By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 14 Dec 2024 Paper 1 Marathi Language Question Paper with Answer Key

You are reading the question paper with answers. This is not the timed test: no clock is running and nothing is being scored.

Go to the timed test →

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्याय निवडा :

लग्नानंतर एकदा आईच्या घरी गेले तेव्हा झाडं अगदी बेचैन असल्यासारखी वाटली, उदास वाटली. त्याची जणू वाढच खुंटली होती. अशी कंटाळलेली झाडं मी कधीच पाहिली नव्हती. मला पूर्वी कधीतरी वाचलेली एक आदिवासींची कथा आठवली. जंगलात राहणाऱ्या एका आदिवासी समाजात एक प्रथा आहे. एखादं झाड त्यांना नको असेल तर ते तोडून–छाटून नष्ट करत नाहीत. ते सगळे मिळून रोज त्या नको असलेल्या झाडाजवळ जातात आणि त्याला मनसोक्त शिवीगाळ करतात, दूषण देतात. हळूहळू ते झाड आपोआपच सुकून मरून जातं.

झाडांना बोलता येत नसलं तरी भाषा समजते. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शिकलेली माझी एक मैत्रीण तासन् तास झाडांशी बोलते, त्यांची चौकशी करते, त्यांना थोपटते, गोंजारते. अनेकदा स्वतःचं मन झाडांपाशी मोकळंही करते. ती म्हणते, ‘झाडांना कधीच रागावण्याची किंवा मारण्याची वेळ येत नाही, ती शहाणीच असतात.’ मग माणूसच असा का?

माणसाचं छोटंसं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचं रूप किती निरागस असतं. बीजामधून नुकत्याच अंकुरलेल्या दोन कोवळ्या पोपटी पानांसारखं. निरसं रूप म्हणू या त्याला! कुठल्याही भाव–भावनांचा स्पर्श न झालेलं. व्यवहारी विश्वात संचार करणाऱ्या आपल्या आईच्या उदरात सुरक्षितपणे राहणारा तो जीव म्हणजे निसर्गाचं मानवप्राण्याच्या जीवनचक्रातलं सर्वात सुंदर, सर्वात निर्मळ रूप! सत्य–असत्य, व्यवहार–व्यापार ह्या कशाचाही स्पर्श न झालेलं. त्यालाही सत्यच प्रिय असतं. त्याच्या दृष्टीने सत्य म्हणजे त्याची माता. निसर्गाच्या विलक्षण निकट असलेली किंबहुना निसर्गाशी प्रामाणिक असलेली अशी त्याची आई. अंकुरणाऱ्या बिजाला, जशी माती तशी तान्हुल्याला माता! जसजसं मूल मोठं होतं तसं ह्या व्यवहारी जगात तरबेजपणाने जगणारी माणसं, त्याच्या अवतीभवतीचे आपण सगळेच त्याला निसर्गापासून दूर नेतो. प्रत्येक सजीवाला ‘आतला आवाज’ असतो. त्याच्यातल्या संजीवनतेचं, चैतन्याचं ते रूप असतं. प्रत्येक सजीवाला मूलतः त्या आतल्या आवाजाचं आकर्षण असतंच; पण दिवसांगणिक वाढणाऱ्या त्या बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारी जगात खेचतो. इथली मूल्यं फारच वेगळी असतात. इथलं जीवन हे व्यवहारमय झालेलं असतं.

Q91

‘पण दिवसांगणिक वाढणाऱ्या त्या बाळाला’ यातील अधोरेखित काय आहे ?

  1. (1) कर्ता
  2. (2) न्यूनत्वबोध अव्यय
  3. (3) क्रियापद
  4. (4) कर्म
See answer and solution
Q92

‘बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारी जगात खेचतो.’ यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा.

  1. (1) सकर्मक क्रियापद
  2. (2) अकर्मक क्रियापद
  3. (3) साधीत क्रियापद
  4. (4) प्रायोजक क्रियापद
See answer and solution
Q93

पुढीलपैकी विरुद्ध अर्थ देणारी शब्दजोडी ओळखा.

  1. (1) सत्य – असत्य
  2. (2) भाव – भावना
  3. (3) व्यवहार – व्यापार
  4. (4) सुंदर – निर्मळ
See answer and solution
Q94

लेखिकेच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं ?

