भोवती चंद्र नसताही कोणती गोष्ट कवीच्या अनुभवास येत असे?
- (1) खिन्नता
- (2) दिशाहीनता
- (3) निरर्थकता
- (4) शुभ्रता
सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थासही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लाभायचा अन मनासारखे शब्दही यायचे
नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे
निघोनी घरी शेवटी जात असता वळुनी कितीदा तरी पहायचे
उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबात ही दुखः दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता, नभाला किती खिन्न वाटायचे
असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे
ऋतुंना ऋतुंनी जरा भागिले की नव्याने जुने झाड उगवायचे.
मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे
मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे.
आता सांजवेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे
आता पाऊलेही दुःखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे.
भोवती चंद्र नसताही कोणती गोष्ट कवीच्या अनुभवास येत असे?
CBSE answer: (4)
उत्तर: (4) शुभ्रता
सावधान: ‘खिन्न’ हा शब्द आकाशासाठी आणि ‘दिशाहीन’ हा आताच्या सांजवेळेसाठी आला आहे, चंद्राच्या ओळीत नाही.