Q100
‘तुझ्या घरावर, कौलारावर असेल बरसत’ यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा.
- (1) केवलप्रयोगी अव्यय
- (2) क्रियाविशेषण
- (3) उभयान्वयी अव्यय
- (4) शब्दयोगी अव्यय
सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा :
रात्र अशी सुनसान, उदासी घेउनिया पाऊस आला,
सांग कुणाचे व्याकुळ डोळे घेउनिया पाऊस आला ?
तुझ्या घरावर, कौलारावर असेल बरसत या वेळी,
हाक तुझी भिजलेली ओली घेउनिया पाऊस आला.
पुस्तकात मिटुनी सुकलेले फूल कुणितरी ठेवियले
तशा स्मृती मिटलेल्या हळव्या घेउनिया पाऊस आला.
घेतलास तू निरोप माझा तेव्हा मिटल्या डोळ्यांनी,
मौन तुझे ओथंबुन भरले घेउनिया पाऊस आला.
‘तुझ्या घरावर, कौलारावर असेल बरसत’ यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा.
CBSE answer: (4)
उत्तर: (4) शब्दयोगी अव्यय
सावधान: ‘वर’ स्वतंत्रपणे क्रियेबद्दल आले असते (उदा. ‘तो वर गेला’) तर क्रियाविशेषण झाले असते.