  1. (1) सत्य–असत्याची जाण असलेलं
  2. (2) स्पर्शाची जाण असलेलं
  3. (3) कोवळ्या पोपटी पानासारखं
  4. (4) भाव–भावनांचा स्पर्श झालेलं
See answer and solution
Q95

‘सर्वात निर्मळ रूप’ यातील निर्मळ काय आहे ?

  1. (1) कर्म
  2. (2) अव्यय
  3. (3) विशेषण
  4. (4) कर्ता
See answer and solution
Q96

झाड नको असेल तर आदिवासी काय करतात ?

  1. (1) झाडांना खत घालीत नाही.
  2. (2) झाडांवर अधिक प्रेम करतात.
  3. (3) झाडांना दूषण देतात.
  4. (4) झाडांना पाणी घालीत नाही.
See answer and solution
Q97

लेखिकेची मैत्रीण झाडांशी पुढीलपैकी काय करीत नाही ?

  1. (1) झाडांना थोपटते.
  2. (2) झाडांना रागवते.
  3. (3) झाडांशी बोलते.
  4. (4) झाडांजवळ मन मोकळं करते.
See answer and solution
Q98

‘निरागस’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

  1. (1) पारदर्शी
  2. (2) निष्पाप
  3. (3) प्रांजळ
  4. (4) आकस
See answer and solution
Q99

बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे ________.

  1. (1) त्याची आई
  2. (2) व्यावहारिक सत्य
  3. (3) निसर्ग
  4. (4) विश्व
See answer and solution

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा :

रात्र अशी सुनसान, उदासी घेउनिया पाऊस आला,
सांग कुणाचे व्याकुळ डोळे घेउनिया पाऊस आला ?

तुझ्या घरावर, कौलारावर असेल बरसत या वेळी,
हाक तुझी भिजलेली ओली घेउनिया पाऊस आला.

पुस्तकात मिटुनी सुकलेले फूल कुणितरी ठेवियले
तशा स्मृती मिटलेल्या हळव्या घेउनिया पाऊस आला.

घेतलास तू निरोप माझा तेव्हा मिटल्या डोळ्यांनी,
मौन तुझे ओथंबुन भरले घेउनिया पाऊस आला.

Q100

‘तुझ्या घरावर, कौलारावर असेल बरसत’ यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा.

  1. (1) केवलप्रयोगी अव्यय
  2. (2) क्रियाविशेषण
  3. (3) उभयान्वयी अव्यय
  4. (4) शब्दयोगी अव्यय
See answer and solution
Q101

‘घेऊनिया पाऊस आला’ यातील ‘पाऊस’ काय आहे ?

  1. (1) कर्ता
  2. (2) नाम
  3. (3) समुहवाचक नाम
  4. (4) विशेषनाम
See answer and solution
Q102

‘मौन तुझे ओथंबुन भरले’ यातील ‘ओथंबुन’ म्हणजे ________.

  1. (1) पूर्ण भरले
  2. (2) मिटल्या डोळ्यांनी भरले
  3. (3) काठोकाठ भरले
  4. (4) अर्धे भरले
See answer and solution
Q103

कवीच्या मते आलेला पाऊस कशाचे प्रतीक आहे ?

  1. (1) घेतलेल्या निरोपाचे
  2. (2) मनातील आनंदाचे
  3. (3) उदासिनतेचे
  4. (4) सुकलेल्या फुलाचे
See answer and solution
Q104

प्रस्तुत कवितेतून कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केले आहे ?

  1. (1) स्वर्ग सुखाचा आनंद
  2. (2) फुलांचे महत्त्व
  3. (3) विरहभावना
  4. (4) पावसाचा निरामय आनंद
See answer and solution
Q105

आलेला पाऊस पुढीलपैकी काय घेऊन आलेला नाही ?

  1. (1) ओथंबलेले मन
  2. (2) आनंदाचे गाणे
  3. (3) व्याकूळ डोळे
  4. (4) भिजलेली हाक
See answer and solution
Q106

मातृभाषाधारित बहुभाषिकत्त्व कशाचा पुरस्कार करते ?

