By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 15 Dec 2024 Paper 2 Marathi Language Question Paper with Answer Key

You are reading the question paper with answers. This is not the timed test: no clock is running and nothing is being scored.

Go to the timed test →

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

घर म्हणजे माणसांचं, कुटुंबाचं प्रतिबिंबं! माणसाच्या जगण्याला आकृतिबंध देणारी एक रचनाच! सतत बदलत राहणाऱ्या माणूसवृतीचं एक प्रतीकच! माणसाच्या स्वभावानुसार घराचा चेहरा दिसतो. घर माणसांशी इतकं एकरुप होत असतं की घराला माणसाचा चेहरा बरोबर ठाऊक असतो. माणूस घराच्या उंबऱ्याबाहेर पडला की त्याला एक अदृश्य बुरखा धारण करावा लागतो. घरात प्रवेश करताना मात्र माणसाचा बुरखा आपोआप गळून पडतो. माणूस घरात बुरखा घालून राहू शकत नाही. मला नेहमी असं वाटतं की घर नुसतं निवारा, संरक्षण, विश्राम अन् स्थैर्य देत नाही तर खऱ्या चेहऱ्याने काही काळ जगता येणं ही माणसाची गरज देखील घर पूर्ण करतं. माणसाला जगण्याची ओळख आणि त्या जगण्याला एक चौकट मिळते ती घरामुळेच.

घर! माणसाच्या जिवाभावाचा मित्र! माणसाच्या संस्कृतीचं एक प्रतीक! माणसाच्या प्राचीन काळापासूनच्या जीवनशैलीचा महत्त्वाचा साक्षीदार! त्याच्या गरजांप्रमाणे, सवयींप्रमाणे आणि लहरीप्रमाणे निरंतर बदलत आलेला! निसर्गातला प्रत्येक प्राणी कळपात राहतो. जिथे त्याचा कळप जातो तिथे त्याचं घर असतं. प्राण्यांना आडोसा लागत नाही, भिंत लागत नाही पण मनुष्यप्राण्याला मात्र त्याच्या भटक्या काळातही निवारा हवा असे, आसरा हवा असे. समुहात तो त्याला मिळतही असे. समूहात त्याला सुरक्षितही वाटत असे पण शेतीचा शोध लागला, जमिनीचं महत्त्व समजलं, कुटुंबभावना निर्माण झाली आणि मग ते जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी ‘घर’ ह्या बंदिस्त, सुरक्षित आणि ‘खाजगी’ वास्तूची निर्मिती झाली आणि मग न हलणाऱ्या, न बदलणाऱ्या, दणकट, कायमस्वरूपी घराचा जन्म झाला. पशू-पक्षी हे अन्नपाण्याच्या शोधात फिरतात आणि तिथेच वास्तव्य करतात पण माणूस मात्र त्याला हवं तिथे आधी घर बांधतो, त्याला हवं ते अन्न आणि पाणी तो घरात आणून ठेवतो. तो घराजवळ पाणी निर्माण करतो. अन्नधान्य, भाजीपाला, फळं हे सारं काही तो त्याला हवं त्या पद्धतीने मिळवतो, जमवतो आणि साठवून ठेवतो ते घरामुळे! घर म्हणजे माणसाला सांभाळणारा, सावरणारा आणि गोंजारणारा मित्र! त्याला निवारा अन् संरक्षण देणारा वास्तुपुरुष अन् असंख्य भावनांचा अनुभव देणारा भावसखा.

Q91

माणसाच्या जगण्याला कशामुळे अर्थ प्राप्त होतो?

  1. (1) घर
  2. (2) कुटुंब
  3. (3) स्वभाव
  4. (4) वृत्ती
See answer and solution
Q92

माणसाचा बुरखा गळून पडतो म्हणजे

  1. (1) त्याचा खरा चेहरा समोर येतो
  2. (2) तो घराला महत्त्व देतो
  3. (3) तो घराचे मोठेपण स्वीकारतो
  4. (4) तो घराला जगण्याची चौकट मानतो
See answer and solution
Q93

‘पशु-पक्षी हे अन्नपाण्याच्या शोधात फिरतात आणि तिथेच वास्तव्य करतात.’ अधोरेखित शब्द काय आहे?

