By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Jul 2024 Paper 1 Marathi, Question 95

Topic: Grammar

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

माझे गंधाचे वा सुगंधाचे वेड गावरान पद्धतीचे आहे आणि गावरानाने ते जोपासलेले आहे. हे लहानपणापासूनचे आहे. तेव्हापासूनच माझी गंधग्रहणशक्ती मोठी तीव्र असावी. चवीचे जेवण झाले, की हात धुवून, परकराला पुसून, हाताचा द्रोण करून त्यात नाक बुडवून भरभरून वास घ्यायचा ही माझी नेहमीची आवड. कांद्याची खमंग आमटी. सायीचे दही नि भात यांचे जेवण करावे आणि त्या संमिश्र वासाचा आनंद मनसोक्त लुटावा. अजून मला असे करावेसे वाटते. आईने ठेवणींची पेटी उघडली, की प्रत्येक वस्त्राची घडी प्रथम माझ्या नाकावर मी घेई. तो नव्या, पण जुन्या कपड्यांचा गार सुगंध मला फार आवडायचा. गर्द रानातील वृक्षांचा वास, भुईमुगाचे ओले वेल उपटल्यावर त्यांना येणारा दुधाळ हिरवा उग्र वास, तुरकाठ्याच्या जळणावर तापविलेल्या दुधाचा वा चहाचा वास ... किती नि किती तऱ्हेचे वास मी लहानपणी अनुभवले असतील. मनात भरून ठेवले असतील.

ज्या तवंदीगाव या खेड्यात माझी लहानपणची चार-पाच वर्षे आणि शिकत असतानाच्या सुट्टीचे दिवस गेले, त्या तवंदीत ही माझी आवड जोपासली गेली. तेव्हाची एक गोष्ट आठवते. आमची शेती असल्याने घरात बैल, गाई, घोडे, म्हैस अशी गोठाभर गुरे होती. त्यात नेहमी पाच-सात लहान मोठी वासरे असायचीच. या वासरांसाठी जोंधळ्याची कोवळी ताटे रोज कुणी शेतातून आणायचे. ती कुऱ्हाडीने तोडून त्याचे बोटभर लांबीचे तुकडे करून मी ते वासरांना घालीत असे. तुकडे करण्यासाठी आमच्या सतबा पाटलांनी मला लहान पात्याची कुऱ्हाडही दिली होती. बाटूक तोडून सुपात घेतले, की त्याचा किती वास घेतला तरी मला पुरे व्हायचे नाही. कुणाला वाटायचे, मी चोरून ते खातेच आहे. पण त्याचा गंध ... सालांचा औषधी वास, कोवळ्या भेंडाचा निरशा दुधासारखा वास आणि पानांचा येणारा जिरेसाळीच्या भातासारखा वास ... त्यांचे मिश्रण म्हणजे मला पंचपक्वान्नांचे जेवणच वाटायचे. सतबा पाटील ओरडायचे तेव्हा मी सुपातून नाक काढायची.

निरनिराळ्या गावांतील खूप बागा मी पाहिल्या आहेत. देखण्या, तशाच मिश्र सुगंधाने घमघमणाऱ्या. पण या बागांना माझ्या मनात स्थान नाही. त्या मी विसरले. मुंबईला असताना आमच्या घरी सुक्या पानात मळकट दोऱ्याने गुंडाळलेली फुलाची एक पुडी रोज येई. देवासाठी ती उलगडली, की जो असेल तो वास येई. त्या वासाने माझ्या मनात तवंदीची ब्रह्माची बाग उभी राही. मला वाटते, गंधाच्या कणात ही एक मोठी शक्ती असावी. डोंगरावर गाव, डोंगराच्या तळाशी ब्रह्माचे देऊळ. तेथून खाली दगडी बांधीव पायऱ्यांवरून गेले, की मग खूप मोठे वृक्ष आणि एक फळ्यांचा लहानसा पूल, वहाळावर बांधलेला. डोंगरातून वाहून येणाऱ्या पाण्यावर ती बाग उभी केलेली. बागेत आतील बाजूला एक मोडकी झोपडी. शेजारी घमघमणारा हिरवा चाफा आणि पुढे ओल्या गार वाफ्यातील फुलझाडांचे हिरवेगार गंधच गंध. लहान पाटातून वाहणारे पाणी, काठाने कर्दळीची झाडे; कुठे सुपारीची, कुठे केळीची रांग. मध्ये वाफेच वाफे. निशिगंधाचे, कृष्णकांचनाचे, चटक चांदणीचे, मोगऱ्याचे, हळदीचेही. तुळशीचा तर केवढा मोठा चौक. त्या बागेचा संमिश्र गंध मला दुसरीकडे कोठेच जाणवला नाही.

Q95CBSE gave marks for every option.

पुढीलपैकी सामान्यनाम नसलेला शब्द ओळखा :

  1. (1) झाडCorrect answer
  2. (2) पाणीCorrect answer
  3. (3) नदीCorrect answer
  4. (4) देवCorrect answer

Solution.

CBSE accepts (1), (2), (3) or (4)

उत्तर: (1), (2), (3) किंवा (4)

  1. या प्रश्नासाठी चारही पर्यायांना गुण दिले गेले आहेत.
  2. झाड, नदी, देव ही एकाच जातीच्या सर्व वस्तूंना लागू पडणारी, मोजता येणारी सामान्यनामे आहेत.
  3. 'पाणी' हे मोजता न येणाऱ्या द्रव्याचे नाव आहे, म्हणून ते पदार्थवाचक नाम मानले जाते; प्रश्नकर्त्याला अपेक्षित वेगळा शब्द बहुधा 'पाणी' (2) हाच होता.
  4. पण अनेक मराठी व्याकरणांत पदार्थवाचक नाम हा सामान्यनामाचाच उपप्रकार मानला जातो; त्या अर्थाने चारही शब्द सामान्यनामे ठरतात आणि 'सामान्यनाम नसलेला' असा एकही पर्याय उरत नाही.