  1. (1) सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात.
  2. (2) सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिन्दी शिकतात.
  3. (3) सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा/घरची भाषा याने करावी.
  4. (4) सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात प्रदेशाची भाषा यापासून करतात.
See answer and solution
Q107

संहिता आकलनाच्या पद्धतींच्या संदर्भातले चुकीचे विधान शोधा ?

  1. (1) चाळणे हे फेरपाहणीसाठी योग्य आहे, तर न्याहाळणे विशिष्ट उत्तर शोधण्यास मदत करते.
  2. (2) चाळणे आणि न्याहाळणे या दोन्हीत जलदपणे मजकुरावर दृष्टिक्षेप अपेक्षित असते.
  3. (3) चाळणे (Skimming) या प्रक्रियेत मजकूर भरभर पाहिला जातो, तर न्याहाळणे (Scanning) यात विशिष्ट माहिती शोधली जाते.
  4. (4) चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे, तर न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन.
See answer and solution
Q108

जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनांबद्दल विचारतात तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात ?

  1. (1) सूचनात्मक
  2. (2) स्वयंशोध
  3. (3) काल्पनिक
  4. (4) नियंत्रित
See answer and solution
Q109

मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यांमुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्त्वात नसलेल्या वस्तू, घटनांबद्दल बोलू शकतात ?

  1. (1) संरचना अवलंबित्त्व (Structure dependence)
  2. (2) तारतम्य (Discreteness)
  3. (3) स्थानांतरण (Displacement)
  4. (4) स्वच्छंदता (Arbitrariness)
See answer and solution
Q110

आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहित धरले जात नाही ?

  1. (1) आशय आणि घटनांची योग्य मांडणी आणि मूल्यमापन.
  2. (2) आत्तापर्यंत वाचलेल्या मजकुराचा मानसिक गोषवारा करणे.
  3. (3) स्वतंत्र अक्षरावर भर देणे.
  4. (4) आशयाचा पूर्वानुमान करणे.
See answer and solution
Q111

पुढीलपैकी व्याकरण–अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही ?

  1. (1) थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे.
  2. (2) भाषेच्या वर्तनापेक्षा भाषेच्या घटकांवर भर देणे.
  3. (3) प्रथम आणि द्वितीय भाषेच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे.
  4. (4) द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम शिकणे व पाठ करणे.
See answer and solution
Q112

शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते, ‘मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी दिलीत आणि त्यांची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते ?’ हे ________ याचे उदाहरण आहे.

  1. (1) अधिभाषिकता (Metalingualism)
  2. (2) अधिसंकेत विज्ञान (Metasemiotics)
  3. (3) अधिज्ञानात्मकता (Metacognition)
  4. (4) काल्पनिक पदबंध (Metaphor)
See answer and solution
Q113

पुढीलपैकी कोणती बाब क्राशेन (Krashen) चे सिद्धांत आणि व्यगोत्स्की (Vygotsky) च्या ZPD’ त समान आहे ?

  1. (1) नैसर्गिक क्रम सिद्धांत (Natural order hypothesis)
  2. (2) परिणाम झिरपणे सिद्धांत (Affective filter hypothesis)
  3. (3) आदान सिद्धांत (Input hypothesis)
  4. (4) लक्ष देणे सिद्धांत (Monitor hypothesis)
See answer and solution
Q114

कमिन्सच्या (Cummins) आंतर अवलंबित्त्वाच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकांवर अवलंबित असतात ?

  1. (1) द्वितीय भाषेत वाचन आणि लेखन.
  2. (2) मूलभूत परस्पर कौशल्ये – प्रथम आणि द्वितीय भाषेत.
  3. (3) द्वितीय भाषेत आकलन आणि उत्पादन.
  4. (4) प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य.
See answer and solution
Q115

पुढीलपैकी कोणते विधान अक्षरांपासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही ?

  1. (1) शब्द आणि मजकूर मजेशीर असतात, अक्षरं नसतात.
  2. (2) स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असते, शब्दांच्या तुलनेत.
  3. (3) प्रारंभीचे वाचक मोठ्या भाषिक घटकांवर चांगले लक्ष देऊ शकतात, लहान घटकांऐवजी.
  4. (4) शब्द आणि मजकूर अर्थपूर्ण संबंध स्थापित करतात, अक्षरं करू शकत नाहीत.
See answer and solution
Q116

भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे ?

