By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 1 Marathi Language Question Paper with Answer Key

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवडा.
दक्षिण भारतातील अभयारण्यांना भेटी देणं मोठं आनंददायी आणि ज्ञानवर्धक असे. त्या परिसरातील सृष्टिसौंदर्याच्या दर्शनानं मन प्रफुल्लित व उल्हसित होई. अशाच पैकी वेदांतथंगल पक्षी-अभयारण्य होतं. आमचा मुक्काम मद्रासपासून जवळ असलेल्या चिंगलपेट इथं होता. अभयारण्य इथून छप्पन किलोमीटर अंतरावर होतं. नुकुताच पावसाळा संपलेला, तेथील बांधावर उभं राहून तळ्याकडे नजर टाकली तर पाण्यात वॅरिंगटोनियाचे डेरेदार वृक्ष विखुरलेले दिसत. या झाडांवर अगणित पाणपक्षी घरटी बांधत होते. तळ्यात भरपूर पाणी साचल्यामुळं मासेही विपुल होते. पक्ष्यांची पिल्लं या माशांवर पोसली जात. झाडाभोवती पाणी असल्यामुळं मांजर आणि मुंगूस यांसारख्या शत्रूंना पिलांपर्यंत पोचता येत नसे.
तमिळ भाषेत ‘वेदांतथंगल’ याचा अर्थ पक्ष्यांचा आसरा असा आहे. या क्षेत्राचं संरक्षण अठराव्या शतकापासून येथील गावकरी करीत आले आहेत; कारण तळ्याच्या पाण्यात पक्ष्यांची विपुल विष्ठा पडते. विष्ठामिश्रित पाणी भातशेतीला देण्यात येतं. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना कृत्रिम खताची गरज लागत नाही. म्हणून इथले गावकरीच या अभयारण्याचं रक्षण करतात. पक्ष्यांच्या घरट्यांपर्यंत कोणाला जाऊ देत नाहीत. पाण्यातील झाडाझाडांवर बगळे, काळेभोर पाणकावळे, घोंगल्या फोडी, राखी ढोक, तसेच कंकर, ढोकरी आणि रातढोकरी यांची घरटी दिसत.
म्हैसूर शहराजवळ पंधरा किलोमीटर अंतरावर रंगनतिथ्थू नावाचे पक्षी-अभयारण्य आहे. कावेरी नदीच्या पात्रातील 1·66 चौरस किलोमीटर बेटावरील अभयारण्यात घोंगल्या (कालवे), फोडी (ओपनबिल स्टॉर्क), पांढरा कंकर, रातढोकरी, करोता, पाणकावळे आणि गायबगळे नेहमीच दिसतात.
पहिल्या वर्षाच्या सत्रात कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यातील बंडीपूर आणि मधुमलाई या एकमेकांशेजारच्या अभयारण्यांना भेटी दिल्या. बंडीपूर इथं रानगवे आणि रानटी हत्तींचे कळप पाहिले. चितळांच्या झुंडीच्या झुंडी तिथल्या वनविश्रामगृहाभोवती सायंकाळी जमू लागत आणि सकाळी जंगलात निघून जात. मधुमलाई अभयारण्यात हत्तीवर बसून फेरफटका मारला. तिथली वनं मात्र दाट होती. रानगव्यांचे कळपच्या कळप चरताना दिसत. मदुराईपासून एकशेसाठ किलोमीटर अंतरावर केरळ राज्यातील पेरियार वन्यप्राणी अभयारण्य पाहिलं. पेरियार जलप्रकल्पाचा पाणपसारा दहा चौरस किलोमीटर आहे. सरणं आणि बेटं असलेल्या या जलाषयांच्या भोवती सुंदर वनं आणि गवती रानं पसरली आहेत.

Q91

पुढीलपैकी कोणत्या पर्यावरणीय घटकामुळे पक्ष्यांच्या पिल्लांची सुरक्षितता सुनिश्चित होते?

  1. (1) सतत मानवी पाळत
  2. (2) घरटी असलेल्या झाडांभोवती साठलेले पाणी
  3. (3) बॅरिंगटोनियाचे डेरेदार वृक्ष
  4. (4) शासनाकडून कायदेशीर संरक्षण
See answer and solution
Q92

‘आमचा मुक्काम मद्रासपासून जवळ असलेल्या चिंगलपेट इथं होता.’ वाक्यातील अधोरेक्षित शब्दाची जात शोधा.

  1. (1) विधि विशेषण
  2. (2) अव्ययसाधित विशेषण
  3. (3) सार्वनामिक विशेषण
  4. (4) क्रमवाचक संख्याविशेषण
See answer and solution
Q93

गावकरी आणि वेदांतथंगल पक्षी अभयारण्य चांच्यातील नातेसंबंध पुढीलपैकी कोणत्या पर्यायातून सूचित होतो?

