By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 2 Marathi, Question 110

Topic: Multilingualism

Q110

आधारभूत पातळीसाठीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (2022) नुसार बहुभाषिकतेच्या संबंधीचा महत्त्वाचा सिद्धांत कोणता?

  1. (1) वर्गातील बहुभाषिक स्वरुपामुळे अभ्यासक्रमाच्या देवाण-घेवाण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.
  2. (2) मुलांना सुरूवातीच्या वर्षांमध्ये एकापेक्षा अधिक मौखिकभाषा आत्मसात करता येत नाही.
  3. (3) बहुभाषिकतेचे ज्ञानात्मक आणि समाज सांस्कृतिक दोन्ही प्रकारचे लाभ आहेत.Correct answer
  4. (4) मुलांना त्यांची घरगुती भाषा विसरुन जायला मदत करणे आणि शाळेचा भर मुलांनी शाळेची भाषा शिकावी यावर असला पाहिजे.

Solution.

CBSE answer: (3)

उत्तर: (3) बहुभाषिकतेचे ज्ञानात्मक आणि समाज सांस्कृतिक दोन्ही प्रकारचे लाभ आहेत.

  1. आधारभूत पातळीचा आराखडा (2022) बहुभाषिकतेला अडथळा नव्हे तर संसाधन मानतो.
  2. अनेक भाषा येणाऱ्या मुलांचा विचार लवचिक होतो आणि वेगवेगळ्या समाजांशी नाते जुळते.
  3. लहान मुले एकाच वेळी अनेक भाषा सहज आत्मसात करतात, म्हणून (2) चूक.

सावधान: (4) घरची भाषा विसरायला लावणे हे आराखड्याच्या पूर्ण विरोधात आहे.