By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Jul 2024 Paper 1 Marathi Language Question Paper with Answer Key

You are reading the question paper with answers. This is not the timed test: no clock is running and nothing is being scored.

Go to the timed test →

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

माझे गंधाचे वा सुगंधाचे वेड गावरान पद्धतीचे आहे आणि गावरानाने ते जोपासलेले आहे. हे लहानपणापासूनचे आहे. तेव्हापासूनच माझी गंधग्रहणशक्ती मोठी तीव्र असावी. चवीचे जेवण झाले, की हात धुवून, परकराला पुसून, हाताचा द्रोण करून त्यात नाक बुडवून भरभरून वास घ्यायचा ही माझी नेहमीची आवड. कांद्याची खमंग आमटी. सायीचे दही नि भात यांचे जेवण करावे आणि त्या संमिश्र वासाचा आनंद मनसोक्त लुटावा. अजून मला असे करावेसे वाटते. आईने ठेवणींची पेटी उघडली, की प्रत्येक वस्त्राची घडी प्रथम माझ्या नाकावर मी घेई. तो नव्या, पण जुन्या कपड्यांचा गार सुगंध मला फार आवडायचा. गर्द रानातील वृक्षांचा वास, भुईमुगाचे ओले वेल उपटल्यावर त्यांना येणारा दुधाळ हिरवा उग्र वास, तुरकाठ्याच्या जळणावर तापविलेल्या दुधाचा वा चहाचा वास ... किती नि किती तऱ्हेचे वास मी लहानपणी अनुभवले असतील. मनात भरून ठेवले असतील.

ज्या तवंदीगाव या खेड्यात माझी लहानपणची चार-पाच वर्षे आणि शिकत असतानाच्या सुट्टीचे दिवस गेले, त्या तवंदीत ही माझी आवड जोपासली गेली. तेव्हाची एक गोष्ट आठवते. आमची शेती असल्याने घरात बैल, गाई, घोडे, म्हैस अशी गोठाभर गुरे होती. त्यात नेहमी पाच-सात लहान मोठी वासरे असायचीच. या वासरांसाठी जोंधळ्याची कोवळी ताटे रोज कुणी शेतातून आणायचे. ती कुऱ्हाडीने तोडून त्याचे बोटभर लांबीचे तुकडे करून मी ते वासरांना घालीत असे. तुकडे करण्यासाठी आमच्या सतबा पाटलांनी मला लहान पात्याची कुऱ्हाडही दिली होती. बाटूक तोडून सुपात घेतले, की त्याचा किती वास घेतला तरी मला पुरे व्हायचे नाही. कुणाला वाटायचे, मी चोरून ते खातेच आहे. पण त्याचा गंध ... सालांचा औषधी वास, कोवळ्या भेंडाचा निरशा दुधासारखा वास आणि पानांचा येणारा जिरेसाळीच्या भातासारखा वास ... त्यांचे मिश्रण म्हणजे मला पंचपक्वान्नांचे जेवणच वाटायचे. सतबा पाटील ओरडायचे तेव्हा मी सुपातून नाक काढायची.

निरनिराळ्या गावांतील खूप बागा मी पाहिल्या आहेत. देखण्या, तशाच मिश्र सुगंधाने घमघमणाऱ्या. पण या बागांना माझ्या मनात स्थान नाही. त्या मी विसरले. मुंबईला असताना आमच्या घरी सुक्या पानात मळकट दोऱ्याने गुंडाळलेली फुलाची एक पुडी रोज येई. देवासाठी ती उलगडली, की जो असेल तो वास येई. त्या वासाने माझ्या मनात तवंदीची ब्रह्माची बाग उभी राही. मला वाटते, गंधाच्या कणात ही एक मोठी शक्ती असावी. डोंगरावर गाव, डोंगराच्या तळाशी ब्रह्माचे देऊळ. तेथून खाली दगडी बांधीव पायऱ्यांवरून गेले, की मग खूप मोठे वृक्ष आणि एक फळ्यांचा लहानसा पूल, वहाळावर बांधलेला. डोंगरातून वाहून येणाऱ्या पाण्यावर ती बाग उभी केलेली. बागेत आतील बाजूला एक मोडकी झोपडी. शेजारी घमघमणारा हिरवा चाफा आणि पुढे ओल्या गार वाफ्यातील फुलझाडांचे हिरवेगार गंधच गंध. लहान पाटातून वाहणारे पाणी, काठाने कर्दळीची झाडे; कुठे सुपारीची, कुठे केळीची रांग. मध्ये वाफेच वाफे. निशिगंधाचे, कृष्णकांचनाचे, चटक चांदणीचे, मोगऱ्याचे, हळदीचेही. तुळशीचा तर केवढा मोठा चौक. त्या बागेचा संमिश्र गंध मला दुसरीकडे कोठेच जाणवला नाही.

