By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 8 Feb 2026 Paper 1 Marathi Language Question Paper with Answer Key

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

एकदा कुठेतरी प्रवासात होते. संध्याकाळची वेळ होती. रस्त्याच्या एका बाजूला उसाची तोडणी झाल्यानंतर राहिलेलं रान पेटवलं होतं. त्याचा गुळमट, जळकट वास येत होता आणि दुसऱ्या बाजूला एका लाकडाची खोकी बनवणाऱ्या छोट्या कारखान्याला अचानक अपघाताने आग लागली होती. आमचे ड्रायव्हर मामा अगदी सहज म्हणाले, “दोन्हीकडे जंगलेच पेटली आहेत.” मला भंगारवालीचे शब्द आठवले. पेटणं, जळणं, राख होणं हे केव्हाही वाईटच; पण झाडांच्या पेटण्याबद्दलची ती सहजता, ती बेपर्वाई माझ्या अंगावर आली.

परवाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी निवांतपणे घरातल्या लाकडी झोपाळ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते. घरात एका खोलीमध्ये उसाचं पाचटं टाकून त्याच्यावर आंब्याची आढी लावली होती. त्यांचा मंद सुवास घरभर दरवळत होता. गॅलरीत शेतावरचा गहू उन्हं द्यायला पसरून ठेवला होता. मधूनच एखाद–दुसरी चिमणी तिथे येऊन दाणा टिपून जात होती. घर गार रहावं म्हणून घराच्या गच्चीत पाणगवताचं पानाड पसरून ठेवलं होतं. बाहेर कडकडीत ऊन होतं. तरीही घरातला तो थोडासा गारवा खूप माणसं आणि झाडं ह्यांच्यात केवढं घनिष्ठ नातं! दोघंही पृथ्वीवर जन्मलेले, दोन्हीही निसर्गाचीच रूपं. माणूस आणि झाडं ह्यांच्यातल्या दुरावत चाललेल्या नात्यात डोकावण्याचा, ते नातं सांधण्याचा निसर्गाने कितीतरी वेळा प्रयत्न केला; पण माणसाने कधी युक्तीने तर कधी शक्तीने त्याला दूर लोटलं. खरं तर झाडांना काय हवं असतं? फक्त पाणी आणि अस्तित्व टिकविण्यासाठी थोडीशी मदत! त्या बदल्यात ते स्वतःचं सर्वस्व द्यायला तयार असतात; पण तरीही व्यवहारी माणसाला हा सौदा कधीच पटला नाही.

झाडं ‘दधीचि’ आहेत. माझ्या एक सासूबाई म्हणायच्या, ‘माणसानं वटवृक्षासारखं व्हावं. जमिनीत खोलवर शिरून आपली ताकद वाढवावी, कडक उन्हाला सहजपणे झेलावं, पांथस्थाला दाट सावली द्यावी. चिमण्या–पाखरांना आसरा द्यावा, थकल्या–भागलेल्याला विश्राम द्यावा आणि त्यांचे भरगच्च दुवे घ्यावेत.’

– आपण असा वृक्ष व्हावं असं मला वाटतं...!

Q91

‘दोन्हीकडे जंगलेच पेटली आहेत’ यातील अधोरेखित काय आहे?

  1. (1) सकर्मक क्रियापद
  2. (2) अकर्मक क्रियापद
  3. (3) संयुक्त क्रियापद
  4. (4) उभयान्वयी अव्यय
See answer and solution
Q92

‘निवांत’ या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द ओळखा.

  1. (1) निवास
  2. (2) अशांत
  3. (3) सुवास
  4. (4) शांत
See answer and solution
Q93

‘बाहेर कडकडीत ऊन होतं’ अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा.

  1. (1) कर्ता
  2. (2) कर्म
  3. (3) क्रियापद
  4. (4) विशेषण
See answer and solution
Q94

माणूस आणि झाडं यांच्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न कोणी केला?

  1. (1) निसर्गाने
  2. (2) झाडाने
  3. (3) कवीने
  4. (4) माणसाने
See answer and solution
Q95

‘लाकडी झोपाळ्यावर बसून वर्तमानपत्र वाचतं होते’ यातील शब्दयोगी अव्यय असलेला पर्याय शोधा.

  1. (1) झोपाळ्यावर
  2. (2) वर्तमानपत्र
  3. (3) वाचत होते
  4. (4) लाकडी
See answer and solution
Q96

झाडाला कशाची उपमा दिली आहे?