  1. (1) आधुनिक कृषीतंत्रज्ञानावर अवलंबीत
  2. (2) मानव-वन्यजीव संघर्ष
  3. (3) नैसर्गिक संसाधनांचा व्यावसायिक वापर
  4. (4) मानव आणि निर्सग यांच्यातील शाश्वत सहअस्तित्व
See answer and solution
Q94

‘पावसाळा नुकताच संपला होता.’ या वाक्याचा काळ शोधा.

  1. (1) पूर्ण भूतकाळ
  2. (2) अपूर्ण भूतकाळ
  3. (3) साधा भूतकाळ
  4. (4) रीति भूतकाळ
See answer and solution
Q95

अभयारण्याच्या चवळपासच्या शेतांत कृत्रिम खताची गरज पडत नाही. कारण

  1. (1) झाडे मातीची धूप रोखतात, त्यामुळे माती सकस होते.
  2. (2) माशांची विपुलता खताचे कार्य करते.
  3. (3) अठराव्या शतकापासून तशी परंपरा आहे.
  4. (4) विष्ठामिश्रित पाणी शेतीला देण्यात येते जे नैसर्गिक खताचे कार्य करते.
See answer and solution
Q96

“मधुमलाई अभयारण्यात हत्तीवर बसून फेरफटका मारला.” अधोरेखित शब्दाला कोणते अव्यय जोडलेले आहे?

  1. (1) शब्दयोगी अव्यय
  2. (2) उभयान्वयी अव्यय
  3. (3) क्रियाविशेषण अव्यय
  4. (4) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
See answer and solution
Q97

‘पक्ष्यांचा आश्रय किंवा थारा’ या अर्थाचा कोणता शब्द उताऱ्यात आला आहे?

  1. (1) पाणकावळे
  2. (2) वेदांतथंगल
  3. (3) गायबगळे
  4. (4) कळप
See answer and solution
Q98

उताऱ्याचा मध्यवर्ती आशय नेमका काय आहे?

  1. (1) दक्षिण भारतातील समृद्ध जैवविविधता
  2. (2) अभयारण्य पर्यटनातील संभाव्य धोके
  3. (3) वन्यजीव अभयारण्यापेक्षा पक्षी अभयारण्याचे श्रेष्ठत्व
  4. (4) लेखकाचे आत्मपुराण
See answer and solution
Q99

पुढीलपैकी कोणत्या पक्ष्यांचा संदर्भ उताऱ्यात आलेला नाही?

  1. (1) बगळे
  2. (2) पाणकावळे
  3. (3) भुरट्या घारी
  4. (4) रातढोकरी
See answer and solution

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवडा.
हे एक झाड आहे; याचे माझे नाते
वाऱ्याची एकच झुळुक
दोघांवरून जाते.
मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधून उमटणारे
जाणीव-ओले भास
पहिल्यानेच याची मोहरताना फांदी
ठेवली होती बाळगाणी
याच्या कटिखांदी
मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती
याच्या पानावरच्या रेषा
माझ्या तळहाती
ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल
रुजते आहे झाड
माझ्या रक्ताच्याही पैल
कधी तरी एके दिवशी मीच झाड होईन,
पानांमधून ओळखीचे
जून गाणे गाईन

Q100

‘वाऱ्याची एकच झुळुक दोघांवरून जाते’ पंक्तीतील अधोरेखित शब्दाला कोणता व्याकरणिक घटक जोडला गेला आहे?

  1. (1) उभयान्वयी अव्यय
  2. (2) शब्दयोगी अव्यय
  3. (3) विकल्पबोधक अव्यय
  4. (4) परीणामबोधक अव्यय
See answer and solution
Q101

‘पानावरच्या रेषा माझ्या तळहाती’ या ओळीतून कवयित्रीला काय सूचित करायचे आहे?

  1. (1) झाड आणि पान यांच्यातील दृष्य साम्यता
  2. (2) लोकजीवनात व्याप्त असलेली भाग्यरेषांची संकल्पना
  3. (3) निसर्ग व मानव यांच्यातील जीवनसंहितेची एकरूपता
  4. (4) अलंकारिक अतिशयोक्ती
See answer and solution
Q102

‘मीच झाड होईन’ या वाक्यातील ‘होईन’ हे क्रियापद कोणत्या काळाचे आहे?

  1. (1) साधा भविष्यकाळ
  2. (2) अपूर्ण भविष्यकाळ
  3. (3) पूर्ण भविष्यकाळ
  4. (4) रीति भविष्यकाळ
See answer and solution
Q103

‘मला फुलांचा वास आवडतो’ वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

  1. (1) सकर्मक क्रियापद
  2. (2) अकर्मक क्रियापद
  3. (3) शक्य क्रियापद
  4. (4) विकल्पबोधक कर्म
See answer and solution
Q104

‘मातीचे झाड, झाडाची मी’ या विधानातून कोणती भूमिका व्यक्त होते?