Q91

जोंधळ्याच्या कोवळ्या ताटांचे तुकडे लेखिका कोणाला घालीत असे ?

  1. (1) बैलांना
  2. (2) घोड्यांना
  3. (3) वासरांना
  4. (4) म्हशींना
See answer and solution
Q92

पुढीलपैकी संख्यावाचक विशेषण ओळखा :

  1. (1) पाच-सात
  2. (2) लहान-मोठी
  3. (3) उग्र-वास
  4. (4) ओले-वेल
See answer and solution
Q93

‘सरिता’ या शब्दाच्या अर्थाचा कोणता शब्द उताऱ्यात आलेला आहे ?

  1. (1) नदी
  2. (2) बाग
  3. (3) पाणी
  4. (4) सुगंध
See answer and solution
Q94

बागांमधून येणारा सुगंध कसा आहे ?

  1. (1) दुधासारखा
  2. (2) उग्र
  3. (3) मिश्र
  4. (4) गार
See answer and solution
Q95

पुढीलपैकी सामान्यनाम नसलेला शब्द ओळखा :

  1. (1) झाड
  2. (2) पाणी
  3. (3) नदी
  4. (4) देव
See answer and solution
Q96

फुलांच्या पुडीचा वास घेतल्यावर लेखिकेसमोर काय उभे रहात असे ?

  1. (1) ब्रह्माची बाग
  2. (2) मुंबईची बाग
  3. (3) ब्रह्माचे देऊळ
  4. (4) घमघमणारा हिरवा चाफा
See answer and solution
Q97

‘निरनिराळ्या गावांतील खूप बागा मी पाहिल्या आहेत’. यातील अधोरेखित शब्द कोणते विशेषण आहे ?

  1. (1) साकल्यवाचक संख्याविशेषण
  2. (2) पूर्णांकवाचक संख्याविशेषण
  3. (3) आवृत्तिवाचक संख्याविशेषण
  4. (4) अनिश्चित संख्याविशेषण
See answer and solution
Q98

‘त्या तवंदीत ही माझी आवड जोपासली गेली’ यातील अधोरेखित कोणते क्रियापद आहे ?

  1. (1) सहायक क्रियापद
  2. (2) अकर्मक क्रियापद
  3. (3) संयुक्त क्रियापद
  4. (4) सकर्मक क्रियापद
See answer and solution
Q99

लेखिकेला दुधाळ हिरवा उग्र वास कशाचा येतो ?

  1. (1) तुरकाठ्याच्या जळणावर तापविलेल्या दुधाचा
  2. (2) भुईमुगाच्या ओल्या वेलीचा
  3. (3) कांद्याच्या खमंग आमटीचा
  4. (4) आईच्या ठेवणीच्या वस्त्राचा
See answer and solution

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

घन घुंगुरवाळा आला.
कौलांवर रुणुझुणु झाला.

या फांद्यांवर तान्हेल्या
हळुवार सरी थरथरल्या;
हा पाउस की फुलझेला ?
घन घुंगुरवाळा आला.

लाजरे पाखरू भिजले,
मातीतुन गाणे रुजले;
नादात आपुल्या न्हाला,
घन घुंगुरवाळा आला.

पालखी नव्या नवलाची,
सावळिया शुभ शकुनाची
घेउनी निघाली याला,
घन घुंगुरवाळा आला.

Q100

‘फुलझेला’ ही उपमा कोणाला दिलेली आहे ?

  1. (1) पाखराला
  2. (2) पावसाला
  3. (3) नदीला
  4. (4) पालखीला
See answer and solution
Q101

‘लाजरे पाखरू भिजले
मातीतून गाणे रुजले’
यातील विशेषण कोणते ?

  1. (1) लाजरे
  2. (2) पाखरू
  3. (3) भिजले
  4. (4) रुजले
See answer and solution
Q102

‘पालखी’ हे कशाचे प्रतीक आहे ?

  1. (1) शुभ शकुनाचे
  2. (2) सावळेपणाचे
  3. (3) मातीच्या गाण्याचे
  4. (4) सरींच्या आनंदांचे
See answer and solution
Q103

‘हळुवार सरी थरथरल्या’ यातील ‘सरी’ हे काय आहे ?

