By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Jul 2024 Paper 1 Marathi, Question 124

Topic: Reading comprehension

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
आंबा नावातच गोडवा आहे. केळी, सफरचंद, पपई आणि अनेक फळं वर्षभरच हजर असतात, पण आंबा दोन महिन्यांसाठीच येतो आणि सगळ्यांची विकेट काढतो. हिंदी भाषेत याला ‘आम’ म्हणतात, पण खऱ्या अर्थाने हा ‘खास’ आहे. याच्या अनेक प्रजाती आहेत. हापूस, लंगडा, बदामी, दशेरी, केसर, नीलम आणि हो तो पोपटनाक्या तोतापुरी.. मराठी माणसासाठी हापूस म्हणजे जीव की प्राण. काहींसाठी तर आंबा म्हणजे फक्त हापूस. हापूस म्हणजे सुवासिक, पिवळा धमक, काहीशी केशरी झाक असलेला, विचार केला तरी तोंडाला पाणी सुटतं, बघा ना..
हापूस साधारणपणे एप्रिल मे महिन्यात बाजार व्यापून टाकतो. रत्नागिरी हापूस, देवगड, पावस, मंडणगड ही नावं तो फळवाला आपल्याला सांगतो आणि मग घासाघीस आणि चर्चेला विषयच राहत नाही. ‘नक्की रत्नागिरी ना’ असे जुजबी विचारत आपण या फळांच्या राजाला आपल्या पिशवीत मानाचे स्थान देतो.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये ‘लंगडा’ला महत्त्व जास्त. याला लंगडा नाव कसे पडले हे कोडेच आहे, पण नाव लंगडा असूनही विक्री आणि रसनेच्या शर्यतीत हा पहिला नंबर पटकावणारा, आंब्यांच्या इतर जाती जशा पिकल्यावर किंवा तयार झाल्यावर आपला रंग बदलतात तसे लंगडाच्या बाबतीत होत नाही, तो कच्चा असताना हिरवा आणि पिकल्यावरही हिरवाच. बाजारात पहिला नंबर मात्र बदामीचा, कर्नाटकचे हे फळ साधारणपणे मार्चपासून दिसू लागते. केसर किंवा गीर केसर आंबा म्हणजे स्वाद आणि सुवासाचे अप्रतिम मिश्रण.
माणसांच्या नावांसारखी नावं असलेल्या काही प्रजाती आहेत. कॅरेबियन बेटातील ‘जुली’, त्रिनिदादचा ‘ग्रॅहम’, अमेरिकेतील ‘रुबी’ आणि ‘फोर्ड’, भारतात ‘मनोहर’, ‘नीलम’, ‘मल्लिका’ यात जुलीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा आकार अंडाकृती किंवा गोलाकार असतो. ‘रासपुरी’ नाव ऐकलेलं वाटत नाही ना.. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र किंवा उत्तर भारतात याची तितकीशी ओळख नाही, पण दक्षिण भारतात हा खूपच प्रसिद्ध. हे फळ चवीला अप्रतिम आहेच, पण नावाप्रमाणे यात भरपूर रस असतो म्हणूनच यांचे नामकरण रासपुरी झाले असावे. असाच ‘बंगनपल्ले’ हा आंध्र प्रदेशात आपल्या हापूसप्रमाणे प्रसिद्ध. बंगनपल्ले राजवट हे याचे मूळ असल्यामुळे हा आंबा त्याच नावाने ओळखला जातो.
आंबा हा फक्त जिव्हेचे चोचले पुरवत नसून शरीरासाठीही अत्यंत गुणकारी आहे. मुख्य म्हणजे बलवर्धक आहे आणि पोटाच्या अनेक विकारांवर उपायकारक आहे. आंबा खाल्ल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन अ, इ, उ, ए आणि ङ मिळतं. आंब्यात मँगीफेरीन नावाचे अँटिऑक्सिडंट असतं, तसंच पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे हृदयसंबंधी रोग होण्याची शक्यता कमी असते. आणि हो, हे सर्व गुण असल्यामुळे आंब्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढते. आयुर्वेदानेही आंबा श्वास, त्वचा आणि आमाशयासाठी उपयुक्त मानला आहे. युनानी वैद्यकशास्त्रानुसार क्षयरोगाच्या उपचारासाठी पिकलेले आंबे अतिशय उपयुक्त असतात.

Q124

महाराष्ट्रात फारसा परिचित नसलेला आंबा कोणता?

  1. (1) मनोहर
  2. (2) नीलम
  3. (3) केशर
  4. (4) रासपुरीCorrect answer

Solution.

CBSE answer: (4)

उत्तर: (4) रासपुरी

  1. उताऱ्यात ‘रासपुरी’बद्दल म्हटले आहे: ‘आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र किंवा उत्तर भारतात याची तितकीशी ओळख नाही’.
  2. म्हणजे महाराष्ट्रात हा आंबा फारसा परिचित नाही; तो दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे.
  3. मनोहर आणि नीलम या भारतीय प्रजातींची फक्त नावे दिली आहेत, त्या अपरिचित आहेत असे म्हटलेले नाही.

सावधान: केसर (पर्यायात ‘केशर’) आंब्याचे लेखकाने स्वाद आणि सुवासासाठी कौतुक केले आहे; तो अपरिचित नाही.