By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 2 Marathi, Question 105

Topic: Poem comprehension

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थासही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लाभायचा अन मनासारखे शब्दही यायचे
नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे
निघोनी घरी शेवटी जात असता वळुनी कितीदा तरी पहायचे
उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबात ही दुखः दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता, नभाला किती खिन्न वाटायचे
असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे
ऋतुंना ऋतुंनी जरा भागिले की नव्याने जुने झाड उगवायचे.
मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे
मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे.
आता सांजवेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे
आता पाऊलेही दुःखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे.

Q105

कवीच्या मते अबोलपणे व्यक्त होण्याचे विशेष कोणत्या घटकांचे?

  1. (1) तारा-नभ
  2. (2) ऋतू-झाड
  3. (3) काळोख-काजवे
  4. (4) नदी-सागराचे तटCorrect answer

Solution.

CBSE answer: (4)

उत्तर: (4) नदी-सागराचे तट

  1. ‘अबोलपणे’ म्हणजे न बोलता, मूकपणे.
  2. ओळ आहे: ‘नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे’.
  3. ‘मुक्याने बोलणे’ म्हणजेच अबोलपणे व्यक्त होणे; ‘किनारे’ म्हणजे तट.

सावधान: तारा-नभ ही जोडी खिन्नतेशी आणि काळोख-काजवे ही जोडी मनाच्या अवस्थेशी जोडलेली आहे.