By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 8 Feb 2026 Paper 2 Marathi Language Question Paper with Answer Key

You are reading the question paper with answers. This is not the timed test: no clock is running and nothing is being scored.

Go to the timed test →

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायांची निवड करा.
गावाकडे घर केले तेव्हाच घराजवळ दोन गुंठे जमीन ठेवली, त्यात सेंद्रिय भाजीपाला करता यावा हा उद्देश. गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरू झाल्यावर गावाकडे राहायलाच आलो. तेव्हा बऱ्याच भाज्या लावल्या. लॉकडाऊनमुळे हे नवीन दुर्लक्षित जग खुले झाल्याचा आनंद झाला. वर्षभर भाज्या पिकवल्या, त्या भाज्या खाण्यापेक्षा वाटण्यात समाधान जास्त होतं. मग मूग करावा असं वाटत होतं. मूग भरपूर होतील म्हटलं. मूग पेरला. पण कडेने भरपूर जागा राहिली मूग सगळीकडे उगवून आलाही नाही. मग वांगी, टोमॅटो, मिरच्या, फ्लॉवर, कोबी यांची रोपे कडेने लावली. पावटा, दोडका, घोसावळी, कारले यांच्या बिया टाकल्या. भेंडी, गवार, धना, मेथी, चाकवत, शेपू, पालकचे बी जागा दिसेल तिथे टाकले. पण मागच्या वेळी महिना दोन महिन्यांत काही काही भाज्या, कोथिंबीर सापडत होते आता काही लवकर दिसेना. सतत पाऊस पडत होता. मूग मात्र चांगला आला.
मुगाच्या शेंगा काळ्या पडू लागल्या. म्हणजे सुकून, पिकून तोडायला आल्या. पहिल्या दिवशी दोन बादल्या शेंगा सापडल्या. वाकून तोडताना कंबर दुखत होती. आता गौरी-गणपती साताऱ्याला बसवायचे तर शेंगांना आठवडाभर हात लागणार नाही. म्हणून मग गावाकडेच बसवायचे ठरवले. सणासाठी सून, मुलगा, नातू आले. पूर्वी या शेतात मोसंबीची बाग होती म्हणून या शेताला बागेतलं वावर किंवा शेत म्हणतात. या वावरात उसाची पारंपरिक पद्धतीने, लागवड न करता रोपे आणून लावायची, असं शिरबातात्यांनी सांगितले. नेहमीच उसाची लागवड पुरुष करतात. एक रोपे दोन फुटांच्या अंतरावर लावायचे. रोपे लावायला बायका लागतात. पाच बायका सांगितलेल्या. बायका आहेत तर मीही येते म्हटलं. मलाही काम शिकायला मिळेल. बायकांत, शेतात काम करायला छान वाटते. सगळ्या मिळून असल्या की शीण जाणवत नाही. मैत्री होते. नवऱ्यामागे शहरात गेली तरी मी मूळ शेतकऱ्याची लेक हे कसं विसरू शकेन. आवड आहे, शेतीमातीचं प्रेम, महत्त्व आहे. म्हणून आता या उतारवयात शेतात काम करावंसं वाटतं. थोडे दिवस राहिलेत आपले तर आपल्या मुळाकडे जाण्याची ओढ असावी तशी असेल. पण जीव रमतोय इथे शेतामातीत.

Q91

लेखिकेचा जीव उतारवयात कशात रमतो ?

  1. (1) शहरी वातावरणात
  2. (2) वेगवेगळी ठिकाणे फिरण्यात
  3. (3) निरनिराळे पदार्थ करून इतरांना खाऊ घालण्यात
  4. (4) गावाकडच्या शेतात आणि मातीत
See answer and solution
Q92

लेखिकेला शेतात काम करायला आवडते कारण .....

  1. (1) लेखिकेचे सगळेजण कौतुक करतात.
  2. (2) सगळ्या बायका असल्याने मैत्री होऊन थकवा येत नाही.
  3. (3) निवृत्त झाल्यानंतर हे काम करण्याचे तिने ठरवले होते.
  4. (4) तिच्या शेताची जमीन सुपीक होती.
See answer and solution
Q93

‘मुगाची शेंग काळी पडणे’ ही कशाची सूचना असते ?

  1. (1) शेंग किडून जात आहे.
  2. (2) शेंग पिकून तोडायला तयार आहे.
  3. (3) शेंगेत दाणा भरलेला नाही.
  4. (4) शेंगेवर कसला तरी रोग पडला आहे.
See answer and solution
Q94

‘परंपरा’ या शब्दांचे योग्य विशेषण शोधा.

  1. (1) पारंपरिक
  2. (2) पारंपारिक
  3. (3) परंपरिक
  4. (4) पारंपरीक
See answer and solution
Q95

कोणत्या सणासाठी बाईंचे कुटुंबीय गावाकडे आले ?

  1. (1) दसरा
  2. (2) दिवाळी
  3. (3) गौरी-गणपती
  4. (4) गुढीपाडवा
See answer and solution
Q96

लेखिकेला भाज्यांबद्दल कोणती गोष्ट जास्त समाधान देते ?

