By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Jul 2024 Paper 1 Marathi, Question 102

Topic: Poem comprehension

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

घन घुंगुरवाळा आला.
कौलांवर रुणुझुणु झाला.

या फांद्यांवर तान्हेल्या
हळुवार सरी थरथरल्या;
हा पाउस की फुलझेला ?
घन घुंगुरवाळा आला.

लाजरे पाखरू भिजले,
मातीतुन गाणे रुजले;
नादात आपुल्या न्हाला,
घन घुंगुरवाळा आला.

पालखी नव्या नवलाची,
सावळिया शुभ शकुनाची
घेउनी निघाली याला,
घन घुंगुरवाळा आला.

Q102

‘पालखी’ हे कशाचे प्रतीक आहे ?

  1. (1) शुभ शकुनाचेCorrect answer
  2. (2) सावळेपणाचे
  3. (3) मातीच्या गाण्याचे
  4. (4) सरींच्या आनंदांचे

Solution.

CBSE answer: (1)

उत्तर: (1) शुभ शकुनाचे

  1. शेवटच्या कडव्यात 'पालखी नव्या नवलाची, सावळिया शुभ शकुनाची' असे म्हटले आहे.
  2. सावळा ढग पावसाच्या रूपाने चांगल्या दिवसांची, शुभ शकुनाची पालखी घेऊन येतो, असा भाव आहे.
  3. म्हणून पालखी हे शुभ शकुनाचे प्रतीक आहे.

सावधान: 'सावळिया' हे ढगाचे वर्णन आहे, पालखीचा अर्थ नव्हे.