  1. (1) कर्म
  2. (2) कर्ता
  3. (3) शब्दयोगी अव्यय
  4. (4) उभयान्वयी अव्यय
See answer and solution
Q94

घर म्हणजे _____ पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  1. (1) माणसाचा खरा मित्र
  2. (2) मानवी संस्कृतीचे प्रतीक
  3. (3) माणसाच्या गरजांचे विरोधक
  4. (4) मानवी जीवनशैलीचा साक्षीदार
See answer and solution
Q95

‘निसर्गातला प्रत्येक प्राणी कळपात राहतो’ यातील समूहवाचक नाम कोणते?

  1. (1) निसर्ग
  2. (2) प्राणी
  3. (3) कळप
  4. (4) राहतो
See answer and solution
Q96

घर पुढीलपैकी काय देत नाही?

  1. (1) संपत्ती
  2. (2) निवारा
  3. (3) संरक्षण
  4. (4) स्थैर्य
See answer and solution
Q97

घराला कशामुळे चेहरा प्राप्त होतो?

  1. (1) माणसाच्या चेहऱ्यामुळे
  2. (2) माणसाच्या स्वभावामुळे
  3. (3) घराच्या उंबरठ्यामुळे
  4. (4) माणसाच्या प्रवेशामुळे
See answer and solution
Q98

‘तो घरात आणून ठेवतो’ अधोरेखित काय आहे?

  1. (1) संयुक्त क्रियापद
  2. (2) सकर्मक क्रियापद
  3. (3) अकर्मक क्रियापद
  4. (4) उभयान्वयी अव्यय
See answer and solution
Q99

उताऱ्याप्रमाणे पुढीलपैकी कोणती बाब घराला लागू होत नाही?

  1. (1) बंदिस्त
  2. (2) सुरक्षित
  3. (3) सामुहिक
  4. (4) खाजगी
See answer and solution

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरतीं
फुलराणी ही खेळत होती
गोड निळ्या वातावरणांत
अव्याज मनें होतीं डोलत
प्रणयचंचला त्या भ्रूलीला
अवगत नव्हत्या कुमारिकेला
आईच्या मांडीवर बसुनी
झोंके घ्यावे, गावीं गाणीं
याहुनि ठावें काय तियेला
साध्या भोळ्या फुलराणीला

पुरा विनोदी संध्यावात
डोलडोलवी हिरवें शेत
तोंच एकदां हांसत आला
चुंबून म्हणे फुलराणीला
“छान माझी सोनुकली ती
कुणाकडे ग पाहत होती?
कोण बरें त्या संध्येंतून
हळुच पाहते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा
आवडला अमुच्या राणींना?”
लाजलाजली या वचनांनीं
साधी भोळी ती फुलराणी!

Q100

‘छान माझी सोनुकली’ असे फुलराणीला कोण म्हणाले?

  1. (1) शेत
  2. (2) वारा
  3. (3) आई
  4. (4) संध्या
See answer and solution
Q101

संध्याकाळी हळूच कोण डोकावून बघत आहे?

  1. (1) वारा
  2. (2) फुलराणी
  3. (3) कुमारिका
  4. (4) सूर्य
See answer and solution
Q102

‘झोंके घ्यावे, गावीं गाणीं’ या ओळीतील अधोरेखित शब्दांचे व्याकरण ओळखा

  1. (1) क्रियापद
  2. (2) कर्ता
  3. (3) कर्म
  4. (4) शब्दयोगी अव्यय
See answer and solution
Q103

‘अव्याज’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?

  1. (1) साधा
  2. (2) सरळ
  3. (3) निष्कपट
  4. (4) प्रेमळ
See answer and solution
Q104

फुलराणीच्या संदर्भात कवीने वापरलेला ‘प्रणयचंचला’ हा शब्द काय आहे?