  1. (1) भाज्या लावणे
  2. (2) भाज्या बाजारात विकणे
  3. (3) भाज्या इतरांना वाटणे
  4. (4) भाज्यांचे अनेक पदार्थ करणे
See answer and solution
Q97

गावाच्या घराजवळ लेखिकेने जमीन राखून का ठेवली ?

  1. (1) नंतर घराचा विस्तार करण्यासाठी
  2. (2) पुढील काळात जमीन चढ्या भावाने विकण्यासाठी
  3. (3) सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यासाठी
  4. (4) मुलांना बागकाम शिकवण्यासाठी
See answer and solution
Q98

शिरबातात्यांनी कोणती सूचना केली ?

  1. (1) उसाची लागवड परंपरेनुसार करायची.
  2. (2) उसाची लागवड रोपे आणून करायची.
  3. (3) उसाऐवजी मोसंबीची लागवड करायची.
  4. (4) उसाच्या बाजूने वांगी, मिरच्या, भेंडी, गवार लावायच्या.
See answer and solution
Q99

मागच्या वेळेप्रमाणे पुढीलवर्षी लेखिकेला भाजी मिळाली नाही कारण .......

  1. (1) लॉकडाऊनमुळे
  2. (2) शेतात घुशींचा सुळसुळाट झाला
  3. (3) कडक उन्हामुळे रोपे वाळून गेली
  4. (4) सतत पाऊस पडत होता
See answer and solution

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 साठी योग्य पर्याय निवडा.
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर त्या तालावरती गाणे अमुचे जुळे
कुरणावरती, झाडांखाली
ऊन सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले!
दूर दूर हे सूर वाहती.
उन्हात पिवळ्या पहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले!
गाणे अमुचे लुकलुक तारा
पाऊस वर, मोर पिसारा या गाण्यातून फुले
फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सगळे खुळे

Q100

पुढीलपैकी कोणत्या उपक्रमाचा कवीने सर्वात जास्त वेळा उल्लेख केला आहे ?

  1. (1) फुलणे
  2. (2) झुलणे
  3. (3) गाणे
  4. (4) जुळणे
See answer and solution
Q101

पुढीलपैकी गाण्यातून काय फुलत नाही ?

  1. (1) वारा
  2. (2) फुले
  3. (3) मोरपिसारा
  4. (4) पाऊस
See answer and solution
Q102

ताऱ्याचे चमकणे कसे सुचवले आहे ?

  1. (1) टपटप
  2. (2) झुळझुळ
  3. (3) भिरभिर
  4. (4) लुकलुक
See answer and solution
Q103

झाडाखाली कसली जाळी आहेत ?

  1. (1) फुलांची
  2. (2) ऊन सावलीची
  3. (3) गवताची
  4. (4) पानांची
See answer and solution
Q104

‘शहाणा’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

  1. (1) समंजस
  2. (2) खुश
  3. (3) खुळा
  4. (4) ताल
See answer and solution
Q105

कवितेतील ‘पृथ्वी’ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

  1. (1) ऊन
  2. (2) धरती
  3. (3) प्राजक्त
  4. (4) सूर
See answer and solution
Q106

पुढीलपैकी कोणत्या घटकाचा संस्थागत लेखनात समावेश होत नाही ?

  1. (1) शोक संवेदना मजकूर
  2. (2) व्यावसायिक पत्र
  3. (3) स्व-परिचय
  4. (4) परीक्षण/अभिप्राय
See answer and solution
Q107

भाषा संपादन आणि भाषा शिक्षणाच्या संदर्भात उपजत गृहित कल्पना कोणती ?

  1. (1) सर्व भाषांचे व्याकरण असते आणि मुले ते त्यांच्या पद्धतीने आत्मसात करतात, या विचाराला नाकारते.
  2. (2) सर्व माणसे शारीरिक कवायत आणि अभिसंधानाच्या माध्यमातून भाषा शिकतात असे मानते.
  3. (3) प्रत्येक माणसाकडे जन्मतः भाषिक ज्ञान असते असे मानते.
  4. (4) सवय लावून भाषा शिकता येते असे मानते.
See answer and solution
Q108

‘विषय-प्रधान भाषिक आदान’ म्हणजे........

  1. (1) भाषा कशी वापरली जाते यावर रोख असलेले भाषिक आदान
  2. (2) आदानांचे सादरीकरण आणि त्यांची प्रक्रिया
  3. (3) माहितीवर रोख असणारे भाषिक आदान
  4. (4) शब्दसंग्रह, उच्चारण, व्याकरण इत्यादि
See answer and solution
Q109

पुढीलपैकी कोणती पद्धत भाषा शिक्षणात ‘शब्द आणि शब्दसंच’ यांना मूलाधार मानते ?

  1. (1) नियत कृती आधारित भाषा शिक्षण (Task-based language learning)
  2. (2) संभाषणात्मक पद्धती (Communicative approach)
  3. (3) शब्दगत पद्धती (Lexical approach)
  4. (4) व्याकरण भाषांतर पद्धती (Grammar translation method)
See answer and solution
Q110

शालेय शिक्षणातील बहुभाषिकतेचे पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही ?