  1. (1) भाषेची आपली लिपी असते पण बोलींची त्यांची लिपी नसते.
  2. (2) भाषा आणि बोलीची भाषिक पृथगात्मता दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाही.
  3. (3) भाषांचे लिखित साहित्य असते मात्र बोली मौखिक परंपरेत असतात.
  4. (4) भाषा आणि बोली भाषिकदृष्ट्या वेगळ्या असतात पण भौगोलिकदृष्ट्या एकच असतात.
See answer and solution
Q117

वीरा एक सात महिन्याची मुलगी आहे. ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते ?

  1. (1) हुंकारणे
  2. (2) भाषिक कथन
  3. (3) स्वन
  4. (4) बडबड
See answer and solution
Q118

उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे ________.

  1. (1) लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द
  2. (2) वाचकास नवीन असलेला शब्द
  3. (3) शब्द जसे ऐकतो तसे ओळखणे
  4. (4) ओळींच्या पलिकडे जाऊन शब्द वाचल्यास लक्षात येतो
See answer and solution
Q119

पुढीलपैकी कोणते विधान ‘भाषा आत्मसात तंत्र’ (LAD) चे योग्य विश्लेषण नाही ?

  1. (1) मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात.
  2. (2) मुलांच्या भाषिक आदानापेक्षा भाषिक प्रदान जास्त कशामुळे होते.
  3. (3) मुले त्यांची प्रथम भाषा कशी शिकतात.
  4. (4) 4-5 वर्षांच्या लहानशा कालावधीत मुले भाषा कशी शिकतात.
See answer and solution
Q120

भाषिक समुदायात ’s’ चे उच्चारण दोन वेगवेगळ्या सामाजिक–आर्थिक गटातील माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते. हे कशाचे उदाहरण आहे ?

  1. (1) समाज सांस्कृतिक परिवर्तन
  2. (2) समाज–मानसशास्त्रीय परिवर्तन
  3. (3) समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन
  4. (4) व्यावहारिक परिवर्तन
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा :
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका म्हणजे लेणींचे आगारच! कारण याच तालुक्यात दीडशेपेक्षा अधिक लेणी पाहायला मिळतात. त्या आजूबाजूच्या डोंगरांच्या पोटात खोदलेल्या दिसतात. यातली बहुतांश लेणी हिनयान या बौद्ध पंथाच्या आणि तिसऱ्या शतकातील असल्याचे इतिहासकारांचे मत आहे. असाच एक लेणीसमूह मानमोडी डोंगराच्या पोटात खोदलेला आहे. तसे पाहिले तर या मानमोडी डोंगरात तीन लेणी समूह आहेत. तीनही समूह अतिशय देखणे आहेत. त्यांची नावे आहेत–अंबा–अंबिका, भूतलेणी आणि भीमाशंकर लेणी. या लेणी म्हणजे मानवी कलात्मकतेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार.
पोल्ट्रीपासून चढण्यास सुरुवात केली की साधारण अर्ध्या तासात आपण अंबा–अंबिका, लेणींपाशी पोहोचतो. तिथे पोहोचण्याची वाट सोपी आहे तसेच काही ठिकाणी पायऱ्याही बांधलेल्या दिसतात. इतर दोन लेणींच्या तुलनेत या लेणी बऱ्यापैकी मोठ्या आहेत. त्यांच्या समोर भले मोठे पटांगण आहे. पटांगणामागे कातळातल्या भिंतीवर कोरलेला शिल्पखजिना आपल्याला अक्षरशः स्तंभिक करतो. या लेणींमध्ये सर्वप्रथम आढळते ती स्वच्छता आणि शांतता. मानमोडी डोंगराकडे फारच थोडे पर्यटक फिरकतात. मोजके अभ्यासक लेणी प्रेमी सोडले तर या लेणींत सामसूम असते. या लेणीसमूहात विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे अशा एकूण 33 लेणींचा समावेश आहे. पुरातत्त्व विभागाने त्यांना 18 ते 34 असे क्रमांक दिलेले आढळतात. (‘भीमाशंकर’ गटाच्या 17 लेणींनंतर पुढचे क्रमांक अंबा–अंबिका गटाला दिले आहेत). या लेणी बहुमजली असून उत्तरेकडे तोंड करून खोदलेल्या आहेत. बऱ्याच लेणींचे खोदकाम जमिनीलगत आहे. कातळावरच्या भागात लेणींकडे तोंड केले की आपल्या डाव्या हाताकडून किंवा पूर्वेकडून या लेणी पाहायला सुरुवात करायची. यातील 30 क्रमांकाची लेणी विशेष आहेत. जिन्याने वर गेलो की उजव्या बाजूला सलग पाच खोल्या दिसतात. चौथ्या खोलीत जैन शिल्पकाम दिसते. इतिहास अभ्यासकांच्या मते ही शिल्पे जैनांचे तीर्थंकर नेमिनाथ आणि जैन देवतेची आहेत. यातील अंबिंका देवी आंब्याच्या झाडाखाली बसलेली आहे. या देवीच्या नावावरूनच या गटाला अंबा–अंबिका असे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. पण काही इतिहासकार थेट महाभारतातील अंबा–अंबिका या पात्रांचे दाखले देतात, पण हे लेणे आहे मात्र बौद्धकालीनच. मुख्य चैत्यगृहाच्या भिंतींवर, गवाक्ष कमान, खांब या साऱ्यांवर दहा मोठे ब्राह्मी लिपीतील लेख कोरलेले होते असे अभ्यासक सांगतात. पण कालौघात आणि संवर्धनाच्या कामात आता फक्त आठच लेख शिल्लक आहेत. या साऱ्या लेखातून लेणींच्या निर्मितीबाबत तसेच दानधर्माबाबत माहिती मिळते. यानंतर काही विहार आणि पाण्याची टाकी लागतात.

