By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Jul 2024 Paper 1 Marathi, Question 131

Topic: Vocabulary

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
कोणत्याही ऋतूत पांदीकडेच्या कोणत्या ना कोणत्या वनस्पतींना फुलांचा-फळांचा बहर असायचाच. या पांदीतून चालताना हात लांब करून चिंचेचा पाला ओरबडून चघळणे, कच्ची बोरे, करवंदे काढून तोंडात टाकणे, घाणेरीच्या जांभळ्या-काळ्या फळांचे गेंद खुडून चालताना एका एकाची रुची चाखणे हे मला फार आवडायचे. शिवाय निरनिराळी फुले तोडायची ती निराळीच. एक गुराखी मुलगा आपल्या म्हशीच्या पाठीवर आरामात झोपून या पांदीतून जाता-जाता हा बाजूचा मेवा काढून तो मटकावत आराम प्रवास करायचा. ते बघायला गंमत वाटायची. शेतावरचे माळवे आणायला भागूबाई निघाली, की मी तिच्या मागून जात असे. मला या पांदीच्या वाटेने जाणे फार आवडायचे. सत्याप्पा शेतावर कामाला निघाला, की मी निघालेच. खांद्यावर शेतीचे अवजार, हातात बैलांचे कासरे असा तो निघाला, की मागून मी.
या पांदीत रहदारी अशी ठरावीक वेळीच. सकाळी दिसते न दिसते तो शेतावर कामाला निघालेल्यांची. जरा ऊन वर आले, की गोवारी खिल्लारी आणि त्यांच्या पाल्यांची. दाटीवाटीने एकमेकाला ढुशा देत निघालेल्या त्या गजगामिनी म्हशी आपल्या डोळ्यातील पांढरे दाखवीत फुस्स करून तिरक्या नजरेने रोखून बघू लागल्या, की कुठे पळू व्हायचे. शिंगांनी एकमेकींना टोकत निघालेल्या गोमातादेखील हलकीशी लाथ द्यायला कमी करायच्या नाहीत. पांदीतून बाजूला पळायला वाव नसतो. पुढे तरी पळा किंवा मागे तरी. यावेळी जाणे जरा अवघडच. अगदी मागे राहावे तो नाका-तोंडातून धूळच धूळ. पण हे सगळे सोसूनही जायला हवे असायचे. कारण कळपांचे गोवारी कधी त्या गुरांच्या मधून चालत, कधी गुरावर बसून पावा वाजवीत. पावा-बासरीचा तो स्वरसमूह किती ऐकावा तेवढा थोडाच वाटे.
ही वर्दळ संपली, की तीन-चार तास पाणंद स्वस्थ असायची. चढत्या उन्हात पेंगत असायची. सूर्य डोक्यावर आला, की पुन्हा जागी व्हायची. आता या पांदीतून रंगी-बेरंगी धडोती नेसलेल्या गावच्या सुना-लेकी जात असायच्या. या पाखरांच्या थव्यासारख्या तिनापाचाच्या घोळक्याने चालत. डोक्यावर पाटीत तीन-चार लोटकी कालवण-कोरड्यासाची, दही-ताकाची. फडक्यात बांधलेली भाकरीची चळत, काखेत घागर आणि हातात, तांब्या दुसऱ्या हातात एखादा फाटा-जनावरांना दूर करण्यासाठी. शेतावरील घरच्या माणसांसाठी न्याहरी नेणाऱ्या या मुली. पावलांना सोबत थट्टा मस्करी, राग-लोभ सर्व काही. बरोबर अनवाणी पायातील जोडव्यांची किणकिण. रिकाम्या पाट्या घेऊन या परतल्या, की पाणंदीला पुन्हा विश्रांती ती तिन्हीसांजेपर्यंत.

Q131

उताऱ्यातील ‘धडोती’ या शब्दाचा अर्थ काय?

  1. (1) शेला
  2. (2) कुंकू
  3. (3) वस्त्रCorrect answer
  4. (4) उपरणे

Solution.

CBSE answer: (3)

उत्तर: (3) वस्त्र

  1. उताऱ्यात ‘रंगी-बेरंगी धडोती नेसलेल्या गावच्या सुना-लेकी’ असे वाक्य आहे.
  2. ‘नेसणे’ हे क्रियापद साडी, लुगडे अशा वस्त्रासाठी वापरतात; म्हणून धडोती म्हणजे स्त्रियांचे नेसायचे वस्त्र.
  3. ‘कुंकू’ लावले जाते, नेसले जात नाही.
  4. ‘शेला’ आणि ‘उपरणे’ खांद्यावर घेतात, ते नेसत नाहीत.

सावधान: शेला आणि उपरणे हीही कापडाचीच नावे आहेत, पण ‘नेसलेल्या’ या शब्दामुळे सर्वसाधारण ‘वस्त्र’ हाच अर्थ योग्य ठरतो.