  1. (1) वटवृक्षाची
  2. (2) माणसाची
  3. (3) शक्तीची
  4. (4) दधीचीची
See answer and solution
Q97

‘पेटणं, जळणं, राख होणं हे केव्हाही वाईटच’ असे कोण म्हणाले?

  1. (1) भंगारवाली
  2. (2) आई
  3. (3) सासुबाई
  4. (4) ड्रायव्हर मामा
See answer and solution
Q98

माणसाने कसे असावे असे लेखिकेला वाटते?

  1. (1) पांथस्थासारखे
  2. (2) आईच्या अंगणासारखे
  3. (3) दधीचीसारखे
  4. (4) वटवृक्षासारखे
See answer and solution
Q99

आपण वृक्ष व्हावे असे लेखिकेला का वाटते?

  1. (1) झाडांचे अस्तित्व टिकवता यावे म्हणून
  2. (2) निसर्गाशी एकरूप होता यावे म्हणून
  3. (3) अनेकांचा आधार होता यावे म्हणून
  4. (4) झाडांशी नाते टिकवता यावे म्हणून
See answer and solution

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

फाल्गुन, चैत्रात
फुलून येतो वसंत
पानापानांत चैतन्य
नसे सृष्टीला उसंत

वैशाख, ज्येष्ठात
ग्रीष्माचा तडाखा
त्यातही गुलमोहर
हसतो सारखा

आषाढ, श्रावणात
पावसाच्या सरी
शेत डोलते झोकात
सुख येते घरोघरी

भाद्रपद, आश्विनात
शरदाचे चांदणे
शोभिवंत आकाश
गाई सुरेल तराणे

कार्तिक, मार्गशीर्षात
हेमंताचा गारवा
हुरडा, शेकोटीला चला
सांगे अवखळ पारवा

पौष, माघात
शिशिराचे आगमन
पानगळीनंतर पुन्हा
उमलते पान न् पान

प्रत्येक ऋतूचा
आहे महिमा वेगळा
नाना रूपांतून भरे
इथे निसर्गाची शाळा

Q100

या ऋतुसोहळ्याला कवीने काय म्हटले आहे?

  1. (1) पानगळ
  2. (2) उमलते पान
  3. (3) सुरेल तराणे
  4. (4) निसर्गाची शाळा
See answer and solution
Q101

फाल्गुन, चैत्रात
फुलून येतो वसंत
पानापानांत चैतन्य
नसे सृष्टीला उसंत

या कडव्यातील अधोरेखित शब्दांचे व्याकरण ओळखा.

  1. (1) कर्ता
  2. (2) विशेषण
  3. (3) क्रियापद
  4. (4) कर्म
See answer and solution
Q102

कोणत्या ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते?

  1. (1) हेमंत
  2. (2) शरद
  3. (3) ग्रीष्म
  4. (4) शिशीर
See answer and solution
Q103

गुलमोहर कोणत्या ऋतूत फुलून येतो?

  1. (1) शरद
  2. (2) ग्रीष्म
  3. (3) हेमंत
  4. (4) वसंत
See answer and solution
Q104

पुढीलपैकी कोणत्या महिन्यांमध्ये वसंत फुलून येतो?

  1. (1) भाद्रपद आणि आश्विन
  2. (2) वैशाख आणि ज्येष्ठ
  3. (3) फाल्गुन आणि चैत्र
  4. (4) कार्तिक आणि मार्गशीर्ष
See answer and solution
Q105

कोणत्या महिन्यांमध्ये घर सुखाने फुलून येते?

  1. (1) भाद्रपद – आश्विन
  2. (2) पौष – माघ
  3. (3) फाल्गुन – चैत्र
  4. (4) आषाढ – श्रावण
See answer and solution
Q106

विधान (A) : वर्गातील शैक्षणिक अनुभवांचा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी आणि घटनांशी गाढ संबंध असतो.
कारण (R) : शैक्षणिक अनुभवांची रचना विद्यार्थ्यांच्या पूर्व आकलनावर आधारित असते.
पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा.

  1. (1) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत मात्र (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
  2. (2) (A) बरोबर (R) चूक.
  3. (3) (A) चूक (R) बरोबर.
  4. (4) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
See answer and solution
Q107

भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही ?

