By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 1 Marathi, Question 133

Topic: Reading comprehension

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवडा.

सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाचा आवाका इतका मोठा की त्यांचे अस्तित्व जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी असे सर्वव्यापी आहे. अवकाशात हजार फूट उंचीवर किरणोत्सारावर जगणारे सूक्ष्म जीव आहेत, तसे समुद्राच्या खोल तळाशी वास्तव्य करणारे सूक्ष्मजीवदेखील आहेत. सूक्ष्मजीवांचा शोध लागला आणि शेकडो वर्षे आपण त्यांच्याकडे फक्त शत्रुत्वाच्या भावनेनेच बघितले. ते रोगकारक असतात आणि त्याचा नायनाट व्हायला हवा म्हणून जंतुनाशके आणि प्रतिजैविके शोधून काढण्याकडे संशोधनाचा कल होता. जंतूंच्या महासागरात वावरत असताना त्याला काही मानवच का बळी पडतात? आणि मग लक्षात आले की रोगप्रतिकारकशक्तीरूपी परवाना प्रत्येकाला जन्मजात मिळालेला असतो. त्याचे नूतनीकरण मात्र आवश्यक आहे. एखादा रोग बरा करण्यासाठी त्याच रोगाचा जंतू आवश्यक असतो असे जेव्हा लस संशोधनात लक्षात आले, तेव्हा तर शास्त्रज्ञ रोगजंतूंच्या इतके प्रेमात पडले की देवीचे निर्मूलन झाल्यावर जिनेव्हात ‘हे जंतू नष्ट करू नका, कदाचित भविष्यात लसनिर्मितीसाठी लागतील.’ असा ठराव घेण्यात आला.

मानवी शरीराचा प्रत्येक अवयव ही विविध सूक्ष्मजीवांची परिसंस्था असून जन्मल्यापासून तिथे मित्रजंतू वास करत असतात. आपल्या पेशीच्या आतदेखील सूक्ष्मजीव सहकार्याने वास्तव्य करत असतात. हाच तो मायक्रोबायोम! लठ्ठपणा, मधुमेह, नैराश्य, अलझायमर्स यांसारख्या आजारांशी मायक्रोबायोमचा असलेला संबंध अभ्यासला जात आहे. पृथ्वीवरील प्रत्येक जीवनचक्राची सुरुवात सूक्ष्मजीवांपासूनच होते. म्हणून ‘नेव्हर अंडरएस्टिमेट दी पॉवर ऑफ मायक्रोब्ज.’ या सूक्ष्मजंतूंचा जैवतंत्रज्ञानासाठी वापर सुरू झाल्यापासून शेती, उद्योग, वैद्यक, युद्ध, हवामान, पर्यावरण प्रदूषण, परग्रहावरील सृष्टीचा शोध आणि अशा जीवनातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाले. मित्रजंतूंचे संतुलन राखून प्रोबायोटिक्ससारख्या स्वास्थ्य उपचार पद्धतीदेखील विकसित झाल्या.

मानवाने अत्यंत चतुराईने सूक्ष्मजीवांच्या जनुकांना हवे तसे संपादित करण्याची कला काळाच्या ओघात साध्य केली. यातूनच कृत्रिम जीवशास्त्रासारखे (सिंथेटिक बायोलॉजी) दुधारी शस्त्र मानवाच्या हाती लागले. कर्करोगासाठी ‘वाहक अभियांत्रिकी’चे तंत्र विकसित केले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हवे तसे सूक्ष्मजीव आणि प्रथिने यांच्या रचना (डिझाइन) तयार केल्या जात आहेत. यातूनच अनेक असाध्य रोगांवर नजीकच्या काळात उपचार उपलब्ध होऊ शकेल. मात्र सावधान! जनुकांचे संपादन एखाद्या ‘सुपरबग’ला जन्माला घालू शकते. ही नैतिक जबाबदारी मात्र मानवाने स्वीकारली पाहिजे. म्हणूनच सूक्ष्मजीवांचे हे नवे युग मानवासाठी भीतीचे नव्हे, तर सजगतेचे, समतोलाचे आणि सहअस्तित्याचे आहे.

Q133

‘सुपरबग’ तयार होण्याबद्दलचा इशारा आधुनिक विज्ञानाच्या कोणत्या कृती विषयी आहे?

  1. (1) सूक्ष्मजीवांची अनियंत्रित हाताळणी किंवा संपादनCorrect answer
  2. (2) वैद्यकीय संशोधनाची मंद गती
  3. (3) कृत्रिम बुद्धिमत्तेवर अत्यधिक अवलंबित्व
  4. (4) जैवतंत्रज्ञानासाठी निधीचा अभाव

Solution.

CBSE answer: (1)

उत्तर: (1) सूक्ष्मजीवांची अनियंत्रित हाताळणी किंवा संपादन

  1. उताऱ्यात म्हटले आहे: 'जनुकांचे संपादन एखाद्या सुपरबगला जन्माला घालू शकते.'
  2. म्हणून इशारा जनुक संपादनाच्या बेजबाबदार वापराबद्दल आहे.
  3. संशोधनाची गती, निधी किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेवरचे अवलंबित्व यांचा इशाऱ्याशी संबंध नाही.