  1. (1) शाळेत अध्ययन-अध्यापनासाठी विद्यार्थ्यांच्या भाषेचा वापर करणे.
  2. (2) शक्यतो मातृभाषा शिकणे आणि तिचा अध्ययन भाषा म्हणून वापर करणे.
  3. (3) त्रिभाषा सूत्रानुसार मातृभाषा, हिंदी आणि इंग्रजी शिकणे.
  4. (4) सर्व मुलं शालेय शिक्षणाची सुरुवात मातृभाषेतून करतात आणि उत्तरोत्तर (किमान दोन) भाषा आत्मसात करतात.
See answer and solution
Q111

वाणी एक लेख मजकुरातील सर्वसाधारण तपशील जाणून घेण्यासाठी वाचत आहे. तिच्या वाचनाला काय म्हणता येईल ?

  1. (1) अनुमान लावणे (Inferencing)
  2. (2) न्याहाळणे (Scanning)
  3. (3) चाळणे (Skimming)
  4. (4) समीक्षात्मक वाचन (Critical reading)
See answer and solution
Q112

शाळा आधारित मूल्यमापनास उत्तेजन देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही दोन उपयुक्त विधानांची निवड करा.
(a) यामुळे विद्यार्थी-शिक्षक दोहोंना स्वायत्तता मिळण्यास उत्तेजन मिळते.
(b) यामुळे शाळांना त्यांचे स्वतःचे नियोजन करण्यास वाव मिळतो.
(c) परीक्षा बोर्डाचे अधिकार काढून घेतले जातात.
(d) मूल्यमापनाचे नियोजन करण्यात विद्यार्थ्याचा एक सक्रिय विद्यार्थी म्हणून समावेश केला जात नाही.

  1. (1) (a) आणि (b)
  2. (2) (b) आणि (c)
  3. (3) (c) आणि (d)
  4. (4) (d) आणि (a)
See answer and solution
Q113

कोणते शैक्षणिक तत्वज्ञान पुढील बाबीचा पुरस्कार करते ?
पूर्व निर्धारित सूचना श्रेणींच्या ऐवजी वास्तव जीवनावर आधारित परिस्थिती किंवा विशिष्ट परिस्थितीनुसार शैक्षणिक वातावरणाचा वापर करणे.

  1. (1) देशीयता (Nativism)
  2. (2) संरचनावाद (Constructivism)
  3. (3) श्रव्यभाषिकता (Audiolingualism)
  4. (4) ज्ञानात्मकता (Cognitivism)
See answer and solution
Q114

इयत्ता सहावीचा विद्यार्थी राहूल नवीन व्याकरणिक घटक शिकताना त्याची त्याने अगोदर जे काही शिकले आहे त्यासोबत सुसंगती लावतो. यातून पुढीलपैकी कोणती कृती लक्षात येते ?

  1. (1) स्वयंशोध कृती (Heuristic strategies)
  2. (2) ज्ञानात्मक कृती (Cognitive strategies)
  3. (3) अधिज्ञानात्मक कृती (Metacognitive strategies)
  4. (4) दोन्ही, ज्ञानात्मक आणि अधिज्ञानात्मक कृती (Both Cognitive and Metacognitive strategies)
See answer and solution
Q115

इयत्ता सातवीची शिक्षिका सात वाक्यांचा एक लहान मजकूर वाचून दाखवते. ती विद्यार्थ्यांना मजकूर काळजीपूर्वक ऐकण्यास सांगून जवळपास तसाच मजकूर त्यांना तयार करण्यास सांगते (तंतोतंत त्या सारखा नाही). शिक्षिकेच्या या धोरणाला काय म्हणता येईल ?

  1. (1) मनोबंध निर्मिती (Schema Creation)
  2. (2) अधोगामी कृती (Top-down strategy)
  3. (3) ऊर्ध्वगामी कृती (Bottom-up strategy)
  4. (4) परिच्छेद अनुलेखन (Paragraph dictation)
See answer and solution
Q116

शिक्षण निष्पन्नाच्या उद्दिष्टांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहेत ?
(a) आशयकेंद्री शिक्षणाऐवजी क्षमता आधारित शिक्षणास उत्तेजन देणे.
(b) भाषेचा सर्जनशील वापर करण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना भाषा कौशल्यात प्राविण्य मिळविण्यास मदत करणे.
(c) विषयवस्तूत प्राविण्य मिळविणे आणि नंतर त्याचा वापर करण्याची क्षमता प्राप्त करणे.
(d) भाषेचा विशिष्ट कामासाठी वापर करण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे.

  1. (1) फक्त (c) बरोबर आहे.
  2. (2) (b) आणि (c) बरोबर आहे.
  3. (3) (d) आणि (c) बरोबर आहे.
  4. (4) (a) आणि (d) बरोबर आहे.
See answer and solution
Q117

व्याकरण शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान ‘प्रक्रियात्मक ज्ञानाचे’ नेमके वर्णन करते ?

