग चटकदार असतात
  3. (3) जी मोठ्या समूहात असते
  4. (4) जी सुरक्षित ठिकाणी जाऊन राहते
See answer and solution
Q125

परिसंस्थेत संतुलन राखण्यास भक्ष्य-भक्षक संबंध कशाप्रकारे मदत करतो?

  1. (1) त्यामुळे विषारी वनस्पतींमध्ये वाढ होते.
  2. (2) त्यामुळे नैसर्गिकरित्या प्रजातींची संख्या नियंत्रणात येते.
  3. (3) त्यामुळे दुर्बल प्रजाती नामशेष होतात.
  4. (4) त्यामुळे छद्मावरण तयार होते.
See answer and solution
Q126

‘अतिशयता’ या अर्थाचा कोणता शब्द उताऱ्यात आला आहे?

  1. (1) डौलदार
  2. (2) छद्मावरण
  3. (3) रेलचेल
  4. (4) नियोजन
See answer and solution
Q127

‘जीवो जीवस्य जीवनम्’ याचा नेमका अन्वयार्थ काय आहे?

  1. (1) जीवसृष्टीत प्रत्येक घटक स्वायत्त आहे.
  2. (2) प्राणी वनस्पतींवर अवलंबून असतात.
  3. (3) एक जीव जगण्यासाठी दुसऱ्या जिवावर अवलंबून असतो
  4. (4) वंशसातत्त्य सदैव टिकून राहते
See answer and solution
Q128

‘वॉर्निंग कलरेशन’ म्हणजे काय?

  1. (1) भक्षकापासून स्वतःला वाचवणे
  2. (2) रंगांच्या माध्यमातून धोक्याची सूचना देणे
  3. (3) स्वतःला इतरांच्या रंगात मिसळून घेणे
  4. (4) पिल्लांची फिकट रंगसंगती
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

अमेरिकेमध्ये उपलब्ध असलेल्या इंटरनेटच्या सरासरी वेगापेक्षा तब्बल 40 लाख पट जास्त वेगाचं इंटरनेट प्रायोगिक तत्त्वावर जपानमध्ये उपलब्ध झाल्याच्या बातमीने अलीकडे मोठी खळबळ माजवली आहे. प्रतिसेकंद तब्बल 1,25,000 गिगाबाइट्स अशा अभूतपूर्व वेगाने तब्बल 1802 किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत माहिती पाठवून या तंत्रज्ञानाद्वारे इंटरनेटच्या वेगामध्ये अशक्यप्राय वाटेल अशी क्रांती घडल्याचा दावा केला गेला आहे. या निमित्ताने मुळात इंटरनेटचा वेग कशामुळे वाढू शकतो आणि आजवर त्यामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत, याचा आढावा घेणं रंजक ठरेल.

संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी ‘बिट’ आणि ‘बाइट’ अशा दोन शब्दांचा वापर केला जातो. तसंच संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी फक्त शून्य आणि एक या दोनच अंकांचा वापर केला जातो. माहिती साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक शून्य किंवा एक या अंकालाच बिट म्हणतात. बिट म्हणजे ‘बायनरी डिजिट’, म्हणजेच 0 किंवा 1. अशा आठ बिट्सच्या समूहाला बाइट असं म्हटलं जातं. यामुळेच माहिती एकीकडून दुसरीकडे पाठवण्यासाठी अशाच प्रकारच्या संज्ञा वापरल्या जातात. उदाहरणार्थ, समजा, एका संगणकामधून दुसऱ्या संगणकाकडे आपण एक फाइल पाठवली. या फाइलमधली माहिती किती वेगाने एकीकडून दुसरीकडे गेली, हे मोजण्यासाठी ‘बिट्स पर सेकंद’ (बीपीएस) हे एकक वापरलं जातं. आता समजा, एका सेकंदात अशी 1024 बिट्स एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकाकडे गेली, तर हा वेग प्रतिसेकंद 1024 बिट्स म्हणजेच एक किलोबिट असा झाला. आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये एक किलो म्हणजे 1000 असा हिशेब असतो. संगणकांच्या जगात मात्र द्विमान पद्धती वापरात असल्याने, त्यानुसारचा एक किलो म्हणजे 1024 असा हिशेब केला जातो. त्या पुढच्या एककांना मेगाबिट, गिगाबिट अशा संज्ञा वापरल्या जातात. अर्थातच मेगाबिट हे किलोबिटपेक्षा जास्त वेगवान, तर गिगाबिट हे मेगाबिटपेक्षा जास्त वेगवान असा हिशेब असतो. उदाहरणार्थ, 1 मेगाबिटमध्ये म्हणजे 10 लाखांहून जास्त बिट्स असतात. हाच वेग आपलं इंटरनेट किती वेगवान आहे, हेसुद्धा ठरवतो. पण याची सुरूवात नेमकी कशी झाली?

