By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 8 Feb 2026 Paper 1 Marathi, Question 95

Topic: Grammar

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

एकदा कुठेतरी प्रवासात होते. संध्याकाळची वेळ होती. रस्त्याच्या एका बाजूला उसाची तोडणी झाल्यानंतर राहिलेलं रान पेटवलं होतं. त्याचा गुळमट, जळकट वास येत होता आणि दुसऱ्या बाजूला एका लाकडाची खोकी बनवणाऱ्या छोट्या कारखान्याला अचानक अपघाताने आग लागली होती. आमचे ड्रायव्हर मामा अगदी सहज म्हणाले, “दोन्हीकडे जंगलेच पेटली आहेत.” मला भंगारवालीचे शब्द आठवले. पेटणं, जळणं, राख होणं हे केव्हाही वाईटच; पण झाडांच्या पेटण्याबद्दलची ती सहजता, ती बेपर्वाई माझ्या अंगावर आली.

परवाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी निवांतपणे घरातल्या लाकडी झोपाळ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते. घरात एका खोलीमध्ये उसाचं पाचटं टाकून त्याच्यावर आंब्याची आढी लावली होती. त्यांचा मंद सुवास घरभर दरवळत होता. गॅलरीत शेतावरचा गहू उन्हं द्यायला पसरून ठेवला होता. मधूनच एखाद–दुसरी चिमणी तिथे येऊन दाणा टिपून जात होती. घर गार रहावं म्हणून घराच्या गच्चीत पाणगवताचं पानाड पसरून ठेवलं होतं. बाहेर कडकडीत ऊन होतं. तरीही घरातला तो थोडासा गारवा खूप माणसं आणि झाडं ह्यांच्यात केवढं घनिष्ठ नातं! दोघंही पृथ्वीवर जन्मलेले, दोन्हीही निसर्गाचीच रूपं. माणूस आणि झाडं ह्यांच्यातल्या दुरावत चाललेल्या नात्यात डोकावण्याचा, ते नातं सांधण्याचा निसर्गाने कितीतरी वेळा प्रयत्न केला; पण माणसाने कधी युक्तीने तर कधी शक्तीने त्याला दूर लोटलं. खरं तर झाडांना काय हवं असतं? फक्त पाणी आणि अस्तित्व टिकविण्यासाठी थोडीशी मदत! त्या बदल्यात ते स्वतःचं सर्वस्व द्यायला तयार असतात; पण तरीही व्यवहारी माणसाला हा सौदा कधीच पटला नाही.

झाडं ‘दधीचि’ आहेत. माझ्या एक सासूबाई म्हणायच्या, ‘माणसानं वटवृक्षासारखं व्हावं. जमिनीत खोलवर शिरून आपली ताकद वाढवावी, कडक उन्हाला सहजपणे झेलावं, पांथस्थाला दाट सावली द्यावी. चिमण्या–पाखरांना आसरा द्यावा, थकल्या–भागलेल्याला विश्राम द्यावा आणि त्यांचे भरगच्च दुवे घ्यावेत.’

– आपण असा वृक्ष व्हावं असं मला वाटतं...!

Q95

‘लाकडी झोपाळ्यावर बसून वर्तमानपत्र वाचतं होते’ यातील शब्दयोगी अव्यय असलेला पर्याय शोधा.

  1. (1) झोपाळ्यावरCorrect answer
  2. (2) वर्तमानपत्र
  3. (3) वाचत होते
  4. (4) लाकडी

Solution.

CBSE answer: (1)

उत्तर: (1) झोपाळ्यावर

  1. 'झोपाळ्यावर' = 'झोपाळा' + 'वर'.
  2. नामाला जोडून येणारे आणि त्याचा वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवणारे अव्यय म्हणजे शब्दयोगी अव्यय.
  3. इथे 'वर' हे शब्दयोगी अव्यय 'झोपाळा' या नामाला जोडून स्थान दाखवते.
  4. 'वर्तमानपत्र' नाम आहे, 'वाचत होते' क्रियापद आहे आणि 'लाकडी' विशेषण आहे.

सावधान: 'लाकडी' मधील 'ई' हा प्रत्यय आहे, अव्यय नाही.