By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Jul 2024 Paper 1 Marathi, Question 105

Topic: Poem comprehension

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

घन घुंगुरवाळा आला.
कौलांवर रुणुझुणु झाला.

या फांद्यांवर तान्हेल्या
हळुवार सरी थरथरल्या;
हा पाउस की फुलझेला ?
घन घुंगुरवाळा आला.

लाजरे पाखरू भिजले,
मातीतुन गाणे रुजले;
नादात आपुल्या न्हाला,
घन घुंगुरवाळा आला.

पालखी नव्या नवलाची,
सावळिया शुभ शकुनाची
घेउनी निघाली याला,
घन घुंगुरवाळा आला.

Q105

ढगासाठी कवितेत न वापरलेला शब्द कोणता ?

  1. (1) घन
  2. (2) सावळिया
  3. (3) घुंगुरवाळा
  4. (4) पालखीCorrect answer

Solution.

CBSE answer: (4)

उत्तर: (4) पालखी

  1. 'घन' म्हणजेच ढग.
  2. 'घुंगुरवाळा' म्हणजे घुंगरांचा नाद करत आलेला ढग; 'सावळिया' म्हणजे सावळ्या रंगाचा ढग.
  3. 'पालखी' मात्र ढगाचे नाव नाही; ती नव्या नवलाची, शुभ शकुनाची पालखी आहे, म्हणजे ढग घेऊन येणाऱ्या शुभ शकुनाचे प्रतीक.

सावधान: 'सावळिया' हे विशेषणासारखे वाटते, पण कवितेत ते ढगालाच उद्देशून वापरले आहे.