  1. (1) विशेषण
  2. (2) सर्वनाम
  3. (3) शब्दयोगी अव्यय
  4. (4) विशेषनाम
See answer and solution
Q105

‘आईच्या मांडीवर बसुनी’ या ओळीतून कवी फुलराणीबद्दल काय सुचवत नाही?

  1. (1) फुलराणीचे लहानपण
  2. (2) फुलराणीचे साधेपण
  3. (3) फुलराणीचे निर्व्याजमन
  4. (4) फुलराणीचा हट्टी स्वभाव
See answer and solution
Q106

भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

  1. (1) भाषा शिक्षण हे फक्त भाषिक पाठ्यपुस्तके वाचून होते.
  2. (2) भाषा शिक्षणाला मुद्रितसंपन्न वातावरणात वेग मिळतो.
  3. (3) विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणासाठी भाषा शिक्षणाची गरज नसते.
  4. (4) भाषा शिक्षण अनवधानाने होते
See answer and solution
Q107

रडणे, हुंकारणे, बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत?

  1. (1) भाषिक (Linguistic)
  2. (2) पूर्व-भाषिक (Pre-linguistic)
  3. (3) भावनिक (Expressive)
  4. (4) ससंदर्भ (Referential)
See answer and solution
Q108

गर्वित वर्गात आपल्या मित्रांसोबत हिंदीत गप्पा मारत होता. जेव्हां त्याच्या शिक्षकांनी हाक दिली तेव्हा त्याने इंग्रजीत उत्तर दिले. हे कशाचे उदाहरण आहे?

  1. (1) भाषा-मिश्रण
  2. (2) बोली
  3. (3) समाज भाषाविज्ञान
  4. (4) भाषा-बदल
See answer and solution
Q109

प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित (outcomes) यांचा उल्लेख असतो याचा अर्थ

  1. (1) पाठ्यपुस्तकातील सामग्रीचा विचार करणे
  2. (2) वर्गातील मुलांच्या वर्तनात होणारे बदल
  3. (3) सर्वपाठ पूर्ण होणे
  4. (4) शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल
See answer and solution
Q110

प्रत्येक अभ्यासक्रम शिक्षणाचे फलित यावर भाष्य करते. शिक्षणाचे फलित (learning outcomes) म्हणजे

  1. (1) पाठ्यपुस्तकातील सामग्री विचारात घेणे
  2. (2) विद्यार्थांच्या वर्तन व्यवहारातील परिवर्तन
  3. (3) सर्व पाठांचा अभ्यास पूर्ण करणे
  4. (4) शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल
See answer and solution
Q111

तुमच्या फोनमधील संपर्कसूचीतून एक नंबर शोधणे. हे कशाचे उदाहरण आहे?

  1. (1) न्याहाळणे (Scanning)
  2. (2) पाहणी (Survey)
  3. (3) पुनर्पाहिणी (Review)
  4. (4) चाळणे (Skimming)
See answer and solution
Q112

विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावण्या ऐवजी त्यांना नवीन शब्द ससंदर्भ समजावून देणे

  1. (1) अनेकदा विद्यार्थ्यांना संभ्रमित करते
  2. (2) शब्द नीट समजून ध्यायला मदत करते
  3. (3) घोकंपट्टी करण्यास उत्तेजन देते
  4. (4) वेळेचा अपव्यय आहे
See answer and solution
Q113

अशाप्रकारचे लेखन ज्यात लेखक स्वतः त्यातील पात्र बनतो (काहीवेळा नसतो ही) आणि निवेदन करतो. याला काय म्हणतात?

  1. (1) निवेदनात्मक (Expository)
  2. (2) लाघवी (Persuasive)
  3. (3) वर्णनात्मक
  4. (4) कथन
See answer and solution
Q114

तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीतजास्त मुलांना सहभागी करुन घ्यायचे आहे. यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब कराल?

  1. (1) चर्चा (Discussion)
  2. (2) सादरीकरण (Demonstration)
  3. (3) आदर्शवाचन (Model reading)
  4. (4) पाठांतर (Recitation)
See answer and solution
Q115

एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती, संबंध आणि शब्दक्रमांची पद्धत ऐकतो. या प्रकारच्या ऐकण्याला काय म्हणता येईल?