  1. (1) मानव-निसर्ग अद्वैत
  2. (2) मानव-निसर्ग द्वैत
  3. (3) स्वतंत्र कल्पनादृष्टी
  4. (4) मानवी स्वायत्तता
See answer and solution
Q105

झाडाच्या अंगखांद्यावर कोणती बाब कवयित्रीने जोपासली आहे?

  1. (1) ओले भास
  2. (2) पानावरच्या रेषा
  3. (3) झुळूक
  4. (4) बाळगाणी
See answer and solution
Q106

चॉमस्कीने असे मत मांडले आहे की, भाषा आत्मसात करण्याची जन्मजात क्षमता ही आपल्या समान जैविक क्षमतेचे परिणाम आहे, ही क्षमता म्हणजे

  1. (1) भाषा रूपांतर स्तर (Language Adaptation Degree)
  2. (2) भाषा प्राप्ती क्षेत्र (Language Acquire Domain)
  3. (3) भाषा स्वीकारण्याची इच्छा (Language Acceptance Desire)
  4. (4) भाषा आत्मसात करण्याचे साधन (Language Acquisition Device)
See answer and solution
Q107

भाषेत वापरला जाणारा सर्वात लहान अर्थपूर्ण ध्वनी घटक कोणता?

  1. (1) अर्थविज्ञान
  2. (2) स्वन
  3. (3) रुपिम
  4. (4) वाक्यव्यवस्था
See answer and solution
Q108

2 ते 3 महिन्याच्या मुलांमध्ये मुक्त स्वर उच्चारण्याची क्षमता असते. असे उच्चारण कशाचे उदाहरण आहे?

  1. (1) कुजबुजणे (Cooing)
  2. (2) बडबड (Babbling)
  3. (3) ओरडणे
  4. (4) एका शब्दाचे उच्चारण
See answer and solution
Q109

अंकिता सहा वेगवेगळ्या भाषा बोलते आणि समजते. तिची भाषिक क्षमता म्हणजे

  1. (1) एकभाषक वक्ता
  2. (2) भाषाशास्त्रज्ञ
  3. (3) बहुभाषिक वक्ता
  4. (4) द्विभाषिक वक्ता
See answer and solution
Q110

तुम्हाला कूट-मिश्रण, कूट-परिवर्तन, मुलांची भाषा आणि कूट भाषा अशा विषयांचा अभ्यास करण्याची आवड आहे, यासाठी तुम्ही पुढीलपैकी कोणत्या विद्याशाखेचा अभ्यास केला पाहिजे?

  1. (1) सांस्कृतिक मानसशास्त्र
  2. (2) मानववंशशास्त्र
  3. (3) समाजशास्त्र
  4. (4) समाजभाषाविज्ञान
See answer and solution
Q111

पुढीलपैकी कोणती बाब ही विसंगत विश्लेषणाचा (Contrastive analysis) घटक नाही?

  1. (1) पदिम
  2. (2) अर्थविज्ञान
  3. (3) शब्दकोश
  4. (4) ध्वनीशास्त्रीय
See answer and solution
Q112

इंग्रजी भाषा शिकवणारी तुमची सहाध्यायी वर्गात मातृभाषा मुक्तपणे वापरते असे तुमच्या लक्षात येते. ती पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा अवलंब करते?

  1. (1) श्रव्य-भाषिक
  2. (2) व्याकरण भाषांतर
  3. (3) संरचनात्मक मौखिक परिस्थिती
  4. (4) थेट (Direct)
See answer and solution
Q113

नेमका अर्थ मिळण्यासाठी फारसे तपशील न देता कमी शब्दात नेमकी माहिती देता देण्याची क्षमता म्हणजे

  1. (1) सारांशीकरण
  2. (2) प्रक्रिया लेखन
  3. (3) नोंदी घेणे
  4. (4) टिपण काढणे
See answer and solution
Q114

आवाजाच्या शैलीची कोणत्या पद्धतीने परिणामकारकरित्या पारख करता येते?

  1. (1) आवाजाचा वेग
  2. (2) शब्दांची निवड
  3. (3) आवाजाचा सूर
  4. (4) स्वरतंत्र (Vocals)
See answer and solution
Q115

वर्गात बैठक व्यवस्था लवचिक असली पाहिजे. याचे कारण

  1. (1) त्यामुळे मुलांना कायमस्वरूपी मित्रता निर्माण करता येणार नाही.
  2. (2) यामुळे विद्यार्थ्यांचे अनेक गट, जोड्या करून आणि संपूर्ण वर्ग उपक्रम करणे सोयीचे होते.
  3. (3) यामुळे विद्यार्थ्यांना हवी ती जागा हवी तेव्हा घेण्याचे स्वातंत्र्य मिळते.
  4. (4) यामुळे शिक्षिकेला वर्गात समानता निर्माण करण्यास मदत होते.
See answer and solution
Q116

प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणत्या घटकावर विशेष भर दिला पाहिजे?