  1. (1) घटकाबद्दल माहिती असणे.
  2. (2) व्याकरणिक घटक, त्याचा वापर माहित असणे.
  3. (3) व्याकरणिक नियम शिकणे आणि त्यांचा नंतर पुनर्वापर करणे.
  4. (4) व्याकरणिक घटक कसे कार्य करते ते व्याकरणाच्या पुस्तकातून समजून घेणे.
See answer and solution
Q118

शासकीय हायस्कूलची शिक्षिका उषाराणी आपल्या विद्यार्थ्यांना नित्यंदिनच्या वापरासाठी आणि औपचारिक वापरासाठी इंग्रजी बोलण्यास मदत करते. शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करते ?

  1. (1) संभाषण कौशल्य (Communication skills)
  2. (2) आंतरवैयक्तिक कौशल्य (Interpersonal skills)
  3. (3) ज्ञानात्मक विद्याविषयक भाषा नैपुण्य (Cognitive Academic Language Proficiency)
  4. (4) मूलभूत आंतरवैयक्तिक संभाषण कौशल्य (Basic Interpersonal Communication Skills)
See answer and solution
Q119

इयत्ता सातवीची शिक्षिका विद्यार्थ्यांच्या विशिष्ट प्रकारच्या चुका एकत्र करून त्यांना त्यांच्या चुकांबद्दल जागरुक करण्यासाठी महिन्यातून एकदा त्यांवर चर्चा करते. मात्र चुका कोणी केल्या आहेत हे ती सांगत नाही. ती विद्यार्थ्यांना त्या चुकांवर प्रतिसाद देण्यासही सांगते.
या धोरणाला काय म्हणता येईल ?

  1. (1) व्याकरणात गुंतवणे आणि त्याचा अभ्यास
  2. (2) व्याकरण शिकवणे
  3. (3) प्रत्याभरण देणे
  4. (4) चुकांचे विश्लेषण
See answer and solution
Q120

आपण शब्द ऐकतो, पाहतो आणि ओळखतो त्याला काय म्हणतात ?

  1. (1) शब्दनिधी (Lexis)
  2. (2) उत्पादक शब्दसंग्रह (Productive vocabulary)
  3. (3) ग्रहणशील शब्दसंग्रह (Receptive vocabulary)
  4. (4) व्यस्त शब्दसंग्रह (Engaging vocabulary)
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायांची निवड करा.
भारतात रेल्वेचं जितकं लोकांना आकर्षण आहे तितकं जगात कुणालाच नसेल. ड्रायव्हर हा कुठल्याही संस्थेत महत्त्वाचा भाग असतो. साधे आपण कुठे फिरायला गेलो तरी आपल्या गाडीच्या ड्रायव्हरला आपण अपार प्रेमानं सांभाळतो. इथे तर रेल्वेच्या इतक्या मोठ्या अजस्त्र पसाऱ्यात ड्रायव्हरचं महत्त्व आजही अबाधित आहे. पूर्वी अँग्लो-इंडियन लोक ड्रायव्हर असायचे. त्यावेळी कोळशाची इंजिनं असायची. तसली वाफेवर चालणारी इंजिनं आज कालबाह्य झाली, तरीही काही ठिकाणी रेल्वेची हौस म्हणून ती चालवली जातात. आज डिझेल/इलेक्ट्रिक यावर चालणारी नवीनवी इंजिनं आलेली आहेत. भारतीय रेल्वेचा प्रवास थक्क करणारा आहे. पृथ्वीच्या चोवीस प्रदक्षिणांइतके किलोमीटर आपली रेल्वे रोजच्या एका दिवसात धावत असते. ठाणे येथला पारसिकचा बोगदा 1916 साली बांधला. त्यावेळी नुकतीच रेल्वे रांगत होती. पण आता त्याच बोगद्यातून रोज असंख्य गाड्या ये-जा करतात. इंग्रजांनी बांधलेल्या अनेक स्टेशनापैकी व्हीटी स्टेशन हे एकमेव स्टेशन होतं ज्यावर पादचारी पूल नव्हता. किंबहुना, त्याची गरज वाटू नये अशीच त्याची रचना होती. जाता जाता इथे नमूद करतो, की व्हीटी स्टेशनचं जुनं नाव ज्या राणीच्या नावावर होतं, तिच्या घराण्यातून काही रक्कम दरसाल या स्टेशनच्या देखभालीसाठी यायची.
गाड्या सतत धावत असतात. एका निर्धारित गतीने धावताना समोर येणाऱ्या प्रत्येक घटनेला प्रतिसाद देत पुढे सरकावं लागतं. भोवताली रेल्वेचे रूळ आणि दगड असल्यामुळे ड्रायव्हर रूक्षच असतात असाच साधारण समज आहे. यात एकटेपणा हा त्यांच्या नशिबाने त्याला बहाल केलेला एक दुखरा सल आहे. निसर्गाच्या विरुद्ध वेळेत सतत घरापासून दूर राहणारा ड्रायव्हर माणसांत फार कमी रमतो, कारण भोवतालच्या लोकांच्या वेळेत तो घरात असतच नाही. दिवाळी, दसरा, कुठला सण, काळ, वेळ या कुठल्याच गणितात नसणारी अशी त्याची कामाची वेळ असते. मेल गाड्या साधारणपणे रात्रीच चालतात. त्यामुळे जेव्हा हा घरी असतो, तेव्हा सारं जग वेगळ्या दुनियेत असतं आणि हा मात्र मोठ्या कष्टाने स्वतःची झोप पूर्ण करत असतो. रेल्वेचा ट्रॅक हा भर वस्तीतून कधीच जात नाही, पण ट्रॅक आल्यावर मात्र त्याच्या भोवताली वस्ती इतकी गच्च होते, की ट्रॅक अगोदर की वस्ती यांच्या झगड्याला उगाचच सुरुवात होते. हळूहळू काळ बदलला. रेल्वेने कात टाकायला सुरुवात केली. तिचा पसारा वाढत असतानाच कमी श्रमाची डिझेल/इलेक्ट्रिक इंजिनं आली. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक होतं. साधारण 1980 नंतर प्रशिक्षितांची पलटण रेल्वेत यायला सुरुवात झाली. तोपर्यंत कुणीही ड्रायव्हर बनू शकायचा. ज्याला कुठेच नोकरी नसायची, त्याला रेल्वेत ड्रायव्हरची नोकरी चटकन मिळायची.