  1. (1) ऊर्ध्वगामी प्रक्रिया
  2. (2) अधोगामी प्रक्रिया
  3. (3) अनुमानित प्रक्रिया
  4. (4) क्रमिक प्रक्रिया (Linear process)
See answer and solution
Q116

कथेचा अभ्यास करताना पुढीलपैकी कोणती बाब ‘वाचनादरम्यान उपक्रम’ ठरु शकते?

  1. (1) विद्यार्थी कथेतील घटनांचा अनुमान लावण्यासाठी चर्चा करतात.
  2. (2) विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात.
  3. (3) विद्यार्थी लेखकाच्या जीवनाविषयी चर्चा करतात.
  4. (4) शिक्षक नवीन शब्दांचा अर्थ विचारुन त्यांना वाक्यात उपयोग करण्यास उत्तेजन देतात.
See answer and solution
Q117

एका वर्गात तुम्ही प्रश्न न विचारता विद्यार्थ्यांना एक लहानसा मजकूर देऊन त्यांना प्रश्न तयार करण्यास सांगता. तुमच्या कृतीचे उद्दिष्ट कोणते?

  1. (1) तुमच्या विद्यार्थ्यांना एक चांगला पेपर सेटर म्हणून घडवणे.
  2. (2) ‘प्रश्न काढणे’, या तुमच्या कामात विद्यार्थ्यांची मदत घेणे
  3. (3) प्रश्न काढणे किती जिकिरीचे काम आहे याची विद्यार्थ्यांना जाणीव करुन देणे.
  4. (4) तुमच्या विद्यार्थ्यांची विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता विकसित करणे.
See answer and solution
Q118

भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट म्हणजे

  1. (1) प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या सहपाठी विद्यार्थ्यांच्या तुलनेत काय साध्य केले आहे, हे पाहणे
  2. (2) त्यांचे समग्र किंवा समाकलित (summative) मूल्यमापन करणे.
  3. (3) विद्यार्थ्यांची भाषिक कामगिरी, पाहणे
  4. (4) विद्यार्थ्यांचे भाषा प्रभुत्त्व, पाहणे
See answer and solution
Q119

शैक्षणिक साधनांच्या उपयोगाचे उद्दिष्ट म्हणजे

  1. (1) शिक्षण उपक्रमात विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे
  2. (2) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करणे
  3. (3) अनुशासनहीनतेच्या घटनांवर आळा घालणे
  4. (4) वर्गात विद्यार्थ्यांचे लक्ष लागावे
See answer and solution
Q120

तुमची एक विद्यार्थिंनी तिचे आवडते पुस्तक घेते आणि चित्राच्या मदतीने इतरांना सांगते. हे म्हणजे

  1. (1) उदयिमान वाचन अवस्था
  2. (2) स्वनिमिक जागरुकता
  3. (3) वाक्यरचना जागरुकता
  4. (4) कथन जागरुकता
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
पडणाऱ्या पावसाच्या आवाजाच्या आकर्षणाबरोबर मला आणखी एका आवाजाचं आकर्षण वाटे. तो आवाज म्हणजे घुबडाचा आवाज. आमच्या घराजवळ, ओढ्याच्या पलीकडे वडाचं खूप मोठ्ठं झाड आहे. त्या झाडावर बसून मध्य रात्री घुबड घुमत असे. त्याचा घुत्कार ऐकला की काळजात धडकी भरे. एकीकडे पावसाची संततधार लागलेली असे. त्याचा रप रप आवाज काळोखाची भयाणता वाढवी त्या भयाणतेत घुबडाचा आवाज भर घाली. घुबड घुमायला लागलं की मी टक्क जागी होई. आईला किंवा मोठ्या बहिणीला बिलगे. कानात प्राण आणून तो आवाज ऐके. खूप वेळ तो आवाज सहन होत नसे. काळजाचे ठोके वाढायला लागले, श्वास अडकायला लागले, भीतीने किंकाळी फोडावी वाटली की मी उठून धू ऽऽ म पळत सूटे. ओसरीवर बाबांची कॉट असे. माझ्या धावत येण्याची चाहूल त्यांना बरोबर लागे. ‘घाबरला का आमचा वाघ?’ बाबा विचारीत. मी त्यांच्या घोंगडीत शिरून त्यांना बिलगे. ‘थांब, थांब, हाकलू आपण घुबडीला’ असं म्हणत ते उठत काठी आपटून, आवाज करून तिला हाकलून देत. पुढे मोठी झाल्यावर, कॉलेजला जायला लागल्यावरसुध्दा मी घुबडीच्या आवाजाने जागी झाले की माझे बाबा तिला हाकलायला उठत, मी म्हणे, ‘नका हाकलू बाबा तिला, भीती नाही वाटत.’ खोल खोल विवरातून घुमत आल्यासारखा तिचा घुमारा काळजाला पिळ पाडू लागला की मी कुठल्यातरी अज्ञात विश्वात निघून जात असे.

