Q103
कवीच्या मते आलेला पाऊस कशाचे प्रतीक आहे ?
- (1) घेतलेल्या निरोपाचे
- (2) मनातील आनंदाचे
- (3) उदासिनतेचे
- (4) सुकलेल्या फुलाचे
सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा :
रात्र अशी सुनसान, उदासी घेउनिया पाऊस आला,
सांग कुणाचे व्याकुळ डोळे घेउनिया पाऊस आला ?
तुझ्या घरावर, कौलारावर असेल बरसत या वेळी,
हाक तुझी भिजलेली ओली घेउनिया पाऊस आला.
पुस्तकात मिटुनी सुकलेले फूल कुणितरी ठेवियले
तशा स्मृती मिटलेल्या हळव्या घेउनिया पाऊस आला.
घेतलास तू निरोप माझा तेव्हा मिटल्या डोळ्यांनी,
मौन तुझे ओथंबुन भरले घेउनिया पाऊस आला.
कवीच्या मते आलेला पाऊस कशाचे प्रतीक आहे ?
CBSE answer: (3)
उत्तर: (3) उदासिनतेचे
सावधान: निरोप आणि सुकलेले फूल हे पावसाने आणलेल्या आठवणींचे भाग आहेत, पावसाचे प्रतीक नव्हे.