कोणत्या सणासाठी बाईंचे कुटुंबीय गावाकडे आले ?
- (1) दसरा
- (2) दिवाळी
- (3) गौरी-गणपती
- (4) गुढीपाडवा
सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायांची निवड करा.
गावाकडे घर केले तेव्हाच घराजवळ दोन गुंठे जमीन ठेवली, त्यात सेंद्रिय भाजीपाला करता यावा हा उद्देश. गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरू झाल्यावर गावाकडे राहायलाच आलो. तेव्हा बऱ्याच भाज्या लावल्या. लॉकडाऊनमुळे हे नवीन दुर्लक्षित जग खुले झाल्याचा आनंद झाला. वर्षभर भाज्या पिकवल्या, त्या भाज्या खाण्यापेक्षा वाटण्यात समाधान जास्त होतं. मग मूग करावा असं वाटत होतं. मूग भरपूर होतील म्हटलं. मूग पेरला. पण कडेने भरपूर जागा राहिली मूग सगळीकडे उगवून आलाही नाही. मग वांगी, टोमॅटो, मिरच्या, फ्लॉवर, कोबी यांची रोपे कडेने लावली. पावटा, दोडका, घोसावळी, कारले यांच्या बिया टाकल्या. भेंडी, गवार, धना, मेथी, चाकवत, शेपू, पालकचे बी जागा दिसेल तिथे टाकले. पण मागच्या वेळी महिना दोन महिन्यांत काही काही भाज्या, कोथिंबीर सापडत होते आता काही लवकर दिसेना. सतत पाऊस पडत होता. मूग मात्र चांगला आला.
मुगाच्या शेंगा काळ्या पडू लागल्या. म्हणजे सुकून, पिकून तोडायला आल्या. पहिल्या दिवशी दोन बादल्या शेंगा सापडल्या. वाकून तोडताना कंबर दुखत होती. आता गौरी-गणपती साताऱ्याला बसवायचे तर शेंगांना आठवडाभर हात लागणार नाही. म्हणून मग गावाकडेच बसवायचे ठरवले. सणासाठी सून, मुलगा, नातू आले. पूर्वी या शेतात मोसंबीची बाग होती म्हणून या शेताला बागेतलं वावर किंवा शेत म्हणतात. या वावरात उसाची पारंपरिक पद्धतीने, लागवड न करता रोपे आणून लावायची, असं शिरबातात्यांनी सांगितले. नेहमीच उसाची लागवड पुरुष करतात. एक रोपे दोन फुटांच्या अंतरावर लावायचे. रोपे लावायला बायका लागतात. पाच बायका सांगितलेल्या. बायका आहेत तर मीही येते म्हटलं. मलाही काम शिकायला मिळेल. बायकांत, शेतात काम करायला छान वाटते. सगळ्या मिळून असल्या की शीण जाणवत नाही. मैत्री होते. नवऱ्यामागे शहरात गेली तरी मी मूळ शेतकऱ्याची लेक हे कसं विसरू शकेन. आवड आहे, शेतीमातीचं प्रेम, महत्त्व आहे. म्हणून आता या उतारवयात शेतात काम करावंसं वाटतं. थोडे दिवस राहिलेत आपले तर आपल्या मुळाकडे जाण्याची ओढ असावी तशी असेल. पण जीव रमतोय इथे शेतामातीत.
कोणत्या सणासाठी बाईंचे कुटुंबीय गावाकडे आले ?
CBSE answer: (3)
उत्तर: (3) गौरी-गणपती
सावधान: शेंगा तोडण्याचे काम आणि सण एकाच वेळी आल्याने लेखिकेने सण गावीच साजरा केला, हा संदर्भ लक्षात ठेवा.