By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 2 Marathi, Question 99

Topic: Reading comprehension

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
लहानपणी पक्ष्यांची रंगीत पिसे गोळा करताना आपल्या मनात अनेक प्रश्न आले असतील की, इतके सुंदर रंग पक्ष्यांनाच का? पोपटाचा हिरवागार, खंड्या पक्ष्याचा सुंदर निळा, रोहित पक्ष्याचा गुलाबी, भारद्वाज पक्ष्याचा केशरी आणि मोराचे तर मनमोहक मोरपंखी, गडद निळा, हिरवा, केशरी असे अनेक रंग... पक्षी हे रंग कसे ‘तयार’ करत असतील? ह्या रंगांचा त्यांना उपयोग काय? माणसांना किंवा इतर प्राण्यांना असे रंग का नाहीत? असे रंग तयार करता येतात का?
पक्ष्यांच्या या वेगवेगळ्या रंगांचे गुपित सरळ साधे नाहीये. पिसांच्या अनेक रंगांपैकी निळा आणि त्याच्या अनेक छटा बहुतेक वेळा पिसांच्या सूक्ष्म रचनेमुळे निर्माण होतात. प्रकाश जेव्हा पिसांच्या विशिष्ट सूक्ष्म रचनेच्या पृष्टभागावरून परावर्तित होतो, तेव्हा त्या पिसांना निळ्या रंगाच्या छटा येतात. मोराचा झळाळता निळा, हिरवा, मोरपंखी रंग त्याच्या शरीरावरील पिसांच्या अशाच प्रकारच्या सुक्ष्म रचनेमुळे तयार होतो. त्या सूक्ष्म रचनांवर प्रकाश किती, कुठल्या कोनात पडतो आणि कसा परावर्तित होतो, त्यानुसार हे रंग बदलते किंवा झळाळते दिसतात. पिवळा, लाल असे इतर रंग मात्र केरॉटेनोइड नावाच्या रंगद्रव्यापासून मिळतात. महत्त्वाची गोष्ठ अशी की बहुतेक सर्व पक्ष्यांना ही रंगद्रव्ये त्यांच्या शरीरात तयार करता येत नाहीत. त्यांच्या खाण्यातून त्यांना ही रंगद्रव्ये मिळवावी लागतात. उदाहरणार्थ, रोहित पक्ष्यांचा सुंदर गुलाबी-केशरी रंग मोठ्या प्रमाणावर कोळंबी खाऊन, त्यातील घटकांपासून मिळतो. मात्र याला अपवाद आहे पोपटांचा. पिसांच्या रंगांच्या उत्क्रांतीच्या संदर्भात पाहिले, तर पोपटांचा गट पक्ष्यांच्या इतर गटांपेक्षा वेगळा आहे. कारण पोपट गटातील पक्ष्यांमध्ये रंगद्रव्य शरीरात तयार करण्याची क्षमता आहे. पोपटांच्या लोकप्रियतेमधील महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांचे चित्ताकर्षक रंग! पोपटांच्या सगळ्या जातींमध्ये नर आणि मादी यांच्या रंगात आणि दिसण्यात फार फरक नसतो, पण वेगवेगळ्या जातींमध्ये आकार आणि रंग दोन्हीत खूप वैविध्य आहे.
पोपटांना फार दूरवर उडता येत नाही. ते थव्याने राहणारे पक्षी आहेत. पोपटांच्या अनेक जाती 30-40 वर्षे जगू शकतात. इतर प्राण्यांच्या, तसेच माणसांच्या आवाजाची नक्कल करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. पकडून पिंजऱ्यात ठेवले, तरी ते अनेक वर्ष जगतात. या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे पाळीव पक्षी म्हणून पोपटांना जगभर मागणी असते. वर्ष 2011 मध्ये केलेल्या गणनेनुसार सुमारे पाच कोटी, म्हणजे जगातले जवळजवळ निम्मे पोपट पाळीव अवस्थेतच आहेत.

Q99

उताऱ्यातून प्रमुख्याने कोणत्या बाबीवर चर्चा करण्यात आली आहे?

  1. (1) पक्ष्यांची चित्ताकर्षक रंगसंगती
  2. (2) पोपट आणि इतर पक्ष्यांची बुद्धिमत्ता
  3. (3) पोपटांची पाळीव अवस्था
  4. (4) पक्ष्यांचे रंग यामागील जैविक आणि वैज्ञानिक कारणांचे स्पष्टीकरणCorrect answer

Solution.

CBSE answer: (4)

उत्तर: (4) पक्ष्यांचे रंग यामागील जैविक आणि वैज्ञानिक कारणांचे स्पष्टीकरण

  1. उतारा ‘पक्षी हे रंग कसे ‘तयार’ करत असतील?’, ‘ह्या रंगांचा त्यांना उपयोग काय?’ अशा प्रश्नांनी सुरू होतो.
  2. पुढे सूक्ष्म रचनेवरून परावर्तित प्रकाश, खाद्यातून मिळणारी कॅरोटेनोइड रंगद्रव्ये आणि पोपटांची रंगद्रव्य तयार करण्याची क्षमता, अशी कारणे दिली आहेत.

सावधान: (1) रंगांचे फक्त वर्णन सांगतो, पण उताऱ्याचा भर रंगांच्या कारणांवर आहे; (3) शेवटचा एक छोटा मुद्दा आहे.