Q121

लेणींतील कोरीव कामांतून कोणत्या बाबतीत माहिती मिळते ?

  1. (1) दान–धर्म
  2. (2) पुरातत्त्व विभाग
  3. (3) अभ्यासक
  4. (4) लेणी प्रेमी
See answer and solution
Q122

‘कातळ’ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

  1. (1) दगड
  2. (2) कातरवेळ
  3. (3) खडक
  4. (4) पाषाण
See answer and solution
Q123

लेणी समूहांबद्दल लेखकाने न काढलेला उद्‌गार कोणता ?

  1. (1) मानवी कलात्मकतेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार.
  2. (2) त्यांच्या समोर भलेमोठे पटांगण आहे.
  3. (3) या बौद्ध पंथाच्या नाहीत.
  4. (4) लेणींचे खोदकाम जमिनीलगत आहे.
See answer and solution
Q124

अंबा–अंबिका लेणींमध्ये लेखकाला प्रथमदर्शनी काय जाणवले ?

  1. (1) स्वच्छता आणि शांतता
  2. (2) खांब आणि कमान
  3. (3) खोदकाम आणि पायऱ्या
  4. (4) पर्यटक व प्रवाशी
See answer and solution
Q125

जुन्नर तालुक्यातील लेणी कोणत्या शतकातील आहे ?

  1. (1) चवथ्या
  2. (2) पाचव्या
  3. (3) दुसऱ्या
  4. (4) तिसऱ्या
See answer and solution
Q126

संचय, संग्रह करण्याचे ठिकाण या शब्दांचा समानार्थी शब्द म्हणजे ______.

  1. (1) लेणी
  2. (2) माघार
  3. (3) आगार
  4. (4) विहार
See answer and solution
Q127

इतिहासकार लेणींच्या नावासाठी कोणत्या ग्रंथांचे संदर्भ देतात ?

