Q100
पुढीलपैकी कोणत्या उपक्रमाचा कवीने सर्वात जास्त वेळा उल्लेख केला आहे ?
- (1) फुलणे
- (2) झुलणे
- (3) गाणे
- (4) जुळणे
सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 साठी योग्य पर्याय निवडा.
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर त्या तालावरती गाणे अमुचे जुळे
कुरणावरती, झाडांखाली
ऊन सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले!
दूर दूर हे सूर वाहती.
उन्हात पिवळ्या पहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले!
गाणे अमुचे लुकलुक तारा
पाऊस वर, मोर पिसारा या गाण्यातून फुले
फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सगळे खुळे
पुढीलपैकी कोणत्या उपक्रमाचा कवीने सर्वात जास्त वेळा उल्लेख केला आहे ?
CBSE answer: (3)
उत्तर: (3) गाणे
सावधान: 'प्राजक्ताची फुले' हे नाम आहे, 'फुलणे' ही क्रिया नाही; 'डुले' हे झुलणे नव्हे.