Q104
‘मातीतुन गाणे रुजले’ या ओळीतून काय सूचित होते ?
- (1) मातीचे महत्त्व
- (2) पावसाचे महत्त्व
- (3) नवनिर्मितीची प्रेरणा
- (4) घुंगुरवाळ्याचे महत्त्व
सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
घन घुंगुरवाळा आला.
कौलांवर रुणुझुणु झाला.
या फांद्यांवर तान्हेल्या
हळुवार सरी थरथरल्या;
हा पाउस की फुलझेला ?
घन घुंगुरवाळा आला.
लाजरे पाखरू भिजले,
मातीतुन गाणे रुजले;
नादात आपुल्या न्हाला,
घन घुंगुरवाळा आला.
पालखी नव्या नवलाची,
सावळिया शुभ शकुनाची
घेउनी निघाली याला,
घन घुंगुरवाळा आला.
‘मातीतुन गाणे रुजले’ या ओळीतून काय सूचित होते ?
CBSE answer: (3)
उत्तर: (3) नवनिर्मितीची प्रेरणा
सावधान: या ओळीमागे पाऊस आहे, म्हणून (2) 'पावसाचे महत्त्व' निवडण्याचा मोह होतो; पण ओळीचा मुख्य भाव 'महत्त्व' नसून नव्याने उगवणे, निर्माण होणे हा आहे.