घुबडीच्या आवाजाइतकाच भुरळ घालणारा आणि भीती वाटायला लावणारा दुसरा आवाज म्हणजे डोबीचा धबधबा. पुराचं पाणी खडकांवर, कपारींना आपटत आपटत फेसाळत पुढे जाऊन पन्नास-साठ फूट खोल दरीसारख्या भागात कोसळे. त्या कोसळण्याचा धाब ऽऽ धा ऽऽ ब आवाज रात्रीच्या निरव शांततेत भेसूर वाटे. जीवाचा कान करून काळजावर आपटणारा तो आवाज मी झोप लागेपर्यंत ऐकत असे.

Q121

लेखिकेला पावसाबरोबरच आणखी कोणत्या गोष्टीचे आकर्षण वाटते?

  1. (1) शेजारचा ओढा
  2. (2) घुबडाचा आवाज
  3. (3) वडाचं झाड
  4. (4) काळोख
See answer and solution
Q122

घुबड घुमायला लागल्यावर लेखिकेची जी परिस्थिती होत असे त्यातील चुकीची गोष्ट कोणती?

  1. (1) आई-बहिणीला बिलगणे
  2. (2) कानात प्राण आणून आवाज ऐकणे
  3. (3) काळजाचे ठोके वाढणे
  4. (4) आनंदाने नाचायला लागणे
See answer and solution
Q123

रात्रीची निरव शांतता कशामुळे भंग पावायची?

  1. (1) डोबीच्या धबधब्यामुळे
  2. (2) वडिलांच्या काठी आपटण्यामुळे
  3. (3) भीतीने किंकाळी फोडल्यामुळे
  4. (4) काळजाचे ठोके वाढल्यामुळे
See answer and solution
Q124

पुढील एकवचनी-अनेकवचनी शब्दजोडीपैकी चुकीचा पर्याय कोणता?

  1. (1) ठोका–ठोके
  2. (2) किंकाळी–किंकाळ्या
  3. (3) दरी–द-या
  4. (4) खडक–खडके
See answer and solution
Q125

“अज्ञात विश्वात निघून जात असे” अधोरेखित काय आहे?

  1. (1) अकर्मक क्रियापद
  2. (2) सकर्मक क्रियापद
  3. (3) संयुक्त क्रियापद
  4. (4) शब्दयोगी अव्यय
See answer and solution
Q126

‘विवर’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा

  1. (1) गुहा
  2. (2) बीळ
  3. (3) पोकळी
  4. (4) ओढा
See answer and solution
Q127

“ओढ्याच्या पलीकडे वडाचं खूप मोठ्ठं झाड आहे.” या वाक्यातील अव्यय ओळखा.

  1. (1) ओढा
  2. (2) पलीकडे
  3. (3) वड
  4. (4) झाड
See answer and solution
Q128

मध्यरात्री घुबड कशावर बसून घुमत असे?