इंटरनेटवरची माहिती वाहून नेण्यासाठी पूर्वीच्या काळी, आपण ज्याला आता ‘लँडलाइन’ दुरध्वनीची व्यवस्था म्हणतो, अशा रचनेचाच वापर केला जात असे. याचं कारण म्हणजे दुरध्वनीची यंत्रणा अनेक दशकांपासून अस्तित्वात होती आणि याच यंत्रणेचा वापर इंटरनेटवरची माहिती वाहून नेण्यासाठी केला जावा, अशी सुपीक कल्पना तंत्रज्ञांच्या मनात आली. तांत्रिक भाषेत सांगायचं, तर माणसाचा आवाज एकीकडून दुसरीकडे नेण्यासाठी हे तंत्रज्ञान उभं करण्यात आलेलं होतं; आता मात्र संगणकांवरची माहिती म्हणजेच डेटा एकीकडून दुसरीकडे नेण्यासाठी त्याचा वापर व्हायला लागला. हा वेग काही प्रति सेकंदाला काही किलोबिट्स म्हणजे केबीपीएस इतका असे. जास्तीत जास्त 64 किलोबिट्स प्रतिसेकंद इतक्या वेगाने त्या वेळी इंटरनेट चालू शकायचं.

Q129

माहिती पाठविण्याचा (कमी ते अधिक) वेग दाखविणारा योग्य पर्याय निवडा.

  1. (1) किलोबिट—मेगाबिट—गिगाबिट
  2. (2) मेगाबिट—किलोबिट—गिगाबिट
  3. (3) गिगाबिट—किलोबिट—मेगाबिट
  4. (4) बिट—किलोबिट—बाईट
See answer and solution
Q130

पूर्वीच्या काळी इंटरनेटवर माहिती वाहून नेण्यासाठी कोणती यंत्रणा अमलात होती?

  1. (1) उपग्रह आधारित यंत्रणा
  2. (2) लँडलाईन दूरध्वनी यंत्रणा
  3. (3) ऑप्टिक फायबर यंत्रणा
  4. (4) रेडियो तरंग यंत्रणा
See answer and solution
Q131

पुढीलपैकी कोणते नाम एकवचन आणि अनेकवचन या दोन्ही अवस्थेत एकसारखेच राहते?

  1. (1) माणूस
  2. (2) आवाज
  3. (3) नदी
  4. (4) फाईल
See answer and solution
Q132

जपानमध्ये विकसित झालेल्या नवीन इंटरनेट तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य कोणते?

  1. (1) ते ध्वनिलहरी वापरून डेटा प्रसारित करते
  2. (2) ते डिजिटल फाइल्सचा आकार कमी करते
  3. (3) ते 1802 किलोमीटर लांबपर्यंत माहिती पाठवू शकते
  4. (4) ते थेट उपग्रहाशी जोडले जाते
See answer and solution
Q133

‘इंटरनेटच्या सरासरी वेगापेक्षा तब्बल 40 लाख पट जास्त वेगाचं इंटरनेट.’ वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा.

  1. (1) शब्दयोगी अव्यय
  2. (2) उभयान्वयी अव्यय
  3. (3) क्रियाविशेषण अव्यय
  4. (4) विकल्पबोधक अव्यय
See answer and solution
Q134

लँडलाईन दूरध्वनी व्यवस्था असताना इंटरनेटचा जास्तीत जास्त वेग किती असे?

  1. (1) 128 किलोबिट्स दर सेकंद
  2. (2) 1 मेगाबिट दर सेकंद
  3. (3) 1024 बिट्स दर सेकंद
  4. (4) 64 किलोबिट्स दर सेकंद
See answer and solution
Q135

‘आढावा’ शब्दाचा नेमका अर्थ कोणता?