  1. (1) नाम
  2. (2) समूहवाचक नाम
  3. (3) भाववाचक नाम
  4. (4) कर्म
See answer and solution
Q104

‘मातीतुन गाणे रुजले’ या ओळीतून काय सूचित होते ?

  1. (1) मातीचे महत्त्व
  2. (2) पावसाचे महत्त्व
  3. (3) नवनिर्मितीची प्रेरणा
  4. (4) घुंगुरवाळ्याचे महत्त्व
See answer and solution
Q105

ढगासाठी कवितेत न वापरलेला शब्द कोणता ?

  1. (1) घन
  2. (2) सावळिया
  3. (3) घुंगुरवाळा
  4. (4) पालखी
See answer and solution
Q106

एखाद्या विषयावर खूप चिंतन करूनही एका मुलाला स्वतंत्रपणे एखादा परिच्छेदही लिहू शकत नाही. मात्र हेच लेखन तो मोठ्या माणसाच्या किंवा मित्राच्या मार्गदर्शनात लिहू शकतो. हे मार्गदर्शन म्हणजे __________.

  1. (1) परातीकरण (Scaffolding)
  2. (2) मित्राचे शिक्षण (Peer Teaching)
  3. (3) मित्राचे मार्गदर्शन (Peer Counseling)
  4. (4) समूह शिक्षण (Team Teaching)
See answer and solution
Q107

__________ या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्ता नि तर्क यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते.

  1. (1) मौखिक शिक्षण
  2. (2) संकल्पना शिक्षण
  3. (3) गतिबोधन शिक्षण
  4. (4) संरचनात्मक शिक्षण
See answer and solution
Q108

काही शब्द चुकीचे लिहिलेले असतानाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या एकूण भाषा वापराचे कौतुक करता. तुम्ही तुमच्या वर्गात __________ या पद्धतीचा वापर करता.

  1. (1) समग्र भाषा
  2. (2) संज्ञापनात्मक
  3. (3) रचनात्मक (Constructivist)
  4. (4) संरचनात्मक (Structural)
See answer and solution
Q109

तुम्ही हिंदी भाषक शिक्षक आहात आणि तुमची बदली पंजाब परिसरातील प्राथमिक शाळेत होते. आता तुम्हाला तिथली भाषा येत नाही. त्यामुळे तुम्ही काय केले पाहिजे ?

  1. (1) लगेच हिंदी परिसरात बदली करून घेण्यासाठी अर्ज करावा.
  2. (2) मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे.
  3. (3) इंग्रजीत बोलावे.
  4. (4) मुलांना हिंदी शिकण्यास प्रोत्साहन द्यावे.
See answer and solution
Q110

‘मजकुरातून विशिष्ट प्रकारची माहिती मिळविण्यासाठी तिचे बारकाईने आणि लक्षपूर्वक वाचणे’. या प्रकारच्या कौशल्याला __________ आकलन म्हणतात.

  1. (1) जागतिक
  2. (2) स्थानिक
  3. (3) अनुमान
  4. (4) मूल्यमापनात्मक
See answer and solution
Q111

भाषा शिक्षणात नैदानिक चाचणी (Diagnostic Test) चा वापर कोणत्या उद्दिष्ट पूर्तीसाठी केला जातो ?

  1. (1) समाकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करणे.
  2. (2) PTM बैठकीत पालकांना सांगणे आणि त्यांना लक्ष देण्यास सांगणे.
  3. (3) विद्यार्थ्यांच्या उणिवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे.
  4. (4) विद्यार्थ्यांच्या निकालातील माहिती मिळविण्यासाठी.
See answer and solution
Q112

पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

  1. (1) पाठ्यपुस्तक हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अंतिम असते.
  2. (2) अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदतरूप ठरते.
  3. (3) सत्रासाठी शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन असते.
  4. (4) पाठ्यपुस्तकांना काहीही पर्याय नाही.
See answer and solution
Q113

पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते ?

  1. (1) शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी पाठ मोठ्याने वाचणे
  2. (2) कविता पाठ करून तिचे पठन
  3. (3) भूमिकाभिनयात सहभाग
  4. (4) नवीन किंवा माहीत नसलेल्या शब्दांचे योग्य उच्चारणाचा सराव
See answer and solution
Q114

‘भाषा स्वच्छंदी असते’ असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला __________ म्हणायचे असते.

