By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 8 Feb 2026 Paper 1 Marathi, Question 100

Topic: Poem comprehension

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

फाल्गुन, चैत्रात
फुलून येतो वसंत
पानापानांत चैतन्य
नसे सृष्टीला उसंत

वैशाख, ज्येष्ठात
ग्रीष्माचा तडाखा
त्यातही गुलमोहर
हसतो सारखा

आषाढ, श्रावणात
पावसाच्या सरी
शेत डोलते झोकात
सुख येते घरोघरी

भाद्रपद, आश्विनात
शरदाचे चांदणे
शोभिवंत आकाश
गाई सुरेल तराणे

कार्तिक, मार्गशीर्षात
हेमंताचा गारवा
हुरडा, शेकोटीला चला
सांगे अवखळ पारवा

पौष, माघात
शिशिराचे आगमन
पानगळीनंतर पुन्हा
उमलते पान न् पान

प्रत्येक ऋतूचा
आहे महिमा वेगळा
नाना रूपांतून भरे
इथे निसर्गाची शाळा

Q100

या ऋतुसोहळ्याला कवीने काय म्हटले आहे?

  1. (1) पानगळ
  2. (2) उमलते पान
  3. (3) सुरेल तराणे
  4. (4) निसर्गाची शाळाCorrect answer

Solution.

CBSE answer: (4)

उत्तर: (4) निसर्गाची शाळा

  1. कवितेत वर्षभरातील सहा ऋतूंचे वर्णन येते.
  2. शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो, प्रत्येक ऋतूचा महिमा वेगळा आहे आणि अनेक रूपांतून इथे 'निसर्गाची शाळा' भरते.
  3. म्हणजे या संपूर्ण ऋतुसोहळ्याला कवीने निसर्गाची शाळा म्हटले आहे.

सावधान: पानगळ, उमलते पान आणि सुरेल तराणे ही एकेका ऋतूची दृश्ये आहेत, संपूर्ण सोहळ्याचे नाव नाही.