  1. (1) रामायण
  2. (2) उद्‌धवगीता
  3. (3) भगवद्‌गीता
  4. (4) महाभारत
See answer and solution
Q128

एकवचन–अनेकवचनी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा :

  1. (1) खाते–खाती
  2. (2) खांब–खांबे
  3. (3) शिल्प–शिल्पे
  4. (4) कमान–कमानी
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा :
दह्याची पौष्टिकता दुधाइतकीच असली तरी यातील प्रथिने दुधापेक्षा लवकर पचली जातात. साधारणतः 30 ते 50 ग्रॅम एवढे दही दुपारच्या वेळी खाणे आरोग्यास हितकारक असते. दही करताना साधारणतः अर्धा लिटर दुधामध्ये 1 मोठा चमचा विरजण घालावे. ते विरजण ताज्या दह्याचे असावे. विरजणावरच दह्याचा स्वाद अवलंबून असतो. जर विरजण मधुर आंबट असेल तर होणाऱ्या दह्याची चवही आंबट–गोड असते व याचा सुगंधही चांगला असतो. सहसा नेहमी ताजे दही आहारात वापरावे, म्हणजे ते आरोग्याला बाधत नाही.
उन्हाळ्यामध्ये दही पटकन तयार होते, तर थंडीमध्ये दही तयार होण्यास उशीर लागतो. उन्हाळ्यात सात ते आठ तासांमध्ये दही लागते तर हिवाळ्यात 14-15 तास लागतात. अशा प्रकारे ताजे दही आहारात वापरावे. फ्रीजमध्ये ठेवून किंवा अति आंबवून आंबट झालेले व थंड असे दही आहारात वापरू नये. त्याचप्रकारे बाहेरचे विकत घेतलेले दही आहारात वापरू नये. अनेक वेळा विकतच्या दह्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते व हे दही टिकवण्यासाठी परिरक्षकाचा वापर करतात व हे परिरक्षक आरोग्यास घातक असतात. त्याने रक्त व पित्त दूषित होऊन आम्लपित्त, सर्दी, खोकला असे अनेक आजार निर्माण होतात.
दह्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, लोह व कॅल्शिअम ही नैसर्गिक मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. दुधाचे दही बनविताना त्यात निर्माण होणारे व शरीरास आवश्यक असलेले उपयुक्त जंतू (लॅक्टोबॅसिल्स) हे आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. हे उपयुक्त जंतू आतड्यामध्ये गेल्यावर तेथील हानिकारक जंतूंना नष्ट करतात व पचनास आवश्यक उपयुक्त बॅक्टेरियांची निर्मिती करतात. दही त्वचा स्निग्ध व मऊ बनविते. दही खायचेच असेल तर मधुर ताजे दही दुपारच्या वेळात खावे किंवा दह्याचे ताक करून प्यावे. असे ताक पचनशक्ती वाढविणारे असते. ताक हे नक्कीच दह्यापेक्षा जास्त गुणकारी असते.
दह्याऐवजी त्यापासून निर्माण होणारे ताक हे आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. दही घुसळून त्यात पाणी घालून ताक बनवावे. ताक हे अग्निदीपक, अन्नाची रुची वाढविणारे व अन्नाचे पचन करणारे असते. ताक हे पातळ असल्यामूळे स्रोतोरोध निर्माण होत नाही व पर्यायाने आजारांची लागण होत नाही म्हणून दिवसभरातून ताज्या दह्यापासून बनविलेले ताजे ताक, रोज चार ग्लास प्यावे. यामध्ये लॅक्टोबॅसिल्स असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळे मनुष्य आजारांपासून दूर राहतो.

Q129

लेखकाच्या मते ताक सेवन केल्याने माणूस कोणत्या गोष्टींपासून अलिप्त राहतो ?

  1. (1) आजार
  2. (2) दही
  3. (3) पचन
  4. (4) परिरक्षक
See answer and solution
Q130

दह्यात आढळणाऱ्या तत्त्वांपैकी लेखकाने न सांगितलेला घटक कोणता ?

  1. (1) परिरक्षक
  2. (2) खनिजे
  3. (3) प्रथिने
  4. (4) जीवनसत्त्वे
See answer and solution
Q131

‘थंडीमध्ये’ या शब्दातील अधोरेखित भाग म्हणजे ______.

  1. (1) क्रिया विशेषण
  2. (2) विशेषनाम
  3. (3) उभयान्वयी अव्यय
  4. (4) शब्दयोगी अव्यय
See answer and solution
Q132

‘सर्दी, खोकला असे अनेक आजार होतात’ वाक्यातील अधोरेखित शब्द ______.