  1. (1) भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात अंगभूत संबंध असतो.
  2. (2) शब्द आणि अर्थ यांच्यातील संबंध योगायोगाने नसून त्याला योग्य आधार असतो.
  3. (3) भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही अंगभूत संबंध नसतो.
  4. (4) भाषा पूर्वप्रत्यय सिद्धांताचे अनुकरण करते.
See answer and solution
Q115

व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती (Deductive approach) या गोष्टीचा पुरस्कार करते की आपण, __________.

  1. (1) उदाहरणे द्यावीत
  2. (2) नियम सांगावेत
  3. (3) प्रामाणिक संभाषण करावे
  4. (4) अभ्यास घटक देऊन सराव करून घ्यावा
See answer and solution
Q116

सत्याच्या पलिकडे जाऊन अंदाज लावणे, अनुमान करण्याची पद्धत म्हणजे __________.

  1. (1) स्पष्टीकरण
  2. (2) विश्लेषण
  3. (3) अनुमान करणे (Inference)
  4. (4) भाकित करणे (Extrapolation)
See answer and solution
Q117

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुक्त लेखनासाठी प्रवृत्त करावे; कारण मुक्त लेखनाचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा फायदा होतो. योग्य पर्याय निवडा.

  1. (1) यामुळे विद्यार्थ्यांना ओघवते आणि कल्पकतेने लिहिण्यास उत्तेजन मिळते.
  2. (2) लिहायचे किंवा नाही याचे स्वातंत्र्य असते.
  3. (3) त्यांना असे वाटत नाही की त्यांना खूप लिहायचे आहे आणि अचूक लिहायचे आहे.
  4. (4) त्यांच्या प्रथम भाषेतील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये लेखनात समाविष्ट करता येतात.
See answer and solution
Q118

पाचवी इयत्तेचे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगता. नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नांची ससंदर्भ उत्तरे द्यायला सांगता. या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांचे कोणत्या प्रकारे उत्तेजन देता ?

  1. (1) विस्तृत वाचन
  2. (2) न्याहाळणे
  3. (3) चाळणे
  4. (4) गहन वाचन
See answer and solution
Q119

भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते जेव्हा __________.

  1. (1) मुलाला व्याकरणाचे नियम शिकवले जातात
  2. (2) मुलाला भाषांतराचा सराव करून दिला जातो
  3. (3) मुलाला वाचनाची संधी दिली जाते
  4. (4) मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते
See answer and solution
Q120

वर्गात मातृभाषा वगळणे हे पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे ?

