Q100
‘वाऱ्याची एकच झुळुक दोघांवरून जाते’ पंक्तीतील अधोरेखित शब्दाला कोणता व्याकरणिक घटक जोडला गेला आहे?
- (1) उभयान्वयी अव्यय
- (2) शब्दयोगी अव्यय
- (3) विकल्पबोधक अव्यय
- (4) परीणामबोधक अव्यय
सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवडा.
हे एक झाड आहे; याचे माझे नाते
वाऱ्याची एकच झुळुक
दोघांवरून जाते.
मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधून उमटणारे
जाणीव-ओले भास
पहिल्यानेच याची मोहरताना फांदी
ठेवली होती बाळगाणी
याच्या कटिखांदी
मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती
याच्या पानावरच्या रेषा
माझ्या तळहाती
ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल
रुजते आहे झाड
माझ्या रक्ताच्याही पैल
कधी तरी एके दिवशी मीच झाड होईन,
पानांमधून ओळखीचे
जून गाणे गाईन
‘वाऱ्याची एकच झुळुक दोघांवरून जाते’ पंक्तीतील अधोरेखित शब्दाला कोणता व्याकरणिक घटक जोडला गेला आहे?
CBSE answer: (2)
उत्तर: (2) शब्दयोगी अव्यय
सावधान: उभयान्वयी, विकल्पबोधक, परिणामबोधक ही सर्व वाक्ये किंवा शब्द जोडणारी अव्यये आहेत; येथे जोडणी नाही.