By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 14 Dec 2024 Paper 1 Marathi, Question 133

Topic: Reading comprehension

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा :
दह्याची पौष्टिकता दुधाइतकीच असली तरी यातील प्रथिने दुधापेक्षा लवकर पचली जातात. साधारणतः 30 ते 50 ग्रॅम एवढे दही दुपारच्या वेळी खाणे आरोग्यास हितकारक असते. दही करताना साधारणतः अर्धा लिटर दुधामध्ये 1 मोठा चमचा विरजण घालावे. ते विरजण ताज्या दह्याचे असावे. विरजणावरच दह्याचा स्वाद अवलंबून असतो. जर विरजण मधुर आंबट असेल तर होणाऱ्या दह्याची चवही आंबट–गोड असते व याचा सुगंधही चांगला असतो. सहसा नेहमी ताजे दही आहारात वापरावे, म्हणजे ते आरोग्याला बाधत नाही.
उन्हाळ्यामध्ये दही पटकन तयार होते, तर थंडीमध्ये दही तयार होण्यास उशीर लागतो. उन्हाळ्यात सात ते आठ तासांमध्ये दही लागते तर हिवाळ्यात 14-15 तास लागतात. अशा प्रकारे ताजे दही आहारात वापरावे. फ्रीजमध्ये ठेवून किंवा अति आंबवून आंबट झालेले व थंड असे दही आहारात वापरू नये. त्याचप्रकारे बाहेरचे विकत घेतलेले दही आहारात वापरू नये. अनेक वेळा विकतच्या दह्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते व हे दही टिकवण्यासाठी परिरक्षकाचा वापर करतात व हे परिरक्षक आरोग्यास घातक असतात. त्याने रक्त व पित्त दूषित होऊन आम्लपित्त, सर्दी, खोकला असे अनेक आजार निर्माण होतात.
दह्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, लोह व कॅल्शिअम ही नैसर्गिक मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. दुधाचे दही बनविताना त्यात निर्माण होणारे व शरीरास आवश्यक असलेले उपयुक्त जंतू (लॅक्टोबॅसिल्स) हे आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. हे उपयुक्त जंतू आतड्यामध्ये गेल्यावर तेथील हानिकारक जंतूंना नष्ट करतात व पचनास आवश्यक उपयुक्त बॅक्टेरियांची निर्मिती करतात. दही त्वचा स्निग्ध व मऊ बनविते. दही खायचेच असेल तर मधुर ताजे दही दुपारच्या वेळात खावे किंवा दह्याचे ताक करून प्यावे. असे ताक पचनशक्ती वाढविणारे असते. ताक हे नक्कीच दह्यापेक्षा जास्त गुणकारी असते.
दह्याऐवजी त्यापासून निर्माण होणारे ताक हे आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. दही घुसळून त्यात पाणी घालून ताक बनवावे. ताक हे अग्निदीपक, अन्नाची रुची वाढविणारे व अन्नाचे पचन करणारे असते. ताक हे पातळ असल्यामूळे स्रोतोरोध निर्माण होत नाही व पर्यायाने आजारांची लागण होत नाही म्हणून दिवसभरातून ताज्या दह्यापासून बनविलेले ताजे ताक, रोज चार ग्लास प्यावे. यामध्ये लॅक्टोबॅसिल्स असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळे मनुष्य आजारांपासून दूर राहतो.

Q133

लेखकाच्या मते लवकर पचणारा घटक कोणता ?

  1. (1) लोह
  2. (2) उपयुक्त जंतू
  3. (3) प्रथिनेCorrect answer
  4. (4) खनिजे

Solution.

CBSE answer: (3)

उत्तर: (3) प्रथिने

  1. उताऱ्याचे पहिलेच वाक्य सांगते की दह्याची पौष्टिकता दुधाइतकीच असली तरी त्यातील प्रथिने दुधापेक्षा लवकर पचतात.
  2. लोह आणि खनिजे दह्यात असतात, असे सांगितले आहे, पण ती लवकर पचतात असे नाही.
  3. उपयुक्त जंतू आतड्यात जाऊन हानिकारक जंतू नष्ट करतात; त्यांच्याबद्दल पचण्याचा उल्लेख नाही.

सावधान: प्रश्नातील 'लवकर पचणारा' हा शब्द उताऱ्यात कुठे आहे ते शोधा.