  1. (1) नैसर्गिक
  2. (2) द्वैभाषिक
  3. (3) श्रव्यभाषिक
  4. (4) थेट
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
आंबा नावातच गोडवा आहे. केळी, सफरचंद, पपई आणि अनेक फळं वर्षभरच हजर असतात, पण आंबा दोन महिन्यांसाठीच येतो आणि सगळ्यांची विकेट काढतो. हिंदी भाषेत याला ‘आम’ म्हणतात, पण खऱ्या अर्थाने हा ‘खास’ आहे. याच्या अनेक प्रजाती आहेत. हापूस, लंगडा, बदामी, दशेरी, केसर, नीलम आणि हो तो पोपटनाक्या तोतापुरी.. मराठी माणसासाठी हापूस म्हणजे जीव की प्राण. काहींसाठी तर आंबा म्हणजे फक्त हापूस. हापूस म्हणजे सुवासिक, पिवळा धमक, काहीशी केशरी झाक असलेला, विचार केला तरी तोंडाला पाणी सुटतं, बघा ना..
हापूस साधारणपणे एप्रिल मे महिन्यात बाजार व्यापून टाकतो. रत्नागिरी हापूस, देवगड, पावस, मंडणगड ही नावं तो फळवाला आपल्याला सांगतो आणि मग घासाघीस आणि चर्चेला विषयच राहत नाही. ‘नक्की रत्नागिरी ना’ असे जुजबी विचारत आपण या फळांच्या राजाला आपल्या पिशवीत मानाचे स्थान देतो.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये ‘लंगडा’ला महत्त्व जास्त. याला लंगडा नाव कसे पडले हे कोडेच आहे, पण नाव लंगडा असूनही विक्री आणि रसनेच्या शर्यतीत हा पहिला नंबर पटकावणारा, आंब्यांच्या इतर जाती जशा पिकल्यावर किंवा तयार झाल्यावर आपला रंग बदलतात तसे लंगडाच्या बाबतीत होत नाही, तो कच्चा असताना हिरवा आणि पिकल्यावरही हिरवाच. बाजारात पहिला नंबर मात्र बदामीचा, कर्नाटकचे हे फळ साधारणपणे मार्चपासून दिसू लागते. केसर किंवा गीर केसर आंबा म्हणजे स्वाद आणि सुवासाचे अप्रतिम मिश्रण.
माणसांच्या नावांसारखी नावं असलेल्या काही प्रजाती आहेत. कॅरेबियन बेटातील ‘जुली’, त्रिनिदादचा ‘ग्रॅहम’, अमेरिकेतील ‘रुबी’ आणि ‘फोर्ड’, भारतात ‘मनोहर’, ‘नीलम’, ‘मल्लिका’ यात जुलीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा आकार अंडाकृती किंवा गोलाकार असतो. ‘रासपुरी’ नाव ऐकलेलं वाटत नाही ना.. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र किंवा उत्तर भारतात याची तितकीशी ओळख नाही, पण दक्षिण भारतात हा खूपच प्रसिद्ध. हे फळ चवीला अप्रतिम आहेच, पण नावाप्रमाणे यात भरपूर रस असतो म्हणूनच यांचे नामकरण रासपुरी झाले असावे. असाच ‘बंगनपल्ले’ हा आंध्र प्रदेशात आपल्या हापूसप्रमाणे प्रसिद्ध. बंगनपल्ले राजवट हे याचे मूळ असल्यामुळे हा आंबा त्याच नावाने ओळखला जातो.
आंबा हा फक्त जिव्हेचे चोचले पुरवत नसून शरीरासाठीही अत्यंत गुणकारी आहे. मुख्य म्हणजे बलवर्धक आहे आणि पोटाच्या अनेक विकारांवर उपायकारक आहे. आंबा खाल्ल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन अ, इ, उ, ए आणि ङ मिळतं. आंब्यात मँगीफेरीन नावाचे अँटिऑक्सिडंट असतं, तसंच पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे हृदयसंबंधी रोग होण्याची शक्यता कमी असते. आणि हो, हे सर्व गुण असल्यामुळे आंब्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढते. आयुर्वेदानेही आंबा श्वास, त्वचा आणि आमाशयासाठी उपयुक्त मानला आहे. युनानी वैद्यकशास्त्रानुसार क्षयरोगाच्या उपचारासाठी पिकलेले आंबे अतिशय उपयुक्त असतात.

Q121

‘शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते’. या वाक्यातील क्रियापद शोधा.

  1. (1) शरीर
  2. (2) प्रतिकारक
  3. (3) शक्ती
  4. (4) वाढते
See answer and solution
Q122

‘किरकोळ’, ‘तात्पुरता’ या आशयाचा कोणता शब्द उताऱ्यात आहे?

  1. (1) विकार
  2. (2) शर्यत
  3. (3) जुजबी
  4. (4) घासाघीस
See answer and solution
Q123

लेखकाच्या मते विक्रीच्या बाबतीत पहिला क्रमांक कोणाचा?

  1. (1) लंगडा
  2. (2) हापूस
  3. (3) दशेरी
  4. (4) केशर
See answer and solution
Q124

महाराष्ट्रात फारसा परिचित नसलेला आंबा कोणता?

  1. (1) मनोहर
  2. (2) नीलम
  3. (3) केशर
  4. (4) रासपुरी
See answer and solution
Q125

उताऱ्याप्रमाणे मार्च महिन्यापासून बाजारात दिसू लागणारे फळ कोणते?

  1. (1) बादामी
  2. (2) केसर
  3. (3) लंगडा
  4. (4) दशेरी
See answer and solution
Q126

पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचनी रूप ‘ए’ कारान्त होते?

  1. (1) प्रजाती
  2. (2) माणूस
  3. (3) जीभ
  4. (4) रसना
See answer and solution
Q127

आंब्याची कोणती प्रजाती राजवटीच्या नावाने प्रसिद्ध आहे?

  1. (1) मल्लिका
  2. (2) बंगनपल्ले
  3. (3) लंगडा
  4. (4) दशेरी
See answer and solution
Q128

आंब्यामुळे काय होते? चुकीचा पर्याय शोधा.

