लेखिकेच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं ?
- (1) सत्य–असत्याची जाण असलेलं
- (2) स्पर्शाची जाण असलेलं
- (3) कोवळ्या पोपटी पानासारखं
- (4) भाव–भावनांचा स्पर्श झालेलं
सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्याय निवडा :
लग्नानंतर एकदा आईच्या घरी गेले तेव्हा झाडं अगदी बेचैन असल्यासारखी वाटली, उदास वाटली. त्याची जणू वाढच खुंटली होती. अशी कंटाळलेली झाडं मी कधीच पाहिली नव्हती. मला पूर्वी कधीतरी वाचलेली एक आदिवासींची कथा आठवली. जंगलात राहणाऱ्या एका आदिवासी समाजात एक प्रथा आहे. एखादं झाड त्यांना नको असेल तर ते तोडून–छाटून नष्ट करत नाहीत. ते सगळे मिळून रोज त्या नको असलेल्या झाडाजवळ जातात आणि त्याला मनसोक्त शिवीगाळ करतात, दूषण देतात. हळूहळू ते झाड आपोआपच सुकून मरून जातं.
झाडांना बोलता येत नसलं तरी भाषा समजते. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शिकलेली माझी एक मैत्रीण तासन् तास झाडांशी बोलते, त्यांची चौकशी करते, त्यांना थोपटते, गोंजारते. अनेकदा स्वतःचं मन झाडांपाशी मोकळंही करते. ती म्हणते, ‘झाडांना कधीच रागावण्याची किंवा मारण्याची वेळ येत नाही, ती शहाणीच असतात.’ मग माणूसच असा का?
माणसाचं छोटंसं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचं रूप किती निरागस असतं. बीजामधून नुकत्याच अंकुरलेल्या दोन कोवळ्या पोपटी पानांसारखं. निरसं रूप म्हणू या त्याला! कुठल्याही भाव–भावनांचा स्पर्श न झालेलं. व्यवहारी विश्वात संचार करणाऱ्या आपल्या आईच्या उदरात सुरक्षितपणे राहणारा तो जीव म्हणजे निसर्गाचं मानवप्राण्याच्या जीवनचक्रातलं सर्वात सुंदर, सर्वात निर्मळ रूप! सत्य–असत्य, व्यवहार–व्यापार ह्या कशाचाही स्पर्श न झालेलं. त्यालाही सत्यच प्रिय असतं. त्याच्या दृष्टीने सत्य म्हणजे त्याची माता. निसर्गाच्या विलक्षण निकट असलेली किंबहुना निसर्गाशी प्रामाणिक असलेली अशी त्याची आई. अंकुरणाऱ्या बिजाला, जशी माती तशी तान्हुल्याला माता! जसजसं मूल मोठं होतं तसं ह्या व्यवहारी जगात तरबेजपणाने जगणारी माणसं, त्याच्या अवतीभवतीचे आपण सगळेच त्याला निसर्गापासून दूर नेतो. प्रत्येक सजीवाला ‘आतला आवाज’ असतो. त्याच्यातल्या संजीवनतेचं, चैतन्याचं ते रूप असतं. प्रत्येक सजीवाला मूलतः त्या आतल्या आवाजाचं आकर्षण असतंच; पण दिवसांगणिक वाढणाऱ्या त्या बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारी जगात खेचतो. इथली मूल्यं फारच वेगळी असतात. इथलं जीवन हे व्यवहारमय झालेलं असतं.
लेखिकेच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं ?
CBSE answer: (3)
उत्तर: (3) कोवळ्या पोपटी पानासारखं
सावधान: ‘स्पर्श’ हा शब्द उताऱ्यात आहे, पण तो ‘स्पर्श न झालेलं’ या अर्थाने आला आहे.