फाल्गुन, चैत्रात
फुलून येतो वसंत
पानापानांत चैतन्य
नसे सृष्टीला उसंत
या कडव्यातील अधोरेखित शब्दांचे व्याकरण ओळखा.
- (1) कर्ता
- (2) विशेषण
- (3) क्रियापद
- (4) कर्म
सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
फाल्गुन, चैत्रात
फुलून येतो वसंत
पानापानांत चैतन्य
नसे सृष्टीला उसंत
वैशाख, ज्येष्ठात
ग्रीष्माचा तडाखा
त्यातही गुलमोहर
हसतो सारखा
आषाढ, श्रावणात
पावसाच्या सरी
शेत डोलते झोकात
सुख येते घरोघरी
भाद्रपद, आश्विनात
शरदाचे चांदणे
शोभिवंत आकाश
गाई सुरेल तराणे
कार्तिक, मार्गशीर्षात
हेमंताचा गारवा
हुरडा, शेकोटीला चला
सांगे अवखळ पारवा
पौष, माघात
शिशिराचे आगमन
पानगळीनंतर पुन्हा
उमलते पान न् पान
प्रत्येक ऋतूचा
आहे महिमा वेगळा
नाना रूपांतून भरे
इथे निसर्गाची शाळा
फाल्गुन, चैत्रात
फुलून येतो वसंत
पानापानांत चैतन्य
नसे सृष्टीला उसंत
या कडव्यातील अधोरेखित शब्दांचे व्याकरण ओळखा.
CBSE answer: (3)
उत्तर: (3) क्रियापद
सावधान: 'वसंत' आणि 'उसंत' नामे आहेत; अधोरेखित शब्द कोणाचेही वर्णन करत नाहीत, म्हणून विशेषण नाहीत.