  1. (1) पोटांचे विकार कमी होतात
  2. (2) विटामिन मिळते
  3. (3) अँटिऑक्सिडंट मिळते
  4. (4) रोग होण्याची शक्यता
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
कोणत्याही ऋतूत पांदीकडेच्या कोणत्या ना कोणत्या वनस्पतींना फुलांचा-फळांचा बहर असायचाच. या पांदीतून चालताना हात लांब करून चिंचेचा पाला ओरबडून चघळणे, कच्ची बोरे, करवंदे काढून तोंडात टाकणे, घाणेरीच्या जांभळ्या-काळ्या फळांचे गेंद खुडून चालताना एका एकाची रुची चाखणे हे मला फार आवडायचे. शिवाय निरनिराळी फुले तोडायची ती निराळीच. एक गुराखी मुलगा आपल्या म्हशीच्या पाठीवर आरामात झोपून या पांदीतून जाता-जाता हा बाजूचा मेवा काढून तो मटकावत आराम प्रवास करायचा. ते बघायला गंमत वाटायची. शेतावरचे माळवे आणायला भागूबाई निघाली, की मी तिच्या मागून जात असे. मला या पांदीच्या वाटेने जाणे फार आवडायचे. सत्याप्पा शेतावर कामाला निघाला, की मी निघालेच. खांद्यावर शेतीचे अवजार, हातात बैलांचे कासरे असा तो निघाला, की मागून मी.
या पांदीत रहदारी अशी ठरावीक वेळीच. सकाळी दिसते न दिसते तो शेतावर कामाला निघालेल्यांची. जरा ऊन वर आले, की गोवारी खिल्लारी आणि त्यांच्या पाल्यांची. दाटीवाटीने एकमेकाला ढुशा देत निघालेल्या त्या गजगामिनी म्हशी आपल्या डोळ्यातील पांढरे दाखवीत फुस्स करून तिरक्या नजरेने रोखून बघू लागल्या, की कुठे पळू व्हायचे. शिंगांनी एकमेकींना टोकत निघालेल्या गोमातादेखील हलकीशी लाथ द्यायला कमी करायच्या नाहीत. पांदीतून बाजूला पळायला वाव नसतो. पुढे तरी पळा किंवा मागे तरी. यावेळी जाणे जरा अवघडच. अगदी मागे राहावे तो नाका-तोंडातून धूळच धूळ. पण हे सगळे सोसूनही जायला हवे असायचे. कारण कळपांचे गोवारी कधी त्या गुरांच्या मधून चालत, कधी गुरावर बसून पावा वाजवीत. पावा-बासरीचा तो स्वरसमूह किती ऐकावा तेवढा थोडाच वाटे.
ही वर्दळ संपली, की तीन-चार तास पाणंद स्वस्थ असायची. चढत्या उन्हात पेंगत असायची. सूर्य डोक्यावर आला, की पुन्हा जागी व्हायची. आता या पांदीतून रंगी-बेरंगी धडोती नेसलेल्या गावच्या सुना-लेकी जात असायच्या. या पाखरांच्या थव्यासारख्या तिनापाचाच्या घोळक्याने चालत. डोक्यावर पाटीत तीन-चार लोटकी कालवण-कोरड्यासाची, दही-ताकाची. फडक्यात बांधलेली भाकरीची चळत, काखेत घागर आणि हातात, तांब्या दुसऱ्या हातात एखादा फाटा-जनावरांना दूर करण्यासाठी. शेतावरील घरच्या माणसांसाठी न्याहरी नेणाऱ्या या मुली. पावलांना सोबत थट्टा मस्करी, राग-लोभ सर्व काही. बरोबर अनवाणी पायातील जोडव्यांची किणकिण. रिकाम्या पाट्या घेऊन या परतल्या, की पाणंदीला पुन्हा विश्रांती ती तिन्हीसांजेपर्यंत.

Q129

‘सत्याप्पा शेतावर कामाला निघाला’. या वाक्यातील कर्म ओळखा.

  1. (1) सत्याप्पा
  2. (2) शेतावर
  3. (3) कामाला
  4. (4) निघाला
See answer and solution
Q130

‘पांदी’/‘पाणंद’ म्हणजे काय?

  1. (1) शेतातून जाणारी अरुंद वाट
  2. (2) शेतावर काम करणारा मजूर
  3. (3) गावच्या सुना-लेकी
  4. (4) पाखरांचा थवा
See answer and solution
Q131

उताऱ्यातील ‘धडोती’ या शब्दाचा अर्थ काय?

  1. (1) शेला
  2. (2) कुंकू
  3. (3) वस्त्र
  4. (4) उपरणे
See answer and solution
Q132

‘गजगामिनी म्हशी’ यातील अधोरेखित काय आहे?

