‘आढावा’ शब्दाचा नेमका अर्थ कोणता?
- (1) सातव्या नंतर येणारा संख्याक्रम
- (2) मिजासखोरी किंवा डौल
- (3) घटना किंवा त्याच्या परिणामांची स्थूलमानाने माहिती
- (4) एखाद्या क्रियेची प्रतिक्रिया
सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
अमेरिकेमध्ये उपलब्ध असलेल्या इंटरनेटच्या सरासरी वेगापेक्षा तब्बल 40 लाख पट जास्त वेगाचं इंटरनेट प्रायोगिक तत्त्वावर जपानमध्ये उपलब्ध झाल्याच्या बातमीने अलीकडे मोठी खळबळ माजवली आहे. प्रतिसेकंद तब्बल 1,25,000 गिगाबाइट्स अशा अभूतपूर्व वेगाने तब्बल 1802 किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत माहिती पाठवून या तंत्रज्ञानाद्वारे इंटरनेटच्या वेगामध्ये अशक्यप्राय वाटेल अशी क्रांती घडल्याचा दावा केला गेला आहे. या निमित्ताने मुळात इंटरनेटचा वेग कशामुळे वाढू शकतो आणि आजवर त्यामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत, याचा आढावा घेणं रंजक ठरेल.
संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी ‘बिट’ आणि ‘बाइट’ अशा दोन शब्दांचा वापर केला जातो. तसंच संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी फक्त शून्य आणि एक या दोनच अंकांचा वापर केला जातो. माहिती साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक शून्य किंवा एक या अंकालाच बिट म्हणतात. बिट म्हणजे ‘बायनरी डिजिट’, म्हणजेच 0 किंवा 1. अशा आठ बिट्सच्या समूहाला बाइट असं म्हटलं जातं. यामुळेच माहिती एकीकडून दुसरीकडे पाठवण्यासाठी अशाच प्रकारच्या संज्ञा वापरल्या जातात. उदाहरणार्थ, समजा, एका संगणकामधून दुसऱ्या संगणकाकडे आपण एक फाइल पाठवली. या फाइलमधली माहिती किती वेगाने एकीकडून दुसरीकडे गेली, हे मोजण्यासाठी ‘बिट्स पर सेकंद’ (बीपीएस) हे एकक वापरलं जातं. आता समजा, एका सेकंदात अशी 1024 बिट्स एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकाकडे गेली, तर हा वेग प्रतिसेकंद 1024 बिट्स म्हणजेच एक किलोबिट असा झाला. आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये एक किलो म्हणजे 1000 असा हिशेब असतो. संगणकांच्या जगात मात्र द्विमान पद्धती वापरात असल्याने, त्यानुसारचा एक किलो म्हणजे 1024 असा हिशेब केला जातो. त्या पुढच्या एककांना मेगाबिट, गिगाबिट अशा संज्ञा वापरल्या जातात. अर्थातच मेगाबिट हे किलोबिटपेक्षा जास्त वेगवान, तर गिगाबिट हे मेगाबिटपेक्षा जास्त वेगवान असा हिशेब असतो. उदाहरणार्थ, 1 मेगाबिटमध्ये म्हणजे 10 लाखांहून जास्त बिट्स असतात. हाच वेग आपलं इंटरनेट किती वेगवान आहे, हेसुद्धा ठरवतो. पण याची सुरूवात नेमकी कशी झाली?
इंटरनेटवरची माहिती वाहून नेण्यासाठी पूर्वीच्या काळी, आपण ज्याला आता ‘लँडलाइन’ दुरध्वनीची व्यवस्था म्हणतो, अशा रचनेचाच वापर केला जात असे. याचं कारण म्हणजे दुरध्वनीची यंत्रणा अनेक दशकांपासून अस्तित्वात होती आणि याच यंत्रणेचा वापर इंटरनेटवरची माहिती वाहून नेण्यासाठी केला जावा, अशी सुपीक कल्पना तंत्रज्ञांच्या मनात आली. तांत्रिक भाषेत सांगायचं, तर माणसाचा आवाज एकीकडून दुसरीकडे नेण्यासाठी हे तंत्रज्ञान उभं करण्यात आलेलं होतं; आता मात्र संगणकांवरची माहिती म्हणजेच डेटा एकीकडून दुसरीकडे नेण्यासाठी त्याचा वापर व्हायला लागला. हा वेग काही प्रति सेकंदाला काही किलोबिट्स म्हणजे केबीपीएस इतका असे. जास्तीत जास्त 64 किलोबिट्स प्रतिसेकंद इतक्या वेगाने त्या वेळी इंटरनेट चालू शकायचं.
‘आढावा’ शब्दाचा नेमका अर्थ कोणता?
CBSE answer: (3)
उत्तर: (3) घटना किंवा त्याच्या परिणामांची स्थूलमानाने माहिती
सावधान: पर्याय (1) ‘आठवा’ (सातव्यानंतरचा क्रम) या शब्दाशी उच्चारसाम्य दाखवून गोंधळ करतो.