By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 1 Marathi, Question 101

Topic: Poem comprehension

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवडा.
हे एक झाड आहे; याचे माझे नाते
वाऱ्याची एकच झुळुक
दोघांवरून जाते.
मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधून उमटणारे
जाणीव-ओले भास
पहिल्यानेच याची मोहरताना फांदी
ठेवली होती बाळगाणी
याच्या कटिखांदी
मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती
याच्या पानावरच्या रेषा
माझ्या तळहाती
ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल
रुजते आहे झाड
माझ्या रक्ताच्याही पैल
कधी तरी एके दिवशी मीच झाड होईन,
पानांमधून ओळखीचे
जून गाणे गाईन

Q101

‘पानावरच्या रेषा माझ्या तळहाती’ या ओळीतून कवयित्रीला काय सूचित करायचे आहे?

  1. (1) झाड आणि पान यांच्यातील दृष्य साम्यता
  2. (2) लोकजीवनात व्याप्त असलेली भाग्यरेषांची संकल्पना
  3. (3) निसर्ग व मानव यांच्यातील जीवनसंहितेची एकरूपताCorrect answer
  4. (4) अलंकारिक अतिशयोक्ती

Solution.

CBSE answer: (3)

उत्तर: (3) निसर्ग व मानव यांच्यातील जीवनसंहितेची एकरूपता

  1. पानावरच्या शिरा आणि तळहातावरच्या रेषा एकसारख्या आहेत, असे कवयित्री म्हणते.
  2. यातून झाड आणि आपले जीवन एकाच मुळातून आले आहे, हे ती सुचवते.
  3. संपूर्ण कविता झाड आणि 'मी' यांच्या नात्याबद्दल आहे.

सावधान: (1) फक्त बाहेरचे साम्य सांगते, तर (2) भाग्यरेषांचा विषय कवितेत नाही.