  1. (1) विशेषण
  2. (2) क्रियापद
  3. (3) विशेषनाम
  4. (4) सामान्यनाम
See answer and solution
Q133

लेखकाच्या मते लवकर पचणारा घटक कोणता ?

  1. (1) लोह
  2. (2) उपयुक्त जंतू
  3. (3) प्रथिने
  4. (4) खनिजे
See answer and solution
Q134

पुढीलपैकी सामान्यनाम नसलेला पर्याय शोधा.

  1. (1) जीव
  2. (2) ताक
  3. (3) जंतू
  4. (4) मनुष्य
See answer and solution
Q135

ताकामुळे कोणती गोष्ट होत नाही ?

  1. (1) अन्नरुची
  2. (2) त्वचा स्निग्धता
  3. (3) स्रोतोरोध
  4. (4) रोगप्रतिकार
See answer and solution
Q136

मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही ?

  1. (1) ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग पडताळण्यास मदत करते.
  2. (2) ते फक्त शिक्षक करू शकतात.
  3. (3) ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे समग्र चित्र उपस्थित करते.
  4. (4) ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे ठोस पुरावे सादर करते.
See answer and solution
Q137

शिक्षणातील उणिवा लक्षात घेण्यासाठी चुकांचे विश्लेषण महत्त्वाचे असते, कारण ______

  1. (1) चुका या विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीच्या उणिवांचा संकेत आहे.
  2. (2) चुकांच्या माध्यमातून संकल्पनात्मक विकास आणि अभिप्रेरण निदर्शनास येते.
  3. (3) बहुतांश चुका या विद्यार्थ्यांच्या आडमुठेपणामुळे होतात.
  4. (4) चुका म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत आणि त्यांची शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचे साधन.
See answer and solution
Q138

स्टीफन क्राशेनच्या ‘नियंत्रित कल्पना सिद्धांत’ (Monitor hypothesis) च्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही ?

  1. (1) काय ‘शिकले’ आहे हे पाहण्यासाठी काय ‘आत्मसात’ केले याचा उपयोग होतो.
  2. (2) विद्यार्थी तेंव्हाच पाहू शकतो जेंव्हा त्याच्याकडे पुरेसा वेळ आणि नियमांचे ज्ञान असते.
  3. (3) याचा वापर द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात होतो.
  4. (4) याचा आधार भाषा आत्मसात करणे आणि शिकणे यांच्या संबंधावर आहे.
See answer and solution
Q139

पुढीलपैकी रचनात्मक मूल्यमापनाचे कोणते उदाहरण नाही ?

  1. (1) संपूर्ण कालावधीत व्यापलेले सर्व समावेशक लेखी मूल्यमापन आणि इतर उपक्रमांचे एकत्रीकरण.
  2. (2) मूल्यमापनाचे असे धोरण ज्यात अगदी संक्षिप्त चाचण्या ते सवंगड्याने केलेले मूल्यमापन संपूर्ण सत्रात सुरू राहते.
  3. (3) संपूर्ण सत्रात तोंडी आणि लेखी कार्य, भूमिकाभिनय इत्यादींची सुरू असलेली मालिका.
  4. (4) सत्राच्या शेवटी सत्रांत पेपर.
See answer and solution
Q140

प्रारंभिक अवस्थेचा वाचक जेव्हा विशिष्ट मजकुरातील अर्थ लावताना आणि त्यातील आशय, सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यासाठी स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा वापर करतो/करते. त्याला ______ म्हणतात.

  1. (1) उर्ध्वगामी पद्धती (Bottom up Approach)
  2. (2) बॉटम–डाऊन पद्धती (Bottom-down Approach)
  3. (3) अधोगामी पद्धती (Top down Approach)
  4. (4) टॉप–अप पद्धती (Top-up Approach)
See answer and solution
Q141

पुढीलपैकी कोणती कृती मजकुराचे आकलन आणि शब्दसंग्रह विकासाच्या बाबतीत उपयोगी ठरणार नाही ?