  1. (1) नाम
  2. (2) कर्म
  3. (3) कर्ता
  4. (4) विशेषण
See answer and solution
Q133

प्रस्तुत उताऱ्यात पुढीलपैकी कोणत्या फळाचा उल्लेख आलेला नाही?

  1. (1) आवळा
  2. (2) चिंच
  3. (3) बोरं
  4. (4) करवंदं
See answer and solution
Q134

पाणंद कधी स्वस्थ व्हायची?

  1. (1) सकाळी
  2. (2) दुपारी
  3. (3) तिन्हीसांजी
  4. (4) पहाटे
See answer and solution
Q135

‘पुढे तरी पळा किंवा मागे तरी’ यातील ‘तरी’ हे काय आहे?

  1. (1) केवलप्रयोगी अव्यय
  2. (2) शब्दयोगी अव्यय
  3. (3) उभयान्वयी अव्यय
  4. (4) सकर्मक क्रियापद
See answer and solution
Q136

भाषाशास्त्रीय क्षमता विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मदत करते?

  1. (1) व्याकरणदृष्ट्या बरोबर किंवा चूक वाक्यरचना ओळखण्यात
  2. (2) व्याकरणदृष्ट्या सदोष असूनही ओघवते बोलण्यात
  3. (3) भाषेचा योग्य वापर केव्हा आणि कसा करायचा ते जाणण्यास
  4. (4) इंग्रजीचा अधिकाधिक वापर करण्यास
See answer and solution
Q137

प्राथमिक पातळीवर शिक्षक साधारणपणे विद्यार्थ्यांना रंग भरण्यास रेखांकन करण्यास प्रवृत्त करतात. याचा कोणता लाभ होतो?

  1. (1) वर्गात शांतता राहण्यासाठी विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यात.
  2. (2) उत्तम गतिबोधन क्षमता विकसित होते.
  3. (3) विद्यार्थ्यांचे मनोरंजन.
  4. (4) शिक्षकांना अध्यापनातून विश्रांती.
See answer and solution
Q138

मुले उत्तम प्रकारे भाषा शिकतात जेव्हा __________.

  1. (1) त्यांचे शिक्षक ओघवते बोलतात
  2. (2) त्यांना उत्तम पाठ्यपुस्तक मिळते
  3. (3) त्यांना मोकळेपणा वाटत नाही
  4. (4) त्यांना प्रेरणा मिळते
See answer and solution
Q139

शिक्षिका वर्गात सामूहिक चर्चा आणि सवंगड्यासोबत चर्चा याचे वर्गात आयोजन करते. ती उच्चारण आणि स्पेलिंग याकडे फारसे लक्ष देत नाही. ती कोणत्या पद्धतीचा अवलंब करते?

  1. (1) पारंपारिक (Traditional)
  2. (2) ऐच्छिक (Eclectic)
  3. (3) संरचनात्मक (Structural)
  4. (4) रचनात्मक (Constructivist)
See answer and solution
Q140

शिक्षक या नात्याने तुमच्या लक्षात येते की पाठातली भाषा ही विद्यार्थ्यांसाठी कठिण आहे. तुम्ही भाषा सोपी करता आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या अनुरूप आशयात बदल करता. तुमची ही कृती म्हणजे __________.

  1. (1) अंगीकारणे (Adopting)
  2. (2) माध्यमांतर (Adaptation)
  3. (3) मूल्यमापन
  4. (4) परीक्षण
See answer and solution
Q141

शाळेत जाणार असल्यामुळे राजू आज खूप खुश आहे. कुटुंबातील तो शाळेत जाणारा पहिला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणीही, अगदी आई-वडील सुद्धा, कधीही शाळेत गेले नव्हते. राजू हा कोणत्या प्रकारचा विद्यार्थी आहे?

  1. (1) पहिल्या पिढीचा
  2. (2) दुसऱ्या पिढीचा
  3. (3) परिघाबाहेरचा
  4. (4) अल्पसंख्यांक
See answer and solution
Q142

शिकवत असताना तुमच्या लक्षात येते की पाठ्यपुस्तकात सुरुवातीला गाणी आणि चित्रकथा आणि शेवटी मुळाक्षरे आहेत. भाषा शिक्षणात या प्रकारच्या व्यवस्थेचा पुरस्कार कोणती पद्धती करते?