  1. (1) वडाच्या झाडावर
  2. (2) ओढ्यावर
  3. (3) ओसरीवर
  4. (4) धबधब्यावर
See answer and solution

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
आषाढातला तो पहिलाच दिवस होता. श्रावणसरींच्या स्पर्शाने हिरवी मखमली दुलई ल्यालेली धारा सूर्याच्या मावळत्या किरणांनी फार लोभस दिसत होती. मंद वारा वाहत होता. सर्वत्र भरून राहिलेली ओलसर प्रसन्नता नुकताच निरोप दिलेल्या श्रावणाच्या अस्तित्वाची आठवण करून देत होती. त्याच परिसरात हिरव्यागार माळरानावर तितक्याच हिरवाईने ओथंबलेली एक लहानशी टेकडी दिसली. टेकडीवरती एका बाजूने उंचावलेली एक दरड मावळतीचे सूर्यकिरण झेलत अशी झोकात उभी होती की, तिला ओलांडून मला पुढे जाववेना. खाली उतरण्याचा मोह मला पुढे सरकू देईना. तसाच खाली उतरलो. त्या दणकट दरडीला माझ्या दीर्घ अन् सामर्थ्यवान् बाहूंनी धरून ठेवत तिला टक्कर देण्यातला आनंद लुटू लागलो. त्या दरडीवर पाय ठेवून सर्वत्र एकदा नजर फिरवली. सूर्यास्ताच्या किरणांचा सोनेरी लेप मिरवणारी ती टेकडी मला एखाद्या सम्राटाच्या राजसिंहासनासारखी भासली. भ्रमंतीचा सारा शीण क्षणात दूर झाला अन् आता इथेच जरा विसावा घ्यावा, असा विचार करत असतानाच त्या टेकडीवर उभा असलेला, माझ्याकडे एकटक नजरेने बघत असलेला एक मानव माझ्या दृष्टीस पडला. दुःखाने विदीर्ण झालेल्या त्या मानवाला ना त्याच्या देहाची शुद्ध होती, ना त्याच्या वस्त्रांची! दुःखाने सैरभैर झालेल्या त्या माणसाच्या मनातलं काहूर त्याच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झालं होतं. माझ्या नुसत्या दर्शनानेच त्याच्या हळव्या अंतःकरणाचा बांध फुटला होता. त्याच्या व्याकूळ नेत्रांमधल्या अश्रुपटलांनी मला तिथेच खिळवून ठेवलं. मानवी भावभावनांच्या गुंत्यात कधीही न अडकणाऱ्या मला त्या घनव्याकूळ डोळ्यांनी तिथेच अडवून ठेवलं अन् त्याच क्षणी पृथ्वीवरील मानवाच्या भावनांशी असलेल्या माझ्या नात्याचा प्रवास सुरू झाला. कुबेराने तडीपार केलेला तोच तो अलकानगरीतला यक्ष होता. विरहवेदनेने विद्ध झालेला-करुणार्त! रामगिरीवर बरसणाऱ्या श्रावणसरींनी आधी त्याला भिजवलं असेल, त्या रेशमी जलधारांनी त्याच्या मनःपटलावर असंख्य इंद्रधनुष्यही उमटवली असतील; प्रिय पत्नीच्या आठवणींचं हिरवंगार मोरपीस त्याच्या मनात थरारलं असावं! अशा वेळी अचानक सामोऱ्या आलेल्या मला पाहून यक्षाला काय वाटलं असेल बरं?

Q129

“विरहवेदनेने विद्ध झालेला करुणार्त.” असे लेखकाने कोणाचे वर्णन केले आहे?

  1. (1) मावळतीच्या सूर्यकिरणांचे
  2. (2) श्रावणसरींचे
  3. (3) यक्षाचे
  4. (4) इंद्रधनुष्याचे
See answer and solution
Q130

लेखकाने सम्राटाच्या राजसिंहासनाची उपमा कोणाला दिली आहे?

  1. (1) टेकडीला
  2. (2) इंद्रधनुष्याला
  3. (3) हिरव्या माळरानाला
  4. (4) रामगिरीला
See answer and solution
Q131

“श्रावणाच्या अस्तित्वाची आठवण करुन देत होती.” यातील अधोरेखित काय आहे?

