By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 8 Feb 2026 Paper 1 Marathi, Question 103

Topic: Poem comprehension

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

फाल्गुन, चैत्रात
फुलून येतो वसंत
पानापानांत चैतन्य
नसे सृष्टीला उसंत

वैशाख, ज्येष्ठात
ग्रीष्माचा तडाखा
त्यातही गुलमोहर
हसतो सारखा

आषाढ, श्रावणात
पावसाच्या सरी
शेत डोलते झोकात
सुख येते घरोघरी

भाद्रपद, आश्विनात
शरदाचे चांदणे
शोभिवंत आकाश
गाई सुरेल तराणे

कार्तिक, मार्गशीर्षात
हेमंताचा गारवा
हुरडा, शेकोटीला चला
सांगे अवखळ पारवा

पौष, माघात
शिशिराचे आगमन
पानगळीनंतर पुन्हा
उमलते पान न् पान

प्रत्येक ऋतूचा
आहे महिमा वेगळा
नाना रूपांतून भरे
इथे निसर्गाची शाळा

Q103

गुलमोहर कोणत्या ऋतूत फुलून येतो?

  1. (1) शरद
  2. (2) ग्रीष्मCorrect answer
  3. (3) हेमंत
  4. (4) वसंत

Solution.

CBSE answer: (2)

उत्तर: (2) ग्रीष्म

  1. वैशाख-ज्येष्ठाच्या कडव्यात कवी म्हणतो: 'ग्रीष्माचा तडाखा, त्यातही गुलमोहर हसतो सारखा.'
  2. कडक उन्हाळ्यातही गुलमोहर फुलून हसत असतो, म्हणजे तो ग्रीष्म ऋतूत फुलतो.

सावधान: (4) वसंत हा पर्याय पहिल्या कडव्यातील 'फुलून येतो वसंत' या शब्दांमुळे निवडला जाऊ शकतो; पण तिथे गुलमोहराचा उल्लेख नाही.