  1. (1) सातव्या नंतर येणारा संख्याक्रम
  2. (2) मिजासखोरी किंवा डौल
  3. (3) घटना किंवा त्याच्या परिणामांची स्थूलमानाने माहिती
  4. (4) एखाद्या क्रियेची प्रतिक्रिया
See answer and solution
Q136

विद्यार्थी एखादे काम मदतीशिवाय करतात किंवा तेच काम ते वरिष्ठांच्या मदतीने अथवा आपल्या सवंगड्यांच्या मदतीने करतात. या दोहोंमधील अवकाश म्हणजे...

  1. (1) परिपक्वतेची पातळी (Level of maturity)
  2. (2) सान्निध्य विकासाचा प्रांत (Zone of proximal Development)
  3. (3) यशाचा प्रांत (Zone of achievement)
  4. (4) दुरस्थ अध्ययन (Distance learning)
See answer and solution
Q137

मेंदूमध्ये झालेल्या क्षतीमुळे होणारी भाषिक अक्षमता ज्यात भाषिक रूपांना समजणे किंवा त्यांचा उच्चार करण्यास अडचण येते. ते म्हणजे...

  1. (1) अफासिया (Aphasia)
  2. (2) डिसलेक्सिया (Dyslexia)
  3. (3) डिसकेल्कुलिआ (Dyscalculia)
  4. (4) डिसारथ्रिया (Dysarthria)
See answer and solution
Q138

भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. या प्रक्रियेला काय म्हणता येईल?

  1. (1) सांस्कृतिक परिवाहन
  2. (2) उत्पादकता
  3. (3) स्वच्छंदता
  4. (4) विस्थापन
See answer and solution
Q139

12-ते 18 महिन्याच्या वयात मूल समजता येतील असं अनेक एकेक ध्वनी उच्चारतो. नेहमीच्या वस्तुंसाठी मूल ज्या एकेक संज्ञा (ध्वनी) उच्चारतो हा काळ म्हणजे...

  1. (1) गुजबुजणे (Cooing)
  2. (2) टेलिग्राफिक भाषा (Telegraphic speech)
  3. (3) शब्द-वाक्य अवस्था (Holophrastic stage)
  4. (4) बडबडणे (Babbling)
See answer and solution
Q140

वाचन आणि लेखन कौशल्याच्या संदर्भात पुढील विधान वाचा.
A : वाचन करण्याच्या क्षमतेचा परिणाम लेखनाच्या क्षमतेवर होतो.
B : वाचन आणि लेखन या दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रिया असून त्या स्वतंत्रपणे विकसित होतात
अचूक पर्याय निवडा.

  1. (1) A आणि B दोन्ही बरोबर आहेत
  2. (2) A बरोबर आहे आणि B चूक आहे
  3. (3) A आणि B दोन्ही चूक आहेत
  4. (4) A चूक आहे आणि B बरोबर आहे
See answer and solution
Q141

सर्व भाषांमध्ये काही समान गुण-धर्म असतात. त्यांना काय म्हणतात?

  1. (1) द्वैभाषिकता (Diglossia)
  2. (2) भाषा सार्वत्रिकता (Language Universals)
  3. (3) प्रयुक्ती (Register)
  4. (4) बोली (Dialect)
See answer and solution
Q142

वर्गात भाषा विविधतेचा स्वीकार म्हणजे...

  1. (1) भाषिक अस्खलितता प्राप्त करण्यात अडथळा.
  2. (2) विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि कल्पकतेत ऱ्हास होतो ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळतो.
  3. (3) याचा भाषा शिकण्यावर काहीही परिणाम होत नाही.
  4. (4) विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि कल्पकता यात वाढ होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
See answer and solution
Q143

उदयोन्युख साक्षरतेमध्ये छापिल साहित्याविषयी जागरुकता नसल्याचे वैशिष्ट्य असलेला पूढीलपैकी कोणता पर्याय आहे?