  1. (1) भाषा शिकण्याला अवधी लागतो.
  2. (2) भाषा शिकणे म्हणजे अर्थ लावणे आहे.
  3. (3) भाषा शिकण्यासाठी व्याकरण शिकणे गरजेचे आहे.
  4. (4) भाषेशी पुरेसा संपर्क मिळवून दिला, तर प्रत्येक विद्यार्थी भाषा सहज शिकू शकतो.
See answer and solution
Q108

विद्यार्थी दुकानातून एखादी वस्तू विकत घेण्यासाठी व्यावहारिक भाषा कौशल्याचा वापर करू शकतो की नाही याचे मूल्यमापन करण्यासाठी विद्यार्थ्याकडून कोणती कृती करून घेणे उपयुक्त ठरेल?

  1. (1) त्याच्या खाण्या–पिण्याच्या आवडीवर लिहिणे
  2. (2) ग्राहक आणि दुकानदार यांच्यावरची लघुकथा वाचणे
  3. (3) ग्राहक आणि दुकानदार यांच्यावर दृष्य चित्र रेखाटणे
  4. (4) ग्राहक आणि दुकानदार यांच्यावर बेतलेला लहान संवाद लिहिणे
See answer and solution
Q109

एका शिक्षिकेला भाषा शिक्षणातील काही गोष्टी लक्षात येतात.
उदाहरणार्थ – विज्ञान संकल्पनांवरील मजकूर समजून वाचणे: ती अशा मुलांची निवड करते ज्यांना या विशिष्ट क्षमतेने वाचण्यात अडचण येते. ती त्यांच्यासाठी स्वतंत्र तास घेते आणि मजकूर वाचणे, समजून घेणे यासाठी मदत करते. हा सराव म्हणजे ______

  1. (1) उच्च पातळीचे कौशल्य
  2. (2) चिंतन कौशल्य
  3. (3) प्रत्याभरण शिक्षण
  4. (4) उपचारात्मक शिक्षण
See answer and solution
Q110

पुढीलपैकी वाचनाचे कोणते उपकौशल्य नाही ?

  1. (1) शब्दाचा अर्थ लावणे आणि अपरिचित शब्दांचा वापर करणे.
  2. (2) आवश्यक असलेली विशिष्ट माहिती न्याहाळणे.
  3. (3) प्रत्येक शब्दाचा अक्षरक्रम (spelling) माहित असणे.
  4. (4) शब्दसंग्रह जाणणे, महत्त्वाचा शब्द शोधता येणे.
See answer and solution
Q111

विधान (A) : विद्यार्थी संचयिका (Portfolio) म्हणजे विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा हेतुपूर्वक केलेला संग्रह असतो.
कारण (R) : विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या मर्यादा आणि क्षमतांचे मूल्यमापन करण्यास संचयिका (Portfolio) मदत करते.
पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा.

  1. (1) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत मात्र (R) हे (A) चे योग्य विश्लेषण नाही.
  2. (2) (A) बरोबर (R) चूक.
  3. (3) (A) चूक (R) बरोबर.
  4. (4) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य विश्लेषण आहे.
See answer and solution
Q112

विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह विकसित करण्यासाठी शिक्षक अशा सामग्रीचा वापर करतात ज्यात भाषा मुलांच्या अनुरूप सोपी करण्यात आली असून ती अधिकृत साधनांतून घेतली आहे. ही सामग्री म्हणजे :

  1. (1) रोल–कार्ड (Role Card)
  2. (2) द्वैभाषिक शब्दकोश
  3. (3) प्रतवार वाचनसाधन (Graded readers)
  4. (4) वर्तमान पत्र
See answer and solution
Q113

शिक्षिका विद्यार्थ्यांना प्रश्नसंच देते. तिला त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक पद्धती आणि आवड जाणून घ्यायची आहे. इथे शिक्षिकेची भूमिका ______ ही आहे.

  1. (1) योजनाकार
  2. (2) वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारी
  3. (3) निदान करणारी
  4. (4) प्रबंधक
See answer and solution
Q114

इयत्ता पहिलीची शिक्षिका मुलांना भिंतीवर रेघोट्या मारणे, रेखाटणे, लिहिणे काय वाट्टेल ते करण्यास सांगते. ती कोणत्या गोष्टीला उत्तेजन देते?