  1. (1) वर्णमालेतील अक्षर ओळखणे
  2. (2) विरामचिन्हांचा वापर
  3. (3) ओघवते वाचन
  4. (4) समजून केलेले वाचन
See answer and solution
Q117

परिणामकरण संभाषणासाठी पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?

  1. (1) सतत इतरांना थांबवणे
  2. (2) सतत फिरणे व हावभाव करणे
  3. (3) तुमच्या मनात जे येईल ते सांगणे
  4. (4) इतरांना अगोदर ऐकणे
See answer and solution
Q118

इंग्रजी व्याकरण शिकविण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते?

  1. (1) आपले मूळ विचार वृद्धिंगत करणे.
  2. (2) लिहिताना आणि बोलताना आपल्या विचारांना योग्य आणि तर्कपूर्ण पद्धतीने मांडण्याची क्षमता विकसित करणे.
  3. (3) नियम पाठ करण्याची क्षमता वाढविणे.
  4. (4) अभ्यासात गोडी निर्माण करणे.
See answer and solution
Q119

प्राथमिक पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य विकसित करताना शिक्षिकेने विद्यार्थ्यांना कोणत्या विषयाशी संबंधित मुद्धांवर लेखन करण्यास प्रवृत्त केले पाहिजे?

  1. (1) राष्ट्रीय विषय
  2. (2) धार्मिक मान्यता
  3. (3) वैयक्तिक जीवन
  4. (4) सामाजिक विषय
See answer and solution
Q120

प्रत्येक विद्यार्थ्यांतील तफावत ओळखून त्यांना योग्य ती मदत करण्याची तुमची इच्छा आहे. असे करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या मूल्यमापन पद्धतीचा तुम्ही वापर कराल?

  1. (1) सवंगड्या सोबत मुल्यमापन (Peer Assessment)
  2. (2) निदानात्मक मुल्यमापन (Diagnostic Assessment)
  3. (3) समाकलित मुल्यमापन (Summative Assessment)
  4. (4) संस्कारक्षम मूल्यमापन (Formative Assessment)
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवडा.

टीपकागद किंवा त्यासारखे काही पदार्थ पाणी शोषतात. म्हणजे काही पदार्थांमध्ये पाणी गुरुत्याकर्षणाच्या नियमाला धाब्यावर बसवून, चक्क वरच्या दिशेने प्रवास करतं. ‘जीवन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाण्याचे अनेक विशेष गुणधर्म आहेत. त्यातला एक म्हणजे आसंजन (ॲडहेशन)! म्हणजे पाण्याला इतर दुसऱ्या पदार्थांबद्दल खूप आकर्षण असतं. त्याला दुसऱ्या पदार्थांना चिकटून राहायला आवडतं. आपण जेव्हा पेल्यातून पाणी पितो, तेव्हा पाण्याचे काही थेंब पेल्याच्या तळाला किंवा बाजूंना चिकटून राहतातच. पेला पूर्ण कोरडा होतच नाही. कधी आपण काचेच्या पेल्यात पाणी ओततो, तेव्हा पाणी आतून पेल्याच्या आतल्या पृष्ठभागावर चढलं आहे, असं दिसतं.

टीपकागद म्हणजे टिश्यू पेपर हा वनस्पतींच्या काष्ठतंतुंनी (सेल्युलोज फायबर) तयार झालेला असतो. त्यातही हा कागद तयार होताना काष्ठतंतूंच्या जाळ्यामध्ये बरीच रिकामी जागा राहून, त्यामुळे अगदी केसासारख्या बारीक नलिका तयार झालेल्या असतात. त्यामुळेच तर कागद सच्छिद्र बनतो. काष्ठतंतू हे ‘ग्लुकोज’च्या रेणुंच्या लांबलचक साखळ्यांमुळे तयार होतात. ‘ग्लुकोज’च्या रेणूंमध्ये ‘हायड्रॉक्सील (आयन)’ असतात. या ‘हायड्रॉक्सील’ आयनांमुळे, ग्लुकोजच्या आणि कागदाच्या संपर्कात आलेल्या पाण्याच्या, रेणुंमध्ये आकर्षण निर्माण होऊन, हायड्रोजनचे हलके बंध तयार होतात. या बंधामुळे, पाण्याचे पहिले काही रेणू काष्ठतंतूंकडे खेचले जातात. म्हणजे पाणी ग्लुकोजच्या साखळ्यांकडे खेचलं जातं आणि काष्ठतंतूंमध्ये असलेल्या केसासारख्या बारीक नलिकांमध्ये अलगदपणे प्रवेश करतं. म्हणूनच आपण पाण्याला ‘आसंजन’ गुणधर्म आहे; म्हणजेच पाण्याला दुसऱ्या पदार्थांवद्दल आकर्षण असण्याचा गुणधर्म आहे, असे म्हणतो.

