By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 1 Marathi, Question 102

Topic: Grammar

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवडा.
हे एक झाड आहे; याचे माझे नाते
वाऱ्याची एकच झुळुक
दोघांवरून जाते.
मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधून उमटणारे
जाणीव-ओले भास
पहिल्यानेच याची मोहरताना फांदी
ठेवली होती बाळगाणी
याच्या कटिखांदी
मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती
याच्या पानावरच्या रेषा
माझ्या तळहाती
ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल
रुजते आहे झाड
माझ्या रक्ताच्याही पैल
कधी तरी एके दिवशी मीच झाड होईन,
पानांमधून ओळखीचे
जून गाणे गाईन

Q102

‘मीच झाड होईन’ या वाक्यातील ‘होईन’ हे क्रियापद कोणत्या काळाचे आहे?

  1. (1) साधा भविष्यकाळCorrect answer
  2. (2) अपूर्ण भविष्यकाळ
  3. (3) पूर्ण भविष्यकाळ
  4. (4) रीति भविष्यकाळ

Solution.

CBSE answer: (1)

उत्तर: (1) साधा भविष्यकाळ

  1. 'होईन' म्हणजे पुढे केव्हातरी घडणारी क्रिया.
  2. धातूला थेट भविष्यकाळी प्रत्यय लागला आहे (हो + ईन), कोणतेही सहायक क्रियापद नाही.
  3. असे रूप साधा भविष्यकाळ दाखवते.

सावधान: 'होत असेन' असते तर अपूर्ण, 'झाले असेन' असते तर पूर्ण भविष्यकाळ.