  1. (1) आनंद आणि मजा
  2. (2) लेखन कौशल्य विकास
  3. (3) वर्णमालेतील अक्षरे लिहिण्याची सुरुवात
  4. (4) उदीयमान साक्षरता विकास
See answer and solution
Q115

चित्रांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
पुस्तकातील चित्रे आणि रेखाटणे______.

  1. (1) विद्यार्थ्यांची आवड जपतात
  2. (2) अशी चित्रे काढण्याची संधी देतात
  3. (3) भाषेला अपरिचित आणि स्मरणीय संदर्भात प्रस्तुत करण्यात मदत करतात
  4. (4) सहायक घटक आहेत
See answer and solution
Q116

लहान विद्यार्थ्यांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

  1. (1) अगदी लहान विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना समजून घेणे अवघड ठरते.
  2. (2) अगदी लहान विद्यार्थी काही प्रमाणात अमूर्त संकल्पना समजून घेतात.
  3. (3) अगदी लहान विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पनांमधून प्रेरणा मिळते.
  4. (4) अगदी लहान विद्यार्थी अमूर्त संकल्पना समजून घेतात.
See answer and solution
Q117

वर्गात मुलांमध्ये संभाषण होण्यासाठी एक शिक्षक म्हणून तुम्ही कोणते पाऊल उचलाल ?
(a) विद्यार्थ्यांना अधिक प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करणे.
(b) जोड कार्य, गट कार्य करून विद्यार्थ्यांकडून त्यांचे मत मागणे.
(c) त्यांना मोठ्याने संहिता वाचण्यास लावणे आणि एकेकाला प्रतिभाव देण्यास सांगणे म्हणजे, व्यक्तिगत शिक्षण साकार होईल.
(d) एकेकासमोर संवाद वाचणे आणि एकेकाने परस्परांना प्रश्न विचारणे.

  1. (1) (b), (c), (d) योग्य आहेत.
  2. (2) (a), (b), (d) योग्य आहेत.
  3. (3) (a), (c), (d) योग्य आहेत.
  4. (4) (a), (b), (c) योग्य आहेत.
See answer and solution
Q118

भाषा विकासाचे ज्ञानात्मक सिद्धांत मानते की भाषा ही :

  1. (1) उत्तेजन आणि शिक्षा न शिकता येते.
  2. (2) समाजात संभाषण करून शिकता येते.
  3. (3) बोलणे सुरू करण्यापूर्वी मुलाच्या संकल्पना समजुतीवर अवलंबून असते.
  4. (4) माणसाची अंगभूत क्षमता असते.
See answer and solution
Q119

विधान (A) : सांस्कृतिक जागरूकता आणि अभिव्यक्तीसाठी भाषा ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. मुलांमध्ये महत्त्वाच्या क्षमता विकसित होण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते.
कारण (R) : सांस्कृतिक जागरूकता आणि अभिव्यक्तीची क्षमता मुलांमध्ये आपल्या अस्तित्त्वाची जाणीव, स्थान या सोबतच इतर संस्कृतीचा आदर करण्याची क्षमता निर्माण करते.
पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा.

  1. (1) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत मात्र (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
  2. (2) (A) बरोबर (R) चूक.
  3. (3) (A) चूक (R) बरोबर.
  4. (4) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहे आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
See answer and solution
Q120

पाठ्यपुस्तकांमध्ये लेखकांनी लिहिलेल्या कविता, गोष्टी, नाटक आणि इतर लेखन प्रकार असतात. आपणास अशा प्रकारची सामग्री निवडावी लागते कारण ती ______.

