By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 14 Dec 2024 Paper 1 Marathi, Question 104

Topic: Poem comprehension

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा :

रात्र अशी सुनसान, उदासी घेउनिया पाऊस आला,
सांग कुणाचे व्याकुळ डोळे घेउनिया पाऊस आला ?

तुझ्या घरावर, कौलारावर असेल बरसत या वेळी,
हाक तुझी भिजलेली ओली घेउनिया पाऊस आला.

पुस्तकात मिटुनी सुकलेले फूल कुणितरी ठेवियले
तशा स्मृती मिटलेल्या हळव्या घेउनिया पाऊस आला.

घेतलास तू निरोप माझा तेव्हा मिटल्या डोळ्यांनी,
मौन तुझे ओथंबुन भरले घेउनिया पाऊस आला.

Q104

प्रस्तुत कवितेतून कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केले आहे ?

  1. (1) स्वर्ग सुखाचा आनंद
  2. (2) फुलांचे महत्त्व
  3. (3) विरहभावनाCorrect answer
  4. (4) पावसाचा निरामय आनंद

Solution.

CBSE answer: (3)

उत्तर: (3) विरहभावना

  1. कवी प्रिय व्यक्तीच्या घराची, तिच्या हाकेची आणि निरोपाच्या क्षणाची आठवण काढतो.
  2. ‘घेतलास तू निरोप माझा’ यावरून दोघे दुरावल्याचे समजते.
  3. दूर गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीतील दुःख म्हणजे विरह; तीच भावना कवितेत आहे.

सावधान: कवितेत पाऊस असला तरी त्याचा आनंद नव्हे, तर उदासी व्यक्त झाली आहे.