Q121

निर्धारित या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

  1. (1) निष्फल
  2. (2) निष्काम
  3. (3) निश्चित
  4. (4) निष्पत्ती
See answer and solution
Q122

रेल्वेचे सर्वात जास्त आकर्षण कोणत्या देशात आहे ?

  1. (1) रशिया
  2. (2) इंग्लंड
  3. (3) भारत
  4. (4) फ्रान्स
See answer and solution
Q123

कालबाह्य होणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा.

  1. (1) कायमचे स्थान असणे
  2. (2) मानमरातब मिळणे
  3. (3) जुने, अप्रचलित होणे
  4. (4) देखभाल करणे
See answer and solution
Q124

पूर्वी रेल्वेची इंजिने कशावर चालत होती ?

  1. (1) डिझेल
  2. (2) पेट्रोल
  3. (3) वीज
  4. (4) कोळसा
See answer and solution
Q125

मेल गाड्यांची सर्वसाधारणपणे वेळ कोणती असते ?

  1. (1) पहाट
  2. (2) सकाळ
  3. (3) दुपार
  4. (4) रात्र
See answer and solution
Q126

कोरडा या अर्थी उताऱ्यात आलेला शब्द शोधा.

  1. (1) देखभाल
  2. (2) सभा
  3. (3) वृक्ष
  4. (4) रूक्ष
See answer and solution
Q127

रेल्वे-ट्रॅक आल्यावर काय घडते ?

  1. (1) रूळावरून सतत गाड्या धावू लागतात.
  2. (2) ट्रॅकभोवती माणसांची वस्ती वाढू लागते.
  3. (3) ट्रॅकच्या आसपास नवी स्टेशने तयार होतात.
  4. (4) ड्रायव्हरच्या कामाच्या वेळा वाढू लागतात.
See answer and solution
Q128

व्हीटी स्टेशनचे वैशिष्ट्य म्हणजे .......