  1. (1) पुस्तकाची हाताळणी
  2. (2) अक्षरे आणि शब्दातील फरक ओळखणे
  3. (3) डावीकडून उजवीकडे आणि वरपासून तळापर्यंत वाचन केल्या जाते
  4. (4) पूर्ण वाक्य वाचल्या जाते
See answer and solution
Q144

सुरूवातीच्या पातळीवर केलेल्या वाचनकौशल्याची फलनिष्पत्ती पुढे दिलेली आहे
A. लहान उताऱ्याचे वाचन अगदी बरोबर आणि अस्खलीतपणे आवाजाच्या योग्य चढ उतारासह, योग्य तेथे विराम घेऊन आणि आवाजातील योग्य तो बदलासह केले जाते.
B. परिचित शब्द असलेल्या वाक्यांचे वाचन स्पष्टपणे केले जाते.
C. लहान उताऱ्याचे वाचन स्पष्टपणे, आवाजतील योग्य चढ उतारासह आणि योग्य तेथे विराम घेऊन केले जाते.
विकासाच्या क्रमानुसार उपरोक्त मुद्यांची मांडणी करा

  1. (1) A, B, C
  2. (2) B, C, A
  3. (3) A, C, B
  4. (4) C, A, B
See answer and solution
Q145

पुढीलपैकी कोणता पर्याय हा ‘विस्तृत श्रवणाचा’ भाग नाही?

  1. (1) ढोबळमानाने श्रवण करणे
  2. (2) मुख्य कल्पनेसाठी श्रवण करणे
  3. (3) निष्कर्ष काढणे
  4. (4) निश्चित तथ्य आणि माहितीसाठी श्रवण करणे
See answer and solution
Q146

वाचन कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती कृती केल्या जात नाही?

  1. (1) मोठ्याने वाचन करणे
  2. (2) बहुपर्यायी प्रश्न असलेल्या वाक्याचे वाचन करणे
  3. (3) सूचक चिन्हात असलेल्या चित्रातून शब्द ओळखणे
  4. (4) कथा कथन वर्गाचे शिक्षिके-कडून आयोजन करणे
See answer and solution
Q147

पुढीलपैकी कोणते कथन योग्यपणे ‘धावते मजकूर कथन’ करणे स्पष्ट करते?

  1. (1) विद्यार्थी मजकुराचे विविध भाग ऐकतात किंवा वाचतात, त्यानंतर दिलेली कृतीपूर्ण करण्यासाठी माहितीचे एकमेकांसोबत आदान-प्रदान करतात
  2. (2) विद्यार्थी जोडीने कार्य करतात. मजकुराचा अर्ध्या भागात विभाजन केले जाते. एक विद्यार्थी त्याच्या सोबत्यासाठी वाचन करतो तेव्हा दुसरा सोबती लेखन करतो. दोघेही पूर्ण मजकुरासाठी कार्य करतात.
  3. (3) विद्यार्थी जोडीने कार्य करतात. एक विद्यार्थी धावत्या मजकुराचा अनुकरण करतो आणि सोबत्याला तो सांगतो. सोबती त्याचे लेखन करतो.
  4. (4) शिक्षक वर्गातील विद्यार्थांना शब्द/वाक्याचे धावते मजकूर कथन करतात आणि विद्यार्थी त्याची नोंद घेतात.
See answer and solution
Q148

‘लहान मूल भाषा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता घेऊन जन्माला येतं.’ भाषा ग्रहण करण्याच्या या कल्पनेला पुढीलपैकी कशाचे समर्थन आहे?

  1. (1) देशीवादी (Nativist)
  2. (2) बौद्धिकतावादी (Cognitivist)
  3. (3) सामाजिक संबंधवादी (Social interactionist)
  4. (4) वर्तणूकवादी (Behaviourist)
See answer and solution
Q149

प्रक्रिया लेखनपद्धतीमध्ये, लेखन प्रक्रियेतील ठळक घटक लेखक औपचारिकपणे त्याचे काम म्हणून मोठ्या श्रोतावर्गापूढे सादर करतो. त्याला पूढीलपैकी काय म्हणता येईल?

  1. (1) प्रारूपलेखन (Drafting)
  2. (2) प्रकाशन (Publication)
  3. (3) संपादन (Editing)
  4. (4) उजळणी (Revising)
See answer and solution
Q150

मजकुरातील कठीण शब्दाची हाताळणी करण्यासाठी, भाषा शिक्षक अशा शब्दांना मातृभाषेत भाषांतरीत करतात आणि नंतर ते शब्द विद्यार्थ्यांना पाठ करायला सांगतात. यासाठी वापरलेल्या पद्धतीला पुढीलपैकी काय म्हणतात?

  1. (1) व्याकरण भाषांतर पद्धती (Grammar translation method)
  2. (2) प्रत्यक्ष पद्धती (Direct method)
  3. (3) संरचना पद्धती (Structural approach)
  4. (4) संभाषणात्मक पद्धती (Communicative approach)
See answer and solution