  1. (1) पाठ्यपुस्तक म्हणून वापरली जाणार या उद्दिष्टातून लिहिलेली असतात
  2. (2) ख्यातनाम लेखकांनी लिहिलेली असतात
  3. (3) सोप्या भाषेत असतात
  4. (4) ती अधिकृत असते आणि नैसर्गिक भाषेत असते
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा :
माझ्या आईच्या घरातून जरी त्या भावविश्वाचा जन्म झालेला असला तरी त्याची बीजं रुजली होती ती माझ्या आजीच्या सदाशिव पेठेतल्या घरात! आम्ही आजीला ‘वहिनी’ म्हणत असू, तिचं घर म्हणजे माझा एक अस्सल बालमित्र! खूप जुना!! त्याच्या फोटोवरची धूळ झटकल्यावर त्याचा तो कृष्ण–धवल चेहरा आठवून मनापासून हसू येतं. त्या फोटोत मी असते, माझ्या आईचं माहेर असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वयातलं माझं सर्वस्व असलेली माझी आजी असते. मी एक वर्षाची असल्यापासून जिच्या अंगाखांद्यावरच वाढले त्या माझ्या आजीचं ते छोटंसं घर म्हणजे त्या काळी माझ्यासाठी स्वर्ग का होता – हे आता मला माझी नातवंडं सांभाळताना रोज आठवतं. घराचं मोजमाप करायच्या पलीकडचं माझं ते वय होतं. आजी काही धनवान नव्हती पण खूप श्रीमंत होती मनाने. अत्यंत दिलदार अन् समृद्ध मन असलेल्या माझ्या आजीने त्या छोटुकल्या घराला एक असं व्यक्तिमत्त्व दिलं होतं की अजूनही त्या घराकडे पाहिलं तर खिडकीजवळच्या शिलाई मशीनवर आजी काहीतरी शिवत बसल्याचा भास होतो. अजूनही त्या घरासमोरून जाताना स्वादिष्ट मसालेभात आणि लोणकढी तुपातल्या मोहनथाळाचा सुवास दरवळून जातो. एखाद्या व्यक्तीचा चेहराच नव्हे तर संपूर्ण व्यक्तिमत्त्व परिधान केलेलं दुसरं घर माझ्या पहाण्यात नाही.
त्या घराने मला काय दिलं? तर मला हात दिले त्या घराने–दुसऱ्याला भरपूर देणारे! आणि दुसऱ्याच्या आनंदात आपलाही आनंद असतो हे शिकवणारं मनही दिलं! त्या घराला छोटं किंवा लहान म्हणायला मी धजावणार नाही कारण त्या छोट्याशा वास्तूपेक्षा खूप मोठं–विशाल मन तिथे राहत होतं. आजीची आर्थिक परिस्थिती मला आठवायचीच नाहीये कारण तिच्यासमोर अनंत अडचणी–आव्हानं असताना देखील मला तिने एखाद्या राजकन्येसारखं वाढवलं होतं! माझ्या त्या चिमुकल्या वयात माझ्या सर्व हट्टांचे पर्याय, प्रश्नांची उत्तरं आणि आनंदाचा ठेवा म्हणजे माझी आजी–वहिनी होती.
दुसऱ्याच्या गुणांवर प्रेम करण्यात मग्न असलेलं ते घर अनेकदा विसरून जात असे की आपल्या चांगुलपणाचा कितीतरी जण गैरफायदा घेत आहेत. त्या मग्नतेत घर हे देखील विसरून गेलं होतं की ते सर्वांपेक्षा जास्त गुणवान आहे. स्वतःमधला ‘राजहंस’ पाहायला देखील थोडीशी उसंत मिळावी लागते ना! – ती त्या घराला कधी मिळालीच नाही. बिचारं कित्येक वर्षं बदकाचं आयुष्य जगलं!

Q121

‘रुजणे’ या शब्दाच्या आशयाचा चुकीचा पर्याय कोणता ?

  1. (1) जगणे
  2. (2) उगवणे
  3. (3) रुतणे
  4. (4) लागणे
See answer and solution
Q122

‘त्या घराकडे पाहिलं तर खिडकीजवळच्या शिलाई मशीनवर आजीचा भास होतो’ यातील उभयान्वयी अव्यय कोणते?

  1. (1) तर
  2. (2) मशीन
  3. (3) आजी
  4. (4) घर
See answer and solution
Q123

पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा.

  1. (1) घर – अंगण
  2. (2) स्वर्ग – सुख
  3. (3) दिलदार – समृद्ध
  4. (4) कृष्ण – धवल
See answer and solution
Q124

आजीच्या घरात लेखिका कशी वाढली ?

  1. (1) बदकासारखी
  2. (2) श्रीमंतासारखी
  3. (3) राजकन्येसारखी
  4. (4) राजहंसासारखी
See answer and solution
Q125

‘मोहनथळाचा सुवास दरवळून जातो .’ यातील अधोरेखित काय आहे ?

  1. (1) संयुक्त क्रियापद
  2. (2) सकर्मक क्रियापद
  3. (3) अकर्मक क्रियापद
  4. (4) शब्दयोगी अव्यय
See answer and solution
Q126

लेखिकेला आजीचे घर कसे वाटत होते ?

  1. (1) आईच्या घरासारखे
  2. (2) श्रीमंतासारखे
  3. (3) दिलदार माणसासारखे
  4. (4) स्वर्गासारखे
See answer and solution
Q127

लेखिका आजीला कोणत्या नावाने संबोधत असे?