  1. (1) तेथे पारसिकचा बोगदा आहे.
  2. (2) त्यावर पादचारी पूल नव्हता.
  3. (3) तेथे गाडीचे ड्रायव्हर अँग्लोइंडियन असत.
  4. (4) तेथील रेल्वेचा ट्रॅक भरवस्तीत आहे.
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायांची निवड करा.
गेल्या काही दिवसांत राज्याला पावसाने झोडपले. त्यामुळे बहुतांश भागातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली, तर काही ठिकाणी भूस्खलन होण्याचे प्रकारही झाले. मात्र यंदा पाऊस लांबल्याने पाण्याचा प्रश्न या पावसाने सोडवला ही दिलासादायक बाब... इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यास अरबी समुद्रात तयार झालेली द्रोणीय स्थिती कारणीभूत होती. द्रोणीय स्थिती हा पाऊस पडण्यातील मोठा हवामानशास्त्रीय घटक आहे. म्हणूनच हवामानातील द्रोणीय स्थिती, त्याची कारणे आणि त्याचे होणारे परिणाम समजून घेणे आवश्यक ठरते.
द्रोणीय स्थिती म्हणजे पानांचा द्रोण किंवा इंग्रजी व्ही सारखा आकार असतो. ही द्रोणीय स्थिती अरबी समुद्रात म्हणजे भारताच्या पश्चिमेला असलेल्या गुजरातपासून केरळपर्यंत संपूर्ण किंवा कोणत्याही ठरावीक भागात तयार होते.
द्रोणीय स्थिती कशी तयार होते या बाबत हवामानशास्त्रज्ञ सांगतात, की जागतिक पातळीबरोबर आपल्या देशाच्या भूभागावरही हवेच्या दाबाचे पट्टे तयार होत असतात. ते हंगामानुसार बदलत असतात. प्रत्येक महिन्याला, दिवसाला सरासरी हवेच्या दाबाचे पट्टे ठरलेले असतात. भूमीवर किंवा समुद्रावरील ज्या बिंदूवर सारख्या प्रमाणात हवेचा दाब असतो, त्या ठिकाणाला समदाबाची ठिकाणे म्हणतात आणि ही समदाबाची ठिकाणे ज्या रेषेने जोडली जातात त्याला आयसोबार म्हणतात. जुलैमध्ये भारतात आयसोबार पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतात. त्याच्या समांतर रेषा उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत तयार होतात. पृथ्वीच्या चलनवलनामुळे त्या-त्या वेळी, त्या-त्या ठिकाणी हवेचे दाब तयार होतात. तसेच मान्सून काळात अरबी समुद्रात हवेचे दाब तयार होतात आणि आयसोबार दरम्यान एकाएकी कमी दाबाची घळ तयार झाल्यास त्याला द्रोणीय स्थिती म्हटले जाते. द्रोणीय स्थिती विशेषतः जून, जुलै, ऑगस्टमध्ये तयार होते. द्रोणीय स्थिती तयार होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. द्रोणीय स्थिती तयार होण्यास भारतीय समुद्रीय द्विध्रुवता (इंडियन ओशन डायपोल) हा घटक सकारात्मक असणे अधिकच पूरक ठरते.
द्रोणीय स्थिती तयार होणे पावसासाठी अनुकूल असते. या द्रोणीय स्थितीमुळे मोसमी पावसाच्या अरबी समुद्राच्या शाखेतून पश्चिम किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्याच्या पश्चिमेकडील चार जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र द्रोणीय स्थितीची तीव्रता किती त्यावर पावसाचे प्रमाण कमी-जास्त होते. द्रोणीय स्थिती तीव्र स्वरूपाची असल्यास समुद्राच्या पृष्ठभागापासून त्याची उंची जास्त असते. तीव्र स्वरूपाच्या द्रोणीय स्थितीमध्ये वारे द्रोणाच्या निमुळत्या आकारात येऊन आदळतात आणि तितक्याच वेगाने ते घाटमाथ्याच्या उंचीपर्यंत जाऊन आदळतात. द्रोणीय स्थिती तीव्र असताना घाटमाथा, पश्चिम किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यांत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यास भरपूर पाऊस पडतो.
येत्या दोन-तीन दिवसांत सध्याची द्रोणीय स्थिती काहीशी विरळ झाल्यास 18 जुलैपासून थोडी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते. मात्र, काही वेळा द्रोणीय स्थिती संपूर्णपणे नाहीशी होऊनही कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस पडू शकतो. केवळ त्यासाठी अरबी समुद्राच्या नैऋत्य किंवा पश्चिमेकडून येणारे मोसमी वारे बळकट असण्याची आवश्यकता असते. द्रोणीय स्थितीमध्ये पावसाची तीव्रता मात्र अधिक असते.

Q129

पुढीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक द्रोणीय स्थिती तयार होण्यास पूरक ठरतो ?

  1. (1) हवेच्या दाबाचे पट्टे
  2. (2) नैऋत्य दिशा
  3. (3) पश्चिम दिशा
  4. (4) समुद्रीय द्विध्रुवता
See answer and solution
Q130

जुलै महिन्यात भारतात आयसोबारचा प्रवाह कोणत्या दिशेला असतो ?

  1. (1) उत्तरेकडून - दक्षिणेकडे
  2. (2) पश्चिमेकडून - पूर्वेकडे
  3. (3) पूर्वेकडून - पश्चिमेकडे
  4. (4) दक्षिणेकडून - उत्तरेकडे
See answer and solution
Q131

पुढीलपैकी महत्त्वाचा हवामानशास्त्रीय घटक कोणता ?

  1. (1) द्रोणीय स्थिती
  2. (2) घाटमाथा
  3. (3) पश्चिमी किनारपट्टी
  4. (4) समुद्रतळ
See answer and solution
Q132

पुढे काही शब्दांचे मूळ रूप आणि त्याचे सामान्य रूप दिले आहेत. चुकीचा पर्याय शोधा.

  1. (1) पाऊस - पावसाने
  2. (2) पान - पानांचा
  3. (3) पश्चिम - पश्चिमेला
  4. (4) गुजरात - महाराष्ट्र
See answer and solution
Q133

लेखकाच्या मते या वर्षी कोणती बाब आश्वासक ठरली आहे ?

  1. (1) पाण्याचा प्रश्न सुटला
  2. (2) पूरसदृश्य स्थिती
  3. (3) भूस्खलन झाले
  4. (4) मोसमी वारे
See answer and solution
Q134

क्रियापद नसलेला पर्याय शोधा.

  1. (1) असते
  2. (2) दिसते
  3. (3) कारणे
  4. (4) ठरते
See answer and solution
Q135

तीव्र द्रोणीय स्थितीमुळे काय घडते ?

