Q100
‘फुलझेला’ ही उपमा कोणाला दिलेली आहे ?
- (1) पाखराला
- (2) पावसाला
- (3) नदीला
- (4) पालखीला
सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
घन घुंगुरवाळा आला.
कौलांवर रुणुझुणु झाला.
या फांद्यांवर तान्हेल्या
हळुवार सरी थरथरल्या;
हा पाउस की फुलझेला ?
घन घुंगुरवाळा आला.
लाजरे पाखरू भिजले,
मातीतुन गाणे रुजले;
नादात आपुल्या न्हाला,
घन घुंगुरवाळा आला.
पालखी नव्या नवलाची,
सावळिया शुभ शकुनाची
घेउनी निघाली याला,
घन घुंगुरवाळा आला.
‘फुलझेला’ ही उपमा कोणाला दिलेली आहे ?
CBSE answer: (2)
उत्तर: (2) पावसाला
सावधान: पाखरू आणि पालखी नंतरच्या कडव्यांत येतात; नदीचा कवितेत उल्लेखच नाही.