  1. (1) राजकन्या
  2. (2) वहिनी
  3. (3) आजी
  4. (4) आई
See answer and solution
Q128

‘त्याची बीजं रुजली’ यातील अधोरेखित काय आहे ?

  1. (1) अकर्मक क्रियापद
  2. (2) सकर्मक क्रियापद
  3. (3) कर्म
  4. (4) संयुक्त क्रियापद
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा :
एक असे कोणते काम आहे जे एकाच वेळेस कला, शास्त्र, विज्ञान, विरंगुळा, सामाजिक एकत्रीकरणाचे तसेच उदरनिर्वाहाचे साधन आहे आणि जगण्यासाठी अत्यावश्यकदेखील. कोड्याचे उत्तर सोप्पे आहे! स्वयंपाक करणे, अन्न शिजवणे अथवा जेवण तयार करणे! या एका कामात या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आहे! त्यात कला, संस्कृती, विज्ञान, विरंगुळा, व्यवसाय आणि जिवंत ठेवण्याचे सामर्थ्य आहे!
पूर्वापार जंगलात राहणाऱ्या आपल्या पूर्वजांनी जेव्हा स्वयंपाक करायला सुरुवात केली असेल, तिथपासून आजच्या इन्स्टंट फूडच्या प्लास्टिक डब्यात बंद असलेल्या जेवणाला मायक्रोवेव्ह करून खाणे हा सगळाच प्रवास अतिशय रंजक आहे! उत्क्रांतीच्या मोठ्या टप्प्याला घडवण्यात पाकशास्त्राचा मोठाच वाटा आहे. मुळात माणसे अन्न शिजवून खायला लागली त्या घटनेला आता जवळजवळ १.९ लाख वर्ष झाली. मानवीय शारीरिक अवयवांचा अभ्यास केला तर दात, दाढा, त्यांचा आकार, त्यांचे कंगोरे आणि चेहऱ्याच्या अनुषंगाने त्यांचे प्रमाण यातले बदल बारकाईने टिपले तर हे स्पष्ट होते की जसजसे माणूस शिजवलेले अन्न ग्रहण करू लागला, तसतसे दातांचा आणि हिरड्यांचा आकार, दाढांची रचना आणि कंगोरे बदलू लागले. त्यांचे टोकदार असणे कमी होऊ लागले. शिजवलेल्या अन्नाचे फलित म्हणजेच आजच्या घडीला उत्क्रांत झालेला मानवी देह आहे. हळूहळू पिढ्यानपिढ्या मेंदूत झिरपत गेलेल्या या ज्ञानाचे परिमार्जन म्हणजे आजची जगभरातील अतिशय वैविध्यपूर्ण, शास्त्रोक्त आणि उन्नत अशी खाद्य परंपरा!
मात्र खऱ्या अर्थाने आपण सर्वच जण या अतिविशाल परंपरेचे पाईक आहोत का ? पारंपरिकदृष्ट्या स्त्रियांना कच्च्या पदार्थातून योग्य असे पोषणतत्त्व खुबीने बाहेर काढून त्यावर प्रक्रिया करून ते ग्रहण करण्यायोग्य अन्न बनवण्याचे कसब आणि काम दिले गेले आहे. जगभरात घरातील स्त्रीवर्ग हा खाद्यपरंपरेचा आद्य पाईक आहे, मात्र विरोधाभास असा की जगभरातील सर्वश्रेष्ठ खानसामा, शेफ हे बहुतेककरून पुरुष आहेत. अशा वेळी नेमके जेवण तयार करणे, स्वयंपाक करणे हे काम आहे कोणाचे, हा प्रश्न पडतो!

Q129

उताऱ्याप्रमाणे जेवण तयार करणे या कृतीत कोणत्या गोष्टीचा समावेश नसतो ?

  1. (1) व्यवसाय
  2. (2) विरंगुळा
  3. (3) कंटाळा
  4. (4) संस्कृती
See answer and solution
Q130

लेखकाला कोणत्या बाबतीत अंतर्विरोध जाणवतो ?