पाण्याच्या रेणूंना, तुसऱ्या पदार्थांच्या रेणूंबद्दल जसं आकर्षण आहे, तसंच काही प्रमाणात, स्वतःच्याच रेणूंबद्दलही आहे. पदार्थात स्वतःच्या रेणूंमध्ये असणाऱ्या आकर्षणाला ‘एकसंघता’ (कोहेशन) म्हणतात. काष्ठतंतूंच्या ‘आसंजना’मुळे, नलिकांमध्ये शिरलेले पाण्याचे पुढचे रेणू, आपल्या मागच्या पाण्याच्या रेणूंना ‘एकसंघ’तेमुळे खेचायला लागतात आणि गुरुत्वाकर्षणाला न जुमानता, या असंख्य बारीक बारीक नलिकांमधून पाण्याचा प्रवास ऊर्ध्व दिशेने सुरू होतो. आपण म्हणतो, कागद पाणी शोषतो आहे. या संपूर्ण प्रक्रियेला ‘केशाकर्षण’ क्रिया असंही म्हणतात.

थोडक्यात म्हणजे, कागदाला असलेली सच्छिद्रता, काष्ठतंतूंमध्ये असलेल्या ग्लुकोज रेणूसाखळ्या आणि पाण्याचे रेणू यांच्यात होणारे बंध; आणि आसंजन आणि एकसंघता या दोन आकर्षण बलांमुळे वरच्या दिशेने प्रवाहित झालेलं पाणी; पाणी कोणत्याही पदार्थात गुरुत्वाकर्षणाविरुद्ध ‘शोषलं’ जाण्यामागची हीच मेख आहे.

Q121

ग्लुकोजच्या रेणूंमधील कोणता रासायनिक घटक पाण्याच्या रेणूंना आकर्षित करण्यास मदत करतो?

  1. (1) हायड्रॉक्सिल
  2. (2) ग्लुकोज
  3. (3) सेल्युलोज फायबर
  4. (4) सच्छिद्रता
See answer and solution
Q122

‘न सुटणारं कोडं’ या आशयाचा कोणता शब्द उताऱ्यात आला आहे?

  1. (1) आसंजन
  2. (2) काष्ठतंतू
  3. (3) मेख
  4. (4) केशाकर्षण
See answer and solution
Q123

पाण्याच्या कोणत्या गुणधर्मामुळे त्याला इतर पदार्थांचे आकर्षण असते?

  1. (1) एकसंघता
  2. (2) गुरुत्वाकर्षण
  3. (3) केशाकर्षण
  4. (4) आसंजन
See answer and solution
Q124

टीपकागद किंवा टिश्यू पेपरच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे त्यातून सहजपणे पाणी जाऊ शकते?

  1. (1) गुळगुळीत पृष्ठभाग
  2. (2) काष्ठतंतूंनी तयार केलेल्या केसांसारख्या नलिका
  3. (3) एकसंघता
  4. (4) कागदावरचे रासायनिक आवरण
See answer and solution
Q125

गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध टीपकागदात पाणी वरच्या दिशेने प्रवास का करते?

  1. (1) कागद जड असल्यामुळे
  2. (2) सूक्ष्म नलिकांमधील आसंजन गुणधर्मामुळे
  3. (3) पाण्यातील उष्णतेमुळे
  4. (4) वाष्पीभवनामुळे
See answer and solution
Q126

“गुरुत्वाकर्षणाला झुगारून पाणी वरच्या दिशेने प्रवास करते” अधोरेखित शब्द काय आहे?

  1. (1) उपसर्ग
  2. (2) विशेषनाम
  3. (3) क्रिया विशेषण
  4. (4) भाववाचक नाम
See answer and solution
Q127

उताऱ्यात वर्णन केलेले समान तत्व पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीशी साधर्म्य दर्शविते?

  1. (1) ब्लॉटिंग पेपरवर पसरलेली शाई
  2. (2) भांड्यात उकळणारे पाणी
  3. (3) पाण्यावर तरंगणारा बर्फ
  4. (4) पावसाचे उताराकडे वाहणारे पाणी
See answer and solution
Q128

पुढीलपैकी विशेषनाम शोधा.

  1. (1) वनस्पति
  2. (2) नलिका
  3. (3) काष्ठ
  4. (4) ग्लूकोज
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवडा.

सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाचा आवाका इतका मोठा की त्यांचे अस्तित्व जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी असे सर्वव्यापी आहे. अवकाशात हजार फूट उंचीवर किरणोत्सारावर जगणारे सूक्ष्म जीव आहेत, तसे समुद्राच्या खोल तळाशी वास्तव्य करणारे सूक्ष्मजीवदेखील आहेत. सूक्ष्मजीवांचा शोध लागला आणि शेकडो वर्षे आपण त्यांच्याकडे फक्त शत्रुत्वाच्या भावनेनेच बघितले. ते रोगकारक असतात आणि त्याचा नायनाट व्हायला हवा म्हणून जंतुनाशके आणि प्रतिजैविके शोधून काढण्याकडे संशोधनाचा कल होता. जंतूंच्या महासागरात वावरत असताना त्याला काही मानवच का बळी पडतात? आणि मग लक्षात आले की रोगप्रतिकारकशक्तीरूपी परवाना प्रत्येकाला जन्मजात मिळालेला असतो. त्याचे नूतनीकरण मात्र आवश्यक आहे. एखादा रोग बरा करण्यासाठी त्याच रोगाचा जंतू आवश्यक असतो असे जेव्हा लस संशोधनात लक्षात आले, तेव्हा तर शास्त्रज्ञ रोगजंतूंच्या इतके प्रेमात पडले की देवीचे निर्मूलन झाल्यावर जिनेव्हात ‘हे जंतू नष्ट करू नका, कदाचित भविष्यात लसनिर्मितीसाठी लागतील.’ असा ठराव घेण्यात आला.

मानवी शरीराचा प्रत्येक अवयव ही विविध सूक्ष्मजीवांची परिसंस्था असून जन्मल्यापासून तिथे मित्रजंतू वास करत असतात. आपल्या पेशीच्या आतदेखील सूक्ष्मजीव सहकार्याने वास्तव्य करत असतात. हाच तो मायक्रोबायोम! लठ्ठपणा, मधुमेह, नैराश्य, अलझायमर्स यांसारख्या आजारांशी मायक्रोबायोमचा असलेला संबंध अभ्यासला जात आहे. पृथ्वीवरील प्रत्येक जीवनचक्राची सुरुवात सूक्ष्मजीवांपासूनच होते. म्हणून ‘नेव्हर अंडरएस्टिमेट दी पॉवर ऑफ मायक्रोब्ज.’ या सूक्ष्मजंतूंचा जैवतंत्रज्ञानासाठी वापर सुरू झाल्यापासून शेती, उद्योग, वैद्यक, युद्ध, हवामान, पर्यावरण प्रदूषण, परग्रहावरील सृष्टीचा शोध आणि अशा जीवनातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाले. मित्रजंतूंचे संतुलन राखून प्रोबायोटिक्ससारख्या स्वास्थ्य उपचार पद्धतीदेखील विकसित झाल्या.

मानवाने अत्यंत चतुराईने सूक्ष्मजीवांच्या जनुकांना हवे तसे संपादित करण्याची कला काळाच्या ओघात साध्य केली. यातूनच कृत्रिम जीवशास्त्रासारखे (सिंथेटिक बायोलॉजी) दुधारी शस्त्र मानवाच्या हाती लागले. कर्करोगासाठी ‘वाहक अभियांत्रिकी’चे तंत्र विकसित केले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हवे तसे सूक्ष्मजीव आणि प्रथिने यांच्या रचना (डिझाइन) तयार केल्या जात आहेत. यातूनच अनेक असाध्य रोगांवर नजीकच्या काळात उपचार उपलब्ध होऊ शकेल. मात्र सावधान! जनुकांचे संपादन एखाद्या ‘सुपरबग’ला जन्माला घालू शकते. ही नैतिक जबाबदारी मात्र मानवाने स्वीकारली पाहिजे. म्हणूनच सूक्ष्मजीवांचे हे नवे युग मानवासाठी भीतीचे नव्हे, तर सजगतेचे, समतोलाचे आणि सहअस्तित्याचे आहे.

Q129

‘मानवाचा जन्म रोगप्रतिकारक शक्ती सह झालेला असतो; त्याचे नूतनीकरण मात्र आवश्यक असते’ या विधानातून लेखिकेला काय सुचवायचे आहे?

  1. (1) एकदा विकसित झाल्यावर प्रतिकारशक्ती कायम राहते.
  2. (2) जंतू कालांतराने नैसर्गिकपणे अदृष्य होतात.
  3. (3) रोग प्रतिकारशक्ती कायम राखण्यासाठी योग्यवेळी लसीकरण करून घेणे गरजेचे असते.
  4. (4) वृद्धावस्थेत रोगप्रतिकारशक्ती आपोआप कमकुवत होते.
See answer and solution
Q130

‘संपूर्णपणे नष्ट होणे’ या आशयाचा कोणता शब्द उताऱ्यात आला आहे?

  1. (1) वावर
  2. (2) परवाना
  3. (3) सुपरबग
  4. (4) नायनाट
See answer and solution
Q131

रोगास कारणीभूत जंतू नष्ट न करण्याचा सल्ला देणाऱ्या जिनेव्हा ठरावाचा अन्वयार्थ काय आहे?

