By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 8 Feb 2026 Paper 1 Marathi, Question 131

Topic: Grammar

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा :
एक असे कोणते काम आहे जे एकाच वेळेस कला, शास्त्र, विज्ञान, विरंगुळा, सामाजिक एकत्रीकरणाचे तसेच उदरनिर्वाहाचे साधन आहे आणि जगण्यासाठी अत्यावश्यकदेखील. कोड्याचे उत्तर सोप्पे आहे! स्वयंपाक करणे, अन्न शिजवणे अथवा जेवण तयार करणे! या एका कामात या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आहे! त्यात कला, संस्कृती, विज्ञान, विरंगुळा, व्यवसाय आणि जिवंत ठेवण्याचे सामर्थ्य आहे!
पूर्वापार जंगलात राहणाऱ्या आपल्या पूर्वजांनी जेव्हा स्वयंपाक करायला सुरुवात केली असेल, तिथपासून आजच्या इन्स्टंट फूडच्या प्लास्टिक डब्यात बंद असलेल्या जेवणाला मायक्रोवेव्ह करून खाणे हा सगळाच प्रवास अतिशय रंजक आहे! उत्क्रांतीच्या मोठ्या टप्प्याला घडवण्यात पाकशास्त्राचा मोठाच वाटा आहे. मुळात माणसे अन्न शिजवून खायला लागली त्या घटनेला आता जवळजवळ १.९ लाख वर्ष झाली. मानवीय शारीरिक अवयवांचा अभ्यास केला तर दात, दाढा, त्यांचा आकार, त्यांचे कंगोरे आणि चेहऱ्याच्या अनुषंगाने त्यांचे प्रमाण यातले बदल बारकाईने टिपले तर हे स्पष्ट होते की जसजसे माणूस शिजवलेले अन्न ग्रहण करू लागला, तसतसे दातांचा आणि हिरड्यांचा आकार, दाढांची रचना आणि कंगोरे बदलू लागले. त्यांचे टोकदार असणे कमी होऊ लागले. शिजवलेल्या अन्नाचे फलित म्हणजेच आजच्या घडीला उत्क्रांत झालेला मानवी देह आहे. हळूहळू पिढ्यानपिढ्या मेंदूत झिरपत गेलेल्या या ज्ञानाचे परिमार्जन म्हणजे आजची जगभरातील अतिशय वैविध्यपूर्ण, शास्त्रोक्त आणि उन्नत अशी खाद्य परंपरा!
मात्र खऱ्या अर्थाने आपण सर्वच जण या अतिविशाल परंपरेचे पाईक आहोत का ? पारंपरिकदृष्ट्या स्त्रियांना कच्च्या पदार्थातून योग्य असे पोषणतत्त्व खुबीने बाहेर काढून त्यावर प्रक्रिया करून ते ग्रहण करण्यायोग्य अन्न बनवण्याचे कसब आणि काम दिले गेले आहे. जगभरात घरातील स्त्रीवर्ग हा खाद्यपरंपरेचा आद्य पाईक आहे, मात्र विरोधाभास असा की जगभरातील सर्वश्रेष्ठ खानसामा, शेफ हे बहुतेककरून पुरुष आहेत. अशा वेळी नेमके जेवण तयार करणे, स्वयंपाक करणे हे काम आहे कोणाचे, हा प्रश्न पडतो!

Q131

‘आणि’, ‘म्हणून’, ‘पण’ यांना व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात ?

  1. (1) क्रियाविशेषण
  2. (2) अव्ययCorrect answer
  3. (3) समास
  4. (4) विशेषनाम

Solution.

CBSE answer: (2)

उत्तर: (2) अव्यय

  1. ‘आणि’, ‘म्हणून’, ‘पण’ हे शब्द दोन शब्द किंवा वाक्ये जोडतात.
  2. लिंग, वचन, विभक्ती यांनुसार त्यांचे रूप बदलत नाही; म्हणून ते अव्यय आहेत (उभयान्वयी अव्यय).
  3. क्रियाविशेषण क्रियेबद्दल माहिती देते; समास हा शब्दांचा जोड प्रकार आहे; विशेषनाम हे नाम आहे.

सावधान: ‘म्हणून’ कारण दाखवतो म्हणून क्रियाविशेषण वाटू शकते, पण इथे तो वाक्ये जोडतो.