  1. (1) अतिविशाल परंपरा आणि अन्न बनवणे
  2. (2) रंजक प्रवास आणि माइक्रोवेव्ह करून खाणे
  3. (3) मेंदूत झिरपणे आणि ज्ञानाचे परिमार्जन करणे
  4. (4) परंपरेने स्त्रियाच स्वयंपाक करतात मात्र बहुतेक शेफ पुरुष असणे
See answer and solution
Q131

‘आणि’, ‘म्हणून’, ‘पण’ यांना व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात ?

  1. (1) क्रियाविशेषण
  2. (2) अव्यय
  3. (3) समास
  4. (4) विशेषनाम
See answer and solution
Q132

शिजवलेल्या अन्नातून उत्तरोत्तर विकसित झालेला घटक कोणता ?

  1. (1) मायक्रोवेव्ह
  2. (2) मानवी देह
  3. (3) खानसामा
  4. (4) इन्स्टंट फूड
See answer and solution
Q133

पुढीलपैकी भाववाचक नाम शोधा.

  1. (1) कसब
  2. (2) फायदा
  3. (3) शहर
  4. (4) इंधन
See answer and solution
Q134

खाद्य परंपरेचा आदिमकाळापासूनचा अनुयायी असे लेखिकेने कोणाबद्दल म्हटले आहे ?

  1. (1) पाकशास्त्र
  2. (2) स्त्रीवर्ग
  3. (3) इन्स्टंट फूड
  4. (4) पुरुषवर्ग
See answer and solution
Q135

जागतिक खाद्य परंपरेचा उल्लेख करताना लेखकाने न वापरलेले विशेषण कोणते ?

  1. (1) अवनत
  2. (2) शास्त्रोक्त
  3. (3) उन्नत
  4. (4) वैविध्यपूर्ण
See answer and solution
Q136

शिक्षिकेला पाठातील एका घटकाशी सुसंगत अशी चित्रफीत सापडते. ती चित्रफितीच्या अवती भवती जोड कार्य करायचे ठरवते. या जोड कार्यातून तिला विद्यार्थ्यांच्या कोणत्या कौशल्याचे उत्तेजन करणे आहे ?

  1. (1) दोघांनी मिळून वेगाने कार्य करता येणे
  2. (2) स्वतंत्रपणे शिक्षकाचे काम करणे
  3. (3) भाषा जागरूकता विकसित करणे
  4. (4) स्वतःच्या कार्याचे मूल्यमापन
See answer and solution
Q137

भाषा शिक्षणात लघुकथा आणि इतर लेखन प्रकारांचा संग्रह पूरक वाचन म्हणून नेमण्यात येतो. या पूरक वाचनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते ?

  1. (1) गहन वाचनाला उत्तेजन देणे
  2. (2) नीतीपर वाचनाला उत्तेजन देणे
  3. (3) विस्तृत वाचनाला उत्तेजन देणे
  4. (4) बहुभाषिकतेला उत्तेजन देणे
See answer and solution
Q138

विधान (A) : उपचारात्मक शिक्षण हे अध्ययन–अध्यापन प्रक्रियेतील अंतर्भूत घटक आहे.
कारण (R) : उपचारात्मक शिक्षण म्हणजे पुन्हा शिकवणे, मात्र त्याच पद्धतीने शिकवणे गरजेचे नाही ज्यातून भाषिक घटक नीट पाठ केले गेले नव्हते.
पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा.

  1. (1) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत मात्र (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
  2. (2) (A) बरोबर (R) चूक.
  3. (3) (A) चूक (R) बरोबर.
  4. (4) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
See answer and solution
Q139

‘विद्यार्थ्याने कथा त्याच्या शब्दांत सांगणे’. या उपक्रमातून कोणत्या घटकाचे मूल्यमापन करता येते ?

  1. (1) ओघवता
  2. (2) आकलन
  3. (3) स्मरण
  4. (4) अचूकता
See answer and solution
Q140

भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती मान्यता चुकीची आहे ?

  1. (1) विद्यार्थ्यांची प्रथम भाषा त्याच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावते.
  2. (2) भाषा शिक्षणात संभाषणात्मक उपक्रमांवर भर देण्यात यावा.
  3. (3) भाषा शिक्षणात बोलण्यापेक्षा लिहिण्यावर जास्त भर देण्यात यावा.
  4. (4) विद्यार्थी वास्तव परिस्थितीत भाषा वापरण्याचा प्रयत्न करून भाषा आत्मसात करतात.
See answer and solution
Q141

भाषा शिक्षकाची पुढीलपैकी कोणती प्राथमिक जबाबदारी आहे ?