  1. (1) पावसाचे परिणाम समजून घेता येते.
  2. (2) पावसाची तीव्रता अधिक असते.
  3. (3) पावसाचे प्रमाण कमी होते.
  4. (4) दुष्काळसदृश्य परिस्थिती होते.
See answer and solution
Q136

इयत्ता आठवीची शिक्षिका विद्यार्थ्यांना पुढील स्वाध्याय देते. त्यावरून पुढील लेखनाला काय म्हणता येईल ?
‘आता विद्यार्थ्यांना छापील पुस्तकांची आवश्यकता नाही’ या विषयावर जोडीने बुद्धिमंथन करणे, कल्पनांना लिहून काढणे आणि त्या आधारावर एक चांगला मजकूर तयार करणे ज्यात दोन मत विषयाच्या विरोधात आणि दोन मत त्याच्या बाजूने असतील.

  1. (1) वैयक्तिक लेखन (Personal writing)
  2. (2) विवरणात्मक लेखन (Expository writing)
  3. (3) चर्चात्मक लेखन (Discursive writing)
  4. (4) वर्णनात्मक लेखन (Descriptive writing)
See answer and solution
Q137

भाषा ग्रहण आणि भाषा शिक्षणाच्या संदर्भातील उपजत गृहित कल्पनेच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

  1. (1) भाषा-ग्रहणात पालक, सवंगडी आणि मुलाच्या सभोवती असणारी माणसे आणि वातावरण यांचे प्रयत्न
  2. (2) भाषा ही माणसांसाठी आणि जी माणसे भाषा बोलतात त्याच्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण असते
  3. (3) भाषा क्षमता ही मुलांना मिळालेली देणगी असते आणि ती त्यांना काळजीपूर्वक सराव आणि अभ्यासातून सुचते
  4. (4) भाषा क्षमता मुलांना दैवी देणगी असते त्यामुळेच ते ती ग्रहण करतात आणि उच्चारतात
See answer and solution
Q138

पुढीलपैकी ऊर्ध्वगामी (Bottom-up) श्रवण उपक्रम कोणते ?

  1. (1) अनुलेखन, क्लोझे (Cloze) श्रवण, बहुपर्यायी प्रश्नांचा वापर, सकारात्मक आणि नकारात्मक विधान ओळखणे
  2. (2) सारांश करणे, संपूर्ण संदेश ऐकणे आणि पार्श्वज्ञानाचा वापर करणे
  3. (3) ऐकल्यानंतर सरमिसळ झालेल्या शब्दांना योग्य क्रमात लावून वाक्य तयार करणे
  4. (4) कवितेचे वाचन, तात्कालिक भाषण, वक्तृत्व आणि चर्चा
See answer and solution
Q139

भाषा शिक्षणात ‘साहित्याची/सामग्रीची शिक्षणशास्त्रीय सिद्धी’ (Pedagogical realization of materials) याचा अर्थ.........

  1. (1) भाषिक शिक्षणशास्त्रास उत्तेजन देण्यासाठीचे अंतर्निधान उपक्रम आणि कृती
  2. (2) सामग्रीत शिक्षणशास्त्राचा अंतर्भाव करणे म्हणजे शिक्षकांना शिक्षणशास्त्राचा अवलंब करता येईल
  3. (3) शिक्षिकेला तिच्या वर्गात शिक्षणशास्त्र समजून घेण्यास मदतरूप होणे
  4. (4) वर्गात वापरण्यासाठी विविध शिक्षणशास्त्र धोरणांची यादी करणे
See answer and solution
Q140

शाळेतील सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषेतून करतात आणि उत्तरोत्तर एकापेक्षा अधिक भाषा आत्मसात करतात. ‘शिक्षणात-भाषा धोरण’ या संदर्भात याला काय म्हणता येईल ?

  1. (1) संस्कृती विशिष्ट शिक्षणात-भाषा धोरण
  2. (2) शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्र
  3. (3) भाषा शिक्षणात मातृभाषा म्हणजे मूलाधार
  4. (4) मातृभाषा आधारित बहुभाषिकता
See answer and solution
Q141

संध्या ‘मशीन लर्निंग’ या वरील एक लेख काही माहिती मिळविण्यासाठी वाचते. तिचे हे वाचन म्हणजे ?

  1. (1) दृष्टिक्षेप करणे (Glancing)
  2. (2) परीक्षण करणे (Reviewing)
  3. (3) चाळणे (Skimming)
  4. (4) न्याहाळणे (Scanning)
See answer and solution
Q142

पुढील कृती म्हणजे........
“एका लहान मजकुराचे दोन भाग करुन किंवा त्यांतील वाक्ये आलटून पालटून एका गटाला दिली जातात. गटातील एक मुलगा ते वाक्य सांगतो नि दुसरा लिहितो. ही क्रिया पालटून पहिला मुलगा लिहितो नि दुसरा सांगतो. नंतर दोघेही एकत्र बसून पूर्ण मजकूर तयार करतात.”

