By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 8 Feb 2026 Paper 1 Marathi, Question 97

Topic: Reading comprehension

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

एकदा कुठेतरी प्रवासात होते. संध्याकाळची वेळ होती. रस्त्याच्या एका बाजूला उसाची तोडणी झाल्यानंतर राहिलेलं रान पेटवलं होतं. त्याचा गुळमट, जळकट वास येत होता आणि दुसऱ्या बाजूला एका लाकडाची खोकी बनवणाऱ्या छोट्या कारखान्याला अचानक अपघाताने आग लागली होती. आमचे ड्रायव्हर मामा अगदी सहज म्हणाले, “दोन्हीकडे जंगलेच पेटली आहेत.” मला भंगारवालीचे शब्द आठवले. पेटणं, जळणं, राख होणं हे केव्हाही वाईटच; पण झाडांच्या पेटण्याबद्दलची ती सहजता, ती बेपर्वाई माझ्या अंगावर आली.

परवाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी निवांतपणे घरातल्या लाकडी झोपाळ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते. घरात एका खोलीमध्ये उसाचं पाचटं टाकून त्याच्यावर आंब्याची आढी लावली होती. त्यांचा मंद सुवास घरभर दरवळत होता. गॅलरीत शेतावरचा गहू उन्हं द्यायला पसरून ठेवला होता. मधूनच एखाद–दुसरी चिमणी तिथे येऊन दाणा टिपून जात होती. घर गार रहावं म्हणून घराच्या गच्चीत पाणगवताचं पानाड पसरून ठेवलं होतं. बाहेर कडकडीत ऊन होतं. तरीही घरातला तो थोडासा गारवा खूप माणसं आणि झाडं ह्यांच्यात केवढं घनिष्ठ नातं! दोघंही पृथ्वीवर जन्मलेले, दोन्हीही निसर्गाचीच रूपं. माणूस आणि झाडं ह्यांच्यातल्या दुरावत चाललेल्या नात्यात डोकावण्याचा, ते नातं सांधण्याचा निसर्गाने कितीतरी वेळा प्रयत्न केला; पण माणसाने कधी युक्तीने तर कधी शक्तीने त्याला दूर लोटलं. खरं तर झाडांना काय हवं असतं? फक्त पाणी आणि अस्तित्व टिकविण्यासाठी थोडीशी मदत! त्या बदल्यात ते स्वतःचं सर्वस्व द्यायला तयार असतात; पण तरीही व्यवहारी माणसाला हा सौदा कधीच पटला नाही.

झाडं ‘दधीचि’ आहेत. माझ्या एक सासूबाई म्हणायच्या, ‘माणसानं वटवृक्षासारखं व्हावं. जमिनीत खोलवर शिरून आपली ताकद वाढवावी, कडक उन्हाला सहजपणे झेलावं, पांथस्थाला दाट सावली द्यावी. चिमण्या–पाखरांना आसरा द्यावा, थकल्या–भागलेल्याला विश्राम द्यावा आणि त्यांचे भरगच्च दुवे घ्यावेत.’

– आपण असा वृक्ष व्हावं असं मला वाटतं...!

Q97

‘पेटणं, जळणं, राख होणं हे केव्हाही वाईटच’ असे कोण म्हणाले?

  1. (1) भंगारवालीCorrect answer
  2. (2) आई
  3. (3) सासुबाई
  4. (4) ड्रायव्हर मामा

Solution.

CBSE answer: (1)

उत्तर: (1) भंगारवाली

  1. ड्रायव्हर मामांनी जंगले पेटल्याबद्दल सहज उद्गार काढले.
  2. त्या वेळी लेखिका म्हणते, 'मला भंगारवालीचे शब्द आठवले.'
  3. लगेच पुढचे वाक्य 'पेटणं, जळणं, राख होणं हे केव्हाही वाईटच' म्हणजेच ते आठवलेले शब्द आहेत.

सावधान: (4) ड्रायव्हर मामा हा पर्याय चुकीचा आहे; त्यांचे बोलणे सहज आणि बेपर्वा होते. सासूबाईंचे शब्द वटवृक्षाबद्दल आहेत आणि आईचा उल्लेखच नाही.