By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 2 Marathi, Question 102

Topic: Grammar

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थासही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लाभायचा अन मनासारखे शब्दही यायचे
नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे
निघोनी घरी शेवटी जात असता वळुनी कितीदा तरी पहायचे
उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबात ही दुखः दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता, नभाला किती खिन्न वाटायचे
असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे
ऋतुंना ऋतुंनी जरा भागिले की नव्याने जुने झाड उगवायचे.
मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे
मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे.
आता सांजवेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे
आता पाऊलेही दुःखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे.

Q102

पुढीलपैकी विशेषनाम कोणते?

  1. (1) घर
  2. (2) दिशा
  3. (3) चंद्रCorrect answer
  4. (4) ऋतू

Solution.

CBSE answer: (3)

उत्तर: (3) चंद्र

  1. विशेषनाम एकाच विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा स्थळाचे नाव असते.
  2. चंद्र (पृथ्वीचा) एकच आहे, म्हणून मराठी व्याकरणात सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना विशेषनाम मानले जाते.
  3. घर, दिशा, ऋतू ही नावे त्या जातीतील प्रत्येक वस्तूला लागू होतात, म्हणून ती सामान्यनामे आहेत.

सावधान: ‘ऋतू’ विशिष्ट वाटतो, पण सहाही ऋतूंना लागू होणारे ते सामान्यनाम आहे.