  1. (1) सकर्मक क्रियापद
  2. (2) अकर्मक क्रियापद
  3. (3) संयुक्त क्रियापद
  4. (4) विशेषण
See answer and solution
Q132

“अशी झोकात उभी होती की तिला ओलांडून मला पुढे जाववेना.” यातील अधोरेखित शब्द ओळखा

  1. (1) शब्दयोगी अव्यय
  2. (2) उभयान्वयी अव्यय
  3. (3) न्यूनत्वबोधक अव्यय
  4. (4) विकल्पबोधक अव्यय
See answer and solution
Q133

मावळतीचे सूर्यकिरण कोण झेलत होते?

  1. (1) दरड
  2. (2) टेकडी
  3. (3) हिरवळ
  4. (4) माळरान
See answer and solution
Q134

लेखकाला श्रावणाचे अस्तित्व कशामुळे जाणवत होते?

  1. (1) मावळत्या सूर्यकिरणांमुळे
  2. (2) ओलसर प्रसन्नतेमुळे
  3. (3) मखमली दुलईमुळे
  4. (4) हिरव्या माळरानामुळे
See answer and solution
Q135

पुढीलपैकी कोणता शब्द उताऱ्यातील ‘काहूर’ या शब्दाचा अर्थद्योतक नाही?

  1. (1) दुःख
  2. (2) आनंद
  3. (3) चिंता
  4. (4) गोंधळ
See answer and solution
Q136

लेखनाच्या विविध अवस्था/टप्पे समजून लेखन शिकणे म्हणजे

  1. (1) लेखनाच्या प्रक्रियेचे धोरण
  2. (2) लेखनाचे उत्पादक धोरण
  3. (3) विश्लेषणात्मक लेखन
  4. (4) सर्जनशील लेखन
See answer and solution
Q137

विद्यार्थ्याच्या संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती मूल्यमापन पद्धती अधिक उपयुक्त ठरेल?

  1. (1) चित्र पुस्तकातील दृष्याचे विवरण सांगणे
  2. (2) नाटकात भूमिकाभिनय करणे
  3. (3) ध्वनिफीत ऐकून त्यावर भाष्य करणे
  4. (4) सांगितलेल्या मुद्यावर भाषण लिहिणे
See answer and solution
Q138

चॉम्स्कीच्या मते माणसांकडे भाषा विकसित करण्यासाठी _____ हे असते.

  1. (1) शैक्षणिक संच
  2. (2) जैविक कल
  3. (3) विशिष्ट दृष्टिकोणात्मक संच
  4. (4) संप्रेषण तत्परता
See answer and solution
Q139

अगदी आरंभीच्या अवस्थेपासून शाळेत बहुभाषिकतेचे धोरण स्वीकारल्याने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर आळा घालता येईल?

  1. (1) शाळेतील विद्यार्थ्यांची गळती
  2. (2) शैक्षणिक अक्षमता
  3. (3) एखाद्याची त्याची भाषा लुप्त होणे
  4. (4) सुमार संभाषण कौशल्य
See answer and solution
Q140

नवीन पाठाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांना तरतरीत होण्यासाठी गमती जमतीच्या गोष्टी करायला लावता. हे करण्याचे कारण

  1. (1) विद्यार्थ्यांना वर्गासाठी प्रेरित करणे
  2. (2) शिक्षक म्हणून स्वतःचा भार हलका करणे
  3. (3) पाठसुरु करण्यापूर्वी वर्गात अनुशासन असणे
  4. (4) विद्यार्थ्यांचे लक्ष वळवणे
See answer and solution
Q141

अध्ययनाचा सिद्धांत म्हणून विधायकतावाद (Constructivism) मानते

  1. (1) शिकणे हे वैयक्तीक गुणविशेष आहे
  2. (2) सर्व विद्यार्थी भाषा शिकू शकत नाही
  3. (3) शिकणे ही पूर्णतः मानसिक घटना आहे
  4. (4) शिकणे ही सामाजिक गुंफण आहे
See answer and solution
Q142

अनेकदा माणसे एकाच वाक्यात अनेक भाषाचे घटक गुंफतात. असे करणे म्हणजे

  1. (1) भाषा बदल
  2. (2) भाषा मिश्रण
  3. (3) समाज भाषा विज्ञान
  4. (4) बोली
See answer and solution
Q143

विद्यार्थांना अनेकदा भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमांमुळे बोलण्यात अडचण येते. या अडचणीवर मात करण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त आहे?