  1. (1) जंतू नामशेष होत आहेत, त्यांना वाचवा.
  2. (2) रोगजंतूंना त्यांच्या हानिकारक परिणामांपलीकडे वैज्ञानिक मूल्य आहे.
  3. (3) जंतू सुरक्षितपणे साठवले चाऊ शकत नाही.
  4. (4) सूक्ष्मजंतूंशिवायही लस तयार केली जाऊ शकते.
See answer and solution
Q132

‘अवकाशात हजार फुट उंचीवर जगणारे जीव आहेत’ वाक्यातील विशेषणाचा प्रकार शोधा.

  1. (1) गणनावाचक संख्याविशेषण
  2. (2) गुणविशेषण
  3. (3) क्रमवाचक संख्याविशेषण
  4. (4) सार्वनामिक विशेषण
See answer and solution
Q133

‘सुपरबग’ तयार होण्याबद्दलचा इशारा आधुनिक विज्ञानाच्या कोणत्या कृती विषयी आहे?

  1. (1) सूक्ष्मजीवांची अनियंत्रित हाताळणी किंवा संपादन
  2. (2) वैद्यकीय संशोधनाची मंद गती
  3. (3) कृत्रिम बुद्धिमत्तेवर अत्यधिक अवलंबित्व
  4. (4) जैवतंत्रज्ञानासाठी निधीचा अभाव
See answer and solution
Q134

‘म्हणूनच सूक्ष्मजीवांचे हे नवे युग मानवासाठी भीतीचे नव्हे’ वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा.

  1. (1) अव्यय
  2. (2) विशेषण
  3. (3) नाम
  4. (4) सर्वनाम
See answer and solution
Q135

‘सूक्ष्मजीव सर्वव्यापी आहेत’ या उक्तीतून लेखिकेला काय सुचवायचे आहे?

  1. (1) सूक्ष्मजीव सर्व माणसांच्या शरीरात व्याप्त आहे.
  2. (2) सूक्ष्मजीव मानव शरीरातच जगू शकतात.
  3. (3) सूक्ष्मजीव पृथ्वी आणि त्यापलिकडच्या सगळ्या वातावरणात उपस्थित आहेत.
  4. (4) सूक्ष्मजीवांमुळे जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाला आहे.
See answer and solution
Q136

द्वितीय भाषा शिकण्याच्या सिद्धांताच्या संदर्भात-आत्मसात करणे, निरीक्षण करणे, प्राकृतिक, आदान, प्रभावी सिद्धांत या संज्ञा देणारे शास्त्रज्ञ कोण आहे?

  1. (1) व्यगोत्स्की (Vygotsky)
  2. (2) स्टीवन पिंकर (Steven Pinker)
  3. (3) चॉम्स्की (Chomsky)
  4. (4) स्टीफन क्राशेल (Stephen Krashen)
See answer and solution
Q137

पुढीलपैकी कोणता घटक प्रतवारी आणि क्रमवारी सिद्धांतात समाविष्ट आहे?

  1. (1) नियंत्रित शब्दकोश
  2. (2) प्रतवारी
  3. (3) सवय लावणे
  4. (4) नैसर्गिक मार्गाचे अनुसरण करणे
See answer and solution
Q138

तुमच्या असे लक्षात येते की तुमच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य भाषेच्या नमुन्यांच्या संपर्कात आणून त्यांना त्याचे अनुकरण करण्यास आणि प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करण्याची आवश्यकता आहे. असे करण्यासाठी पुढीलपैकी कौणती पद्धती सर्वात योग्य ठरेल?

  1. (1) थेट पद्धती
  2. (2) संभाषणात्मक भाषा अध्यापन
  3. (3) श्रव्य-भाषिक पद्धती
  4. (4) व्याकरण भाषांतर पद्धती
See answer and solution
Q139

‘मूलाने मातृभाषा शिकणे’ या कृतीला साधारणपणे असे मानले जाते

  1. (1) भाषा आत्मसात करणे (acquisition)
  2. (2) भाषा शिकणे (learning)
  3. (3) भाषा विलीनीकरण (assimilation)
  4. (4) अमूर्त भाषा विकास
See answer and solution
Q140

एक सक्रिय श्रोत्याला लगेच कळते

  1. (1) बोलणारा काय सांगत आहे त्यामागील तर्क
  2. (2) बोलणारा काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे
  3. (3) इतर व्यक्ती काय बोलत आहे
  4. (4) बोलणाऱ्याला काय सांगायचे आहे
See answer and solution
Q141

वर्गात कविता शिकविताना शिक्षिका अगोदर कवितेचे वाचन करते आणि विद्यार्थ्यांना समूह कार्यात समाविष्ट करून घेते. एक गट कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहितो एक गट कवितेतील मुख्य पात्राचे चित्र काढतो आणि एक गट कवितेचा सारांश लिहितो. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे :

  1. (1) विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करणे.
  2. (2) वर्गातील सर्व मुलांना उपक्रमात सहभागी करणे.
  3. (3) विद्यार्थ्यांची आवड आणि त्यांच्या विविध क्षमतांचे संगोपन करणे.
  4. (4) विद्यार्थ्यांना मूल्यमापनासाठी तयार करणे.
See answer and solution
Q142

द्वितीय भाषा वर्ग म्हणजे साधारणपणे विविध भाषांचा संगम असतो. अशा वर्गात शिक्षिकेचे धोरण विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट पुरविण्याकडे असावे?