  1. (1) अध्यापनासाठी सामग्रीची निवड करणे
  2. (2) विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या गटात विभागणी करणे
  3. (3) विद्यार्थ्यांना सूचना देणे
  4. (4) विद्यार्थ्यांची संभाषणात्मक गरज लक्षात घेणे
See answer and solution
Q142

पायाभूत पातळी–वरची मुले __________ सहज आणि उत्तमप्रकारे आत्मसात करतात.

  1. (1) अधिकारिक भाषेत
  2. (2) त्यांच्या घरच्या भाषेत
  3. (3) इंग्रजी माध्यमात
  4. (4) शिक्षणाचे माध्यम
See answer and solution
Q143

पुढीलपैकी गोष्ट सांगण्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे ?
गोष्ट ऐकण्याने मुलांना __________ मदत मिळते.

  1. (1) वाक्य रचना शिकण्यास
  2. (2) प्रश्न सोडवण्याची क्षमता विकसित करण्यास
  3. (3) जीवनात नीती मूल्यांचे अनुसरण करण्यास
  4. (4) नवीन शब्द आणि शब्दसंग्रह विस्तारण्यात
See answer and solution
Q144

एका भाषा उपक्रमात शिक्षिका वेगवेगळ्या क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांचा गट तयार करते. या प्रकारचा गट तयार करण्यामागचे उद्दिष्ट म्हणजे __________.

  1. (1) त्यांच्या क्षमतेत व्यक्त होण्यासाठी वाव देणे
  2. (2) विद्यार्थ्यांना एकमेकांना मदत करण्यास प्रोत्साहन देणे
  3. (3) शिक्षकाचा भार कमी करणे, कारण शिक्षक प्रत्येकांवर लक्ष ठेऊ शकत नाही
  4. (4) कमकुवत विद्यार्थी ओळखणे
See answer and solution
Q145

विद्यार्थ्यांना __________ संपर्कात आणून पूर्णपणे गुंतवून घेतले पाहिजे.

  1. (1) लहान वयापासून दोन लिखित भाषांच्या
  2. (2) लहान वयापासून अनेक मौखिक भाषांच्या
  3. (3) लहान वयापासून अनेक लिखित भाषांच्या
  4. (4) लहान वयापासून दोन मौखिक भाषांच्या
See answer and solution
Q146

विधान (A) : रेखाटणे/चित्रे ही प्राथमिक साक्षरतेतील लेखनाची सुरुवात आहे.
कारण (R) : चित्रे/रेखाटणे हे संकेत असतात आणि अर्थवाहक असतात.
पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा.

  1. (1) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
  2. (2) (A) बरोबर (R) चूक.
  3. (3) (A) चूक (R) बरोबर.
  4. (4) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
See answer and solution
Q147

‘किमान–जोडी’ (Minimal pair) सराव हा कशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल ?

  1. (1) शब्दसंग्रह
  2. (2) उच्चारण
  3. (3) वाचन आकलन
  4. (4) व्याकरण
See answer and solution
Q148

पुढीलपैकी कोणता घटक भाषा ग्रहणाच्या वर्तनवादी (Behaviourist) सिद्धांताशी संबंधित नाही ?

  1. (1) कोरी पाटी (Empty vessel)
  2. (2) प्रयत्न आणि चुका (Trial and error)
  3. (3) सामाजिक संभाषण
  4. (4) व्यापारात्मक अभिसंधान (Operant Conditioning)
See answer and solution
Q149

इयत्ता पाचवीची शिक्षिका विद्यार्थ्यांना गोष्ट लिहायला सांगते. मुले कथा लिहित असताना शिक्षिका वर्गात चक्कर मारते आणि ज्या मुलाला नवीन शब्द हवा असेल त्याला आणि चुकत असलेल्या मुलांना मदत करते. शिक्षिकेची भूमिका म्हणजे :

  1. (1) नियोजनकार
  2. (2) मदतगार
  3. (3) उपचारकर्ता
  4. (4) प्रबंधक
See answer and solution
Q150

विधान (A) : वाचन हे अचूक शब्द उच्चारण्यापेक्षा काही जास्त असते.
कारण (R) : वाचन म्हणजे उकल करणे.
पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा.

  1. (1) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत मात्र (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
  2. (2) (A) बरोबर (R) चूक.
  3. (3) (A) चूक (R) बरोबर.
  4. (4) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
See answer and solution