By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 8 Feb 2026 Paper 2 Marathi, Question 105

Topic: Vocabulary

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 साठी योग्य पर्याय निवडा.
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर त्या तालावरती गाणे अमुचे जुळे
कुरणावरती, झाडांखाली
ऊन सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले!
दूर दूर हे सूर वाहती.
उन्हात पिवळ्या पहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले!
गाणे अमुचे लुकलुक तारा
पाऊस वर, मोर पिसारा या गाण्यातून फुले
फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सगळे खुळे

Q105

कवितेतील ‘पृथ्वी’ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

  1. (1) ऊन
  2. (2) धरतीCorrect answer
  3. (3) प्राजक्त
  4. (4) सूर

Solution.

CBSE answer: (2)

उत्तर: (2) धरती

  1. 'पृथ्वी' म्हणजे जमीन, भूमी. धरती, धरा, वसुंधरा हे तिचे समानार्थी शब्द आहेत.
  2. कवितेत 'हसते धरती' असा उल्लेख आहे.
  3. ऊन, प्राजक्त (फूल) आणि सूर यांचा पृथ्वीशी अर्थसंबंध नाही.

सावधान: 'ऊन' आणि 'प्राजक्त' कवितेत आहेत, पण ते पृथ्वीचे समानार्थी नाहीत; फक्त अर्थ जुळणारा शब्द निवडावा.