  1. (1) आशय नकाशा
  2. (2) चित्र संग्रह
  3. (3) शब्द–नकाशा
  4. (4) बाराखडी तक्ता
See answer and solution
Q142

महत्त्वाच्या दोन मूल्यमापनांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

  1. (1) रचनात्मक मूल्यमापन हे संपूर्ण शिक्षणावस्थेत सातत्याने सुरू राहते.
  2. (2) सारांशात्मक मूल्यमापन हे शिक्षण प्रक्रियेच्या अगोदर आणि शिक्षणप्रक्रियेदरम्यान सुरू राहते.
  3. (3) रचनात्मक मूल्यमापन हे भाषेच्या कार्यापेक्षा भाषेच्या रूपावर भर देते.
  4. (4) सारांशात्मक (Summative) मूल्यमापन म्हणजे वर्षभरात केलेल्या प्रत्येक प्रारूपाच्या मूल्यमापनाची बेरीज आहे.
See answer and solution
Q143

समावेशी वर्गाची रचना करताना पुढीलपैकी कोणता घटक उपयोगी ठरणार नाही ?

  1. (1) बहुभाषिक धोरणाचा स्वीकार
  2. (2) वर्गात काही मुले वर्गप्रतिनिधी (Monitors) म्हणून असणे
  3. (3) मित्रमंडळीतली चर्चा आणि प्रत्याभरण (Feedback)
  4. (4) गट कार्य देणे
See answer and solution
Q144

‘p’ ला ‘b’ किंवा ‘6’ ला ‘9’ वाचणे किंवा लिहिणे ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य बाब आहे. हे कशामुळे होते ?

  1. (1) नाम अक्षमता (Anomia)
  2. (2) वाचन अक्षमता (Dyslexia)
  3. (3) ततपप करणे (Stuttering)
  4. (4) अफासिया (Aphasia)
See answer and solution
Q145

प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य म्हणजे ______.

  1. (1) दैनंदिन संभाषणात वापरलेली भाषा
  2. (2) आंतर भाषा
  3. (3) उच्च पातळीचे भाषिक कौशल्य
  4. (4) अमूर्ततेची भाषा
See answer and solution
Q146

शिक्षिका हिन्दी भाषी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना स्पष्टपणे नियम न सांगता त्यांना संदर्भ आणि संधी देत लहान लहान इंग्रजी वाक्यातून संभाषणात गुंतवून ठेवते. ती त्यांना उदाहरणे देते जी मुले संभाषणात वापरतात. हळूहळू, त्यांना शिक्षिकेच्या मदतीने आपसुकच नियमांचे आकलन होते. तुमच्या मते शिक्षिका कोणत्या पद्धतीचा अवलंब करते ?

  1. (1) संभाषणात्मक पद्धती
  2. (2) थेट पद्धती
  3. (3) व्याकरण–भाषांतर पद्धती
  4. (4) श्रव्य–भाषिक पद्धती
See answer and solution
Q147

संज्ञापनात्मक धोरणाचे (Communicative Approach) पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही ?

  1. (1) स्पष्टपणे शिकवण्यापेक्षा व्याकरण नियम जाणून घेणे
  2. (2) संज्ञापनात्मक नैपुण्य विकसित करणे
  3. (3) प्रारूपापेक्षा कार्यावर भर देणे
  4. (4) भाषेचा ससंदर्भ वापर
See answer and solution
Q148

बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेचा प्रचार करण्यासाठी पुढीलपैकी कोणता कथाप्रकार सर्वात प्रस्तुत ठरेल ?

  1. (1) विज्ञान कथा
  2. (2) काल्पनिक कथा (लेन्दी टेल)
  3. (3) लोककथा
  4. (4) आत्मकथन
See answer and solution
Q149

पुढीलपैकी बालसाहित्यातील इच्छित नसलेला घटक कोणता ?

  1. (1) मोठ्या आकाराची अक्षरे आणि परिचित शब्द
  2. (2) आकर्षक चित्रे
  3. (3) प्राणी–पात्र
  4. (4) स्पष्ट नैतिक मूल्ये
See answer and solution
Q150

पुढीलपैकी कोणते शिक्षणाचे कार्यक्षेत्र मानले नाही ?

  1. (1) भावनात्मक (Affective)
  2. (2) मानसिक–स्नायू वर्तन (Psychomotor)
  3. (3) ज्ञानात्मक (Cognitive)
  4. (4) समाज–सांस्कृतिक
See answer and solution