By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 2 Marathi, Question 104

Topic: Poem comprehension

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थासही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लाभायचा अन मनासारखे शब्दही यायचे
नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे
निघोनी घरी शेवटी जात असता वळुनी कितीदा तरी पहायचे
उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबात ही दुखः दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता, नभाला किती खिन्न वाटायचे
असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे
ऋतुंना ऋतुंनी जरा भागिले की नव्याने जुने झाड उगवायचे.
मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे
मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे.
आता सांजवेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे
आता पाऊलेही दुःखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे.

Q104

जुने झाड नव्याने केव्हा उगवायचे?

  1. (1) ऋतूंना ऋतूंनी भागिल्यावरCorrect answer
  2. (2) पाऊले दुःखू लागल्यावर
  3. (3) मनात काळोख दाटल्यावर
  4. (4) मनासारखे शब्द आल्यावर

Solution.

CBSE answer: (1)

उत्तर: (1) ऋतूंना ऋतूंनी भागिल्यावर

  1. कवितेची ओळ: ‘ऋतुंना ऋतुंनी जरा भागिले की नव्याने जुने झाड उगवायचे’.
  2. म्हणजे एक ऋतू संपून दुसरा आला की तेच जुने झाड पुन्हा नवे होऊन बहरायचे.

सावधान: पाऊले दुःखणे हा कवीचा आताचा अनुभव आहे; त्याचा झाडाशी संबंध नाही.