  1. (1) ऊर्ध्वगामी (Bottom up approach)
  2. (2) अधोगामी (Top down approach)
  3. (3) निवड पद्धती (Eclectic approach)
  4. (4) कलात्मक (Aesthetic approach)
See answer and solution
Q143

जेव्हा भाषा कोणत्याही पद्धतशीर सरावाशिवाय नैसर्गिकपणे शिकली जाते, तेव्हा तिला __________ म्हणतात.

  1. (1) पांडित्य (Erudition)
  2. (2) आत्मसात करणे
  3. (3) स्वीकार्यता
  4. (4) शिकणे
See answer and solution
Q144

‘विद्यार्थ्यांनी प्रश्न सामूहिकपणे सोडवावे, जोडीने किंवा गटातून’ हे कोणत्या पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे?

  1. (1) संभाषणात्मक भाषा अध्यापन
  2. (2) वर्तनवादी पद्धती
  3. (3) समग्रभाषा पद्धती
  4. (4) संरचनात्मक पद्धती
See answer and solution
Q145

‘प्रदूषण’ या विषयावर अभ्यास ठरवताना तुम्ही कोणती गोष्ट सर्वात अगोदर करायला पाहिजे?

  1. (1) परिचयात्मक प्रश्न तयार करणे
  2. (2) विषयाचे वारंवार वाचन करणे
  3. (3) अध्यापन सामग्रीची निवड
  4. (4) वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना
See answer and solution
Q146

शिक्षिका विद्यार्थ्यांना ‘पाणी’ या विषयावर परिच्छेद लिहायला सांगते. विद्यार्थी ते विज्ञान आणि समाजविज्ञानाच्या वर्गात काय शिकले. यावर चर्चा करतात आणि नंतर परिच्छेद लिहायला सुरुवात करतात. हे कशाचे उदाहरण आहे?

  1. (1) वापरातील भाषा
  2. (2) विज्ञानाची भाषा
  3. (3) अभ्यासक्रमापलिकडे जाणारी भाषा
  4. (4) संज्ञापनात्मक पद्धती
See answer and solution
Q147

तुमचा जन्म आणि वाढ अशा गावात होते जिथे सगळी माणसे हिंदी बोलतात. तुम्हीही कुठल्याही शाळेत न जाता ती भाषा वापरू लागता. नंतर जेंव्हा तुम्ही शाळेत जाता, तेव्हा तुम्ही इंग्रजी, संस्कृत, हिंदी आणि उर्दू शिकता. आता तुम्ही धाराप्रवाह इंग्रजी बोलता. तुमची पहिली भाषा कोणती?

  1. (1) इंग्रजी
  2. (2) हिंदी
  3. (3) उर्दू
  4. (4) संस्कृत
See answer and solution
Q148

शिक्षिका वर्गात वास्तव जीवनातील, छत्री, रेनकोट, स्क्रू ड्रायवर सारख्या वस्तू आणते. ती मुलांना दोन तीन वाक्यांत वस्तूंचे वर्णन करण्यास सांगते. तिने वर्गात आणलेल्या वस्तूंना तांत्रिक दृष्ट्या काय म्हणता येईल?

  1. (1) भाषा आदान
  2. (2) शैक्षणिक साधने
  3. (3) यंत्र
  4. (4) रेलिया (Realia)
See answer and solution
Q149

वर्गात ‘काळ’ ही संकल्पना शिकविण्यासाठी तुम्ही एकाच माणसाचा एक 15 वर्षांपूर्वी काढलेला आणि एक नुकताच काढलेला फोटो वापरता. तुम्ही चर्चेला सुरुवात करून त्याचे आत्ताचे नि मागचे दिसणे, त्याच्या सवयी यावर बोलता. तुम्ही __________ याचा वापर करता.

  1. (1) निर्देशित व्याकरण (Prescriptive)
  2. (2) संरचनात्मक व्याकरण (Structural)
  3. (3) शिक्षणशास्त्रीय व्याकरण (Pedagogical)
  4. (4) नियमाधारित व्याकरण (Rule Based)
See answer and solution
Q150

विशिष्ट इयत्ता किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांने आत्मसात करावयास पाहिजेत असे ज्ञान, कौशल्य आणि वर्तन यांचे वर्णन असलेला अहवाल म्हणजे __________.

  1. (1) अध्यापन फलित
  2. (2) अध्ययन फलित
  3. (3) अंकसाक्षरता फलित
  4. (4) मूलभूत साक्षरता फलित
See answer and solution