By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 2 Marathi, Question 123

Topic: Grammar

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

‘जीवो जीवस्य जीवनम्’ हा पृथ्वीवरचा नियम आहे. तद्वतच कोणीतरी भक्ष्य असती, तर कोणी त्याचा भक्षक असतो. ही भक्ष्य-भक्षकांची नाती अन्नसाखळी आणि अन्नजाळी निर्माण करत असतात. कोणत्याही परिसंस्थेत संतुलन राहण्यासाठी या अन्नसाखळ्या मदत करत असतात. पण आपला जीव वाचवण्यासाठी हे भक्ष्य प्राणी अनेकविध उपाय योजत असतात, तर भक्षकदेखील भक्ष्याला न कळता त्यावर घाला घालण्यासाठी आपले नियोजन करत असतात. आपापल्या परिसरात मिसळून जाण्यासाठी प्राणी अनेक प्रकारची अनुकूलने दाखवत असतात. त्यात शरीराचा रंग, गंध, आकार, स्वरूप, त्यांची चाल अशा मुद्यांचा अनेक अंतर्भाव होतो.

या सर्वात सामान्यतः केला जाणारा उपाय म्हणजे स्वतःची रंगसंगती निसर्गात बेमालूमपणे मिसळणे, जेणेकरून आपल्या भक्षकाच्या नजरेस न पडणे. तसेच भक्ष्याला कळणार नाही अशा पद्धतीने भक्षकदेखील लपालपी करतात. निसर्गात रंगांची रेलचेल वनस्पतींत खूपच जास्त दिसते, पण प्राणिजगतातदेखील विविध रंगद्रव्ये, त्यांचे प्रमाण, प्रसार आणि संगती यावरून त्यांचा रंग ठरतो. काही जलचर आणि पक्षी, या वर्गात निसर्गाने मुक्त हस्ते रंगांची उधळण केली आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर आपला राष्ट्रीय पक्षी मोर. मोर-नरामध्ये खूप तऱ्हेतऱ्हेचे रंग दिसतात. लांडोर त्या मानाने रंगहीन असते. पक्षिजगतात नर हे जास्त प्रमाणात रंगीत पिसाऱ्याचे असतात. मूलतः प्रणयाराधनाच्या वेळा मादीचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही रंगाची उधळण दिसते. त्याउलट पिल्ले मात्र फिकट रंगाची दिसतात, कारण त्यांच्याकडे कोणाचे लक्ष जाऊ नये.

सरीसृप वर्गात अनेक प्रकारचे साप, सरडे असे भूचर प्राणी वेगळ्या पद्धतीने आपल्या रंगाचा वापर करतात. साप जितका विषारी, तितका तो स्वतःच्या विषारीपणाची जणू जाहिरातच करतो. डौलदार फणा, त्यावरचा दहाचा आकडा. रंगाने पिवळाधम्मक असा नाग आपले अस्तित्व इतर जगाला दाखवून देण्यासाठीच सावकाश सरपटत जातो आणि आपल्या फण्याचेदेखील प्रदर्शन करतो. असे प्राणी जे त्यांच्या भडक रंगाचे प्रदर्शन करतात, ते धोक्याची सूचना देत असल्याने अशा रंगसंगतीला इंग्लिशमध्ये ‘वॉर्निंग कलरेशन’ असे म्हणतात.

स्वतः विषारी असणारे प्राणी त्यांच्या रंगाद्वारे अशी जाहिरात करून जणू काही ‘आमच्यापासून दूर राहा’ असे इतरांना बजावत असतात. त्याउलट दुबळे प्राणी निसर्गात लपून जाण्यासाठी ‘कॅमोफ्लॅज किंवा क्रिप्टिक कलरेशन’ दर्शवतात. कॅमोफ्लॅज म्हणजेच छद्मावरण! हे भक्षकापासून वाचण्यासाठी उपयुक्त ठरते. शिवाय भक्ष्याला पत्ता न लागू देता त्याला सहज टिपण्यासाठीदेखील काही भक्षक असे छद्मावरण वापरतात. कमीलियन सरडा या बाबतीत सर्वश्रुत आहे. उत्क्रांतीच्या प्रदीर्घ प्रवासात या रंगसंगतीला महत्त्व आहे. डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धान्तानुसार जी जाती, प्रजाती आपल्या परिसराशी अनुकूलित होते, ती या जगण्याच्या रेट्यात यशस्वी होते. जी प्रजाती आपले वंशसातत्य टिकवू शकते, ती उत्क्रांत होते.

Q123

‘साप सावकाश सरपटत जातो.’ वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा

  1. (1) शब्दयोगी अव्यय
  2. (2) उभयान्वयी अव्यय
  3. (3) क्रियाविशेषण अव्ययCorrect answer
  4. (4) कालवाचक विशेषण

Solution.

CBSE answer: (3)

उत्तर: (3) क्रियाविशेषण अव्यय

  1. ‘साप कसा जातो?’ असा प्रश्न विचारला तर उत्तर मिळते ‘सरपटत’.
  2. म्हणजे हा शब्द ‘जातो’ या क्रियापदाची रीत सांगतो; क्रियेबद्दल माहिती देणारा अविकारी शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय.
  3. हा शब्द धातूपासून (सरपट) बनलेला असून रीतिवाचक क्रियाविशेषणाचे काम करतो.

सावधान: शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येते, आणि ‘विशेषण’ नामाचे वर्णन करते; इथे दोन्ही लागू नाहीत.