  1. (1) प्रतिनिर्मिती (Transcreation)
  2. (2) परिच्छेद अनुलेखन (Paragraph dictation)
  3. (3) सह-अनुलेखन (Mutual dictation)
  4. (4) व्याकरण अनुलेखन (Grammar dictation)
See answer and solution
Q143

‘शिकणे म्हणजे अर्थाचा शोध घेणे’ त्यामुळे शिक्षणाची सुरुवात त्याच मुद्यांपासून करावी ज्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न मुले करीत असतात.
पुढीलपैकी कोणता पर्याय वरील शैक्षणिक तत्वज्ञानाचा पुरस्कार करतो ?

  1. (1) वर्तनवाद (Behaviourism)
  2. (2) रचनावाद (Constructivism)
  3. (3) बहु बुद्धिमत्ता (Multiple Intelligence)
  4. (4) संरचनावाद (Structuralism)
See answer and solution
Q144

घटक-प्रधान भाषा आदान (form-oriented language inputs) म्हणजे.......

  1. (1) भाषा शिकण्यासाठी घटकाचा (आदानाचा) अर्थ
  2. (2) शब्दसंग्रह, उच्चारण आणि व्याकरणाचा वापर
  3. (3) माहितीवर भर असणारे आदान
  4. (4) लिहिणे शिकण्यासाठी आदानाची क्षमता
See answer and solution
Q145

पुढीलपैकी ‘शिकण्यासाठीचे मूल्यमापन’ कोणते ?

  1. (1) अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत मुलांची प्रगती सुधारण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेले मूल्यमापन
  2. (2) वर्षाच्या शेवटी मुलांची प्रगती जाणून घेण्यासाठी आणि त्यांना बढती देण्यासाठी तयार करण्यात आलेले मूल्यमापन
  3. (3) विशिष्ट पातळीवर मुलांच्या यशाचे निदान करण्यासाठी राज्याकडून केले जाणारे मूल्यमापन
  4. (4) प्रत्येक सत्राच्या शेवटी मुलांची प्रगती पाहण्यासाठी तयार करण्यात आलेले मूल्यमापन
See answer and solution
Q146

उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे काय ?

  1. (1) बोलताना व लिहिताना आपण वापरतो ते शब्द
  2. (2) ऐकल्यावर आपण समजतो ते शब्द
  3. (3) आपल्याला समजत नाही ते शब्द
  4. (4) ऐकताना कधी-कधी आपल्याला आठवतात ते शब्द
See answer and solution
Q147

कवितेच्या अध्ययन-अध्यापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणत्या विधानाचे तुम्ही समर्थन करणार नाही ?

  1. (1) कविता विद्यार्थ्याच्या कल्पकतेच्या सरावासाठी असते
  2. (2) कविता भाषेसोबत काम करण्यासाठी असते
  3. (3) कविता आनंदासाठी असते
  4. (4) कविता व्याकरण शिकविण्यासाठी असते
See answer and solution
Q148

शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या विषयांवर मुलांशी बोलते, सादर करते. या भाषिक कौशल्याला काय म्हणतात ?

  1. (1) मूलभूत आंतरवैयक्तिक संभाषण कौशल्य
  2. (2) वास्तव जीवनाशी संबंधित भाषा
  3. (3) भाषिक नोंद
  4. (4) ज्ञानात्मक विद्याविषयक भाषा नैपुण्य
See answer and solution
Q149

पुढील विधानातून कोणते व्याकरणिक ज्ञान सूचित होते ?
‘घटकाची माहिती, त्याचे विवरण आणि त्याचा मर्यादित सरावात वापर’

  1. (1) क्षमता (Competence)
  2. (2) अधिज्ञानात्मक ज्ञान (Metacognitive knowledge)
  3. (3) प्रक्रियात्मक ज्ञान (Procedural knowledge)
  4. (4) निर्देशक ज्ञान (Declarative knowledge)
See answer and solution
Q150

पुढील उपक्रमात कोणत्या नियतकार्याचा अंतर्भाव आहे ?
“विद्यार्थ्यांना हॉटेलचे मॅन्यूकार्ड देण्यात येते आणि त्यांना 1800 रुपयांच्या मर्यादेत चार जणांसाठी खाद्यपदार्थांची ऑर्डर द्यायची आहे. एक व्यक्ती शाकाहारी आहे. एकास मशरुमची एलर्जी आहे. विद्यार्थ्यांना घरी परत जाण्यासाठी रिक्शाभाडे म्हणून 70 रुपये शिल्लक ठेवायचे आहेत. विद्यार्थी काय ऑर्डर करणार आहे, त्यांची आवड, आणि परतीच्या प्रवासासाठी लागणाऱ्या रिक्शाभाड्याविषयी चर्चा करतात.”

  1. (1) उच्च प्रतीचे चिंतन कौशल्य
  2. (2) (भाषेचा) अभ्यास-गुंतवणूक-प्रतिसाद-वापर
  3. (3) ज्ञानात्मक धोरण
  4. (4) (भाषेचा) सादरीकरण-सराव-उत्पादन
See answer and solution