  1. (1) विद्यार्थ्यांना वर्गात वाचन करण्यास उत्तेजन देणे
  2. (2) समुपदेशकाच्या मदतीने उच्चार उपचार करुन घेणे
  3. (3) खेळ सदृष्य उपक्रम करणे ज्यातून वर्गात मौखिक संभाषण करावे लागेल
  4. (4) विद्यार्थांच्या चुका त्या त्या वेळेलाच दुरुस्त करणे
See answer and solution
Q144

कादंबरी वाचणे, हे कशाचे उदाहरण आहे?

  1. (1) विस्तृत वाचन
  2. (2) गहन वाचन
  3. (3) न्याहाळणे
  4. (4) चाळणे
See answer and solution
Q145

निबंधात ‘अवतरण’ वापरणे याचे प्राथमिक उद्दिष्ट कोणते?

  1. (1) निबंधाची शैली ठरवणे
  2. (2) गुंतागुंतीचा मुद्दा स्पष्ट करणे
  3. (3) लेखकाचा दृष्टिकोण मांडणे
  4. (4) एखाद्या माहितीचे विश्लेषण करणे
See answer and solution
Q146

इयत्ता आठवीची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक लेख देते. या लेखाचा दर्जा त्यांच्या पातळीपेक्षा किंचित वरचा आहे. विद्यार्थ्यांनी त्या संबंधाने अनेक उपक्रम करायचे आहेत. या उपक्रमाला काय म्हणता येईल?

  1. (1) कल्पनाबंध/सिद्धांत शिकणे (Learning hypothesis)
  2. (2) अनाकलनीय आदान (Incomprehensible inputs)
  3. (3) वाचन आकलन (Reading comprehension)
  4. (4) आकलनीय आदान (Comprehensible inputs)
See answer and solution
Q147

व्याकरणाचे शिक्षण प्रामुख्याने कोणत्या बाबतीत उपयुक्त ठरते?

  1. (1) ओघवता
  2. (2) अचूकता
  3. (3) साक्षरता
  4. (4) अंकसाक्षरता
See answer and solution
Q148

व्याकरण शिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना संभाषण करण्यास प्रवृत्त करणे. पुढीलपैकी कोणती कृती या उद्दिष्टाशी सुसंगत नाही?

  1. (1) विद्यार्थ्यांचे व्याकरणाच्या प्रत्येक घटकावर प्रभुत्व असणे.
  2. (2) विद्यार्थ्यांना अशा प्रकट सूचनांची आवश्यकता असते ज्यातून व्याकरणिक घटकांची व्यापक संभाषण संदर्भाशी सुसंगती लागते.
  3. (3) विद्यार्थ्यांनी तितक्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत ज्या तात्पुरत्या संभाषणास आवश्यक असतात.
  4. (4) चुका दुरुस्त करणे ही शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी नाही.
See answer and solution
Q149

वाचनात ‘शब्दार्थ मीमांसा संकेत’ मदतरूप ठरतात.

  1. (1) शब्दाची उकल करण्यात
  2. (2) शब्दाच्या अचूक उच्चारणात
  3. (3) अर्थलावण्याच्या प्रक्रियेला मद्‌तरुप ठरते
  4. (4) व्याकरणिक प्रारुप समजून घेण्यासाठी
See answer and solution
Q150

भाषा अध्ययन-अध्यापनाची कोणती पद्धती असे मानते की ‘भाषा ही एक सवय’ आहे?

  1. (1) संभाषणात्मक भाषा शिक्षण
  2. (2) सहकारी भाषा शिक्षण
  3. (3) नैसर्गिक पद्धती
  4. (4) श्राव्यभाषिकता
See answer and solution