  1. (1) अभ्यासक्रमावर बेतलेले विविध प्रकारचे कार्य
  2. (2) आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी मोकळे वातावरण
  3. (3) पाठाची सोपी आणि संक्षिप्त आवृत्ती
  4. (4) पर्याप्त सुबोध नोट्स
See answer and solution
Q143

विद्यार्थ्यांनी काळाचे प्रकार, पदबंध, आणि विशेषण अचूकपणे वापरावे यासाठी तुम्ही एक चाचणी मसुदा तयार करता. तुम्ही तयार केलेल्या या चाचणीत तुमचे धोरण आहे

  1. (1) प्रत्यक्ष व्याकरण चाचणी
  2. (2) अप्रत्यक्ष व्याकरण चाचणी
  3. (3) मिश्र व्याकरण कार्य
  4. (4) एकात्म व्याकरण चाचणी
See answer and solution
Q144

मूलं लहान वयात भिंतीवर, जमिनीवर आणि वह्यांमद्ये रेघोट्या मारतात. भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत याला काय म्हणतात?

  1. (1) खरडणे (Scribbling)
  2. (2) उदयोन्मुख साक्षरता
  3. (3) लेखन कौशल्य
  4. (4) आकृती विकास (Graphic development)
See answer and solution
Q145

संभाषणात्मक भाषा शिक्षण पुढीलपैकी कोणत्या घटकाच्या परस्परावलंबित्त्वावर भर देते?

  1. (1) भाषा आणि संभाषण
  2. (2) भाषा आणि संज्ञापन
  3. (3) भाषा आणि वर्तन
  4. (4) भाषा आणि मानसशास्त्र
See answer and solution
Q146

तुमच्या वर्गातील मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेची नोंद तुम्हाला ठेवायची आहे. यासाठी तुम्ही पुढीलपैकी कशाचा वापर कराल?

  1. (1) नियतकार्य तंत्र (Assignment technique)
  2. (2) प्रकल्प तंत्र
  3. (3) मौखिक तंत्र
  4. (4) निरीक्षण तंत्र
See answer and solution
Q147

व्याकरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

  1. (1) व्याकरणाचे ज्ञान बोलण्यात ओघ संपादित करण्यास मदतरूप ठरते.
  2. (2) व्याकरण म्हणजे नियमांचा संच ज्यांना वापरण्याअगोदर पाठ करणे आवश्यक असते.
  3. (3) व्याकरण म्हणजे भाषेची व्यवस्था जी आपल्याला संभाषण आणि लेखन कौशल्य उजळून घेण्यास मदत करते.
  4. (4) परकीय भाषा शिकण्यात व्याकरणाची कोणतीही भूमिका असत नाही.
See answer and solution
Q148

तहानी आणि लहान मुले अशा वातावरणात राहतात जिथे त्यांचा भाषेशी कोणत्याच प्रकारे संबंध येत नाही, तेव्हा त्यांचा भाषा विकास हा गंभीरपणे प्रभावित होतो. ही क्षती भरून काढता येत नाही. पुढीलपैकी कोणता पर्याय याला दुजोरा देतो?

  1. (1) देशीयता (Nativism)
  2. (2) विकासाचा संवेदनशील टप्पा
  3. (3) समाजभाषाविज्ञान
  4. (4) अर्थविज्ञान
See answer and solution
Q149

व्याकरण _____ या प्रकारे शिकवण्यात यावे.

  1. (1) ससंदर्भ सराव करून
  2. (2) विद्यार्थ्यांना लेखन प्रकल्प करावयास सांगून
  3. (3) विद्यार्थ्यांना नियम पाठ करण्यास उत्तेजन देऊन
  4. (4) विद्यार्थ्यांना पुरेसे प्रकल्प देऊन
See answer and solution
Q150

वर्गात तुम्हाला भाषासमृद्ध वातावरण तयार करावयाचे आहे. या साठी तुम्ही काय केले पाहिजे?

  1. (1) वर्गात संभाषण करताना फक्त इंग्रजी भाषेचा वापर करण्यास उत्तेजन देणे.
  2. (2) वर्गात लँग्वेज लॅब स्थापित करणे.
  3. (3) पालकांना भाषा-खेळ आणि तत्सम उपक्रम विकत घेण्यास प्रेरित करणे.
  4. (4) अशी संधी उपलब्ध करून देणे ज्यात भाषा दिसून येईल, पाहता येईल आणि तिचा वापर करता येईल.
See answer and solution