By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 2 Marathi, Question 100

Topic: Vocabulary

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थासही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लाभायचा अन मनासारखे शब्दही यायचे
नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे
निघोनी घरी शेवटी जात असता वळुनी कितीदा तरी पहायचे
उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबात ही दुखः दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता, नभाला किती खिन्न वाटायचे
असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे
ऋतुंना ऋतुंनी जरा भागिले की नव्याने जुने झाड उगवायचे.
मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे
मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे.
आता सांजवेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे
आता पाऊलेही दुःखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे.

Q100

‘उर’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

  1. (1) हृदयCorrect answer
  2. (2) जत्रा
  3. (3) शिल्लक
  4. (4) आशा

Solution.

CBSE answer: (1)

उत्तर: (1) हृदय

  1. ‘उर’ म्हणजे छाती, वक्षस्थळ; भावनेच्या अर्थाने हृदय.
  2. कवितेतील ‘उरी घ्यायचे’ म्हणजे छातीशी, हृदयाशी कवटाळणे.
  3. दिलेल्या पर्यायांपैकी हाच अर्थ जुळतो.
  4. कवितेत दुःखी पावलांना कवी जवळ घेतो, म्हणजे त्यांना प्रेमाने हृदयाशी धरतो.

सावधान: जत्रा, शिल्लक, आशा यांचा ‘उर’ शब्दाशी अर्थाने काहीही संबंध नाही.