By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 2 Marathi, Question 101

Topic: Poem comprehension

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थासही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लाभायचा अन मनासारखे शब्दही यायचे
नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे
निघोनी घरी शेवटी जात असता वळुनी कितीदा तरी पहायचे
उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबात ही दुखः दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता, नभाला किती खिन्न वाटायचे
असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे
ऋतुंना ऋतुंनी जरा भागिले की नव्याने जुने झाड उगवायचे.
मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे
मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे.
आता सांजवेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे
आता पाऊलेही दुःखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे.

Q101

कवीच्या मते आकाशाला केव्हा नैराश्य यायचे?

  1. (1) मनासारखा अर्थ लाभल्यावर
  2. (2) तारा निखळल्यावरCorrect answer
  3. (3) सांजवेळ होताना
  4. (4) पावसाळ्यात

Solution.

CBSE answer: (2)

उत्तर: (2) तारा निखळल्यावर

  1. कवितेची ओळ आहे: ‘जरा एक तारा कुठेही निखळता, नभाला किती खिन्न वाटायचे’.
  2. ‘नभ’ म्हणजे आकाश आणि ‘खिन्न’ म्हणजे उदास, निराश.
  3. म्हणून एक तारा निखळला तरी आकाश उदास व्हायचे.

सावधान: सांजवेळ आणि पावसाळा कवितेत येतात, पण आकाशाच्या खिन्नतेशी त्यांचा संबंध नाही.