उताऱ्याप्रमाणे पुढीलपैकी कोणती बाब घराला लागू होत नाही?
- (1) बंदिस्त
- (2) सुरक्षित
- (3) सामुहिक
- (4) खाजगी
सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
घर म्हणजे माणसांचं, कुटुंबाचं प्रतिबिंबं! माणसाच्या जगण्याला आकृतिबंध देणारी एक रचनाच! सतत बदलत राहणाऱ्या माणूसवृतीचं एक प्रतीकच! माणसाच्या स्वभावानुसार घराचा चेहरा दिसतो. घर माणसांशी इतकं एकरुप होत असतं की घराला माणसाचा चेहरा बरोबर ठाऊक असतो. माणूस घराच्या उंबऱ्याबाहेर पडला की त्याला एक अदृश्य बुरखा धारण करावा लागतो. घरात प्रवेश करताना मात्र माणसाचा बुरखा आपोआप गळून पडतो. माणूस घरात बुरखा घालून राहू शकत नाही. मला नेहमी असं वाटतं की घर नुसतं निवारा, संरक्षण, विश्राम अन् स्थैर्य देत नाही तर खऱ्या चेहऱ्याने काही काळ जगता येणं ही माणसाची गरज देखील घर पूर्ण करतं. माणसाला जगण्याची ओळख आणि त्या जगण्याला एक चौकट मिळते ती घरामुळेच.
घर! माणसाच्या जिवाभावाचा मित्र! माणसाच्या संस्कृतीचं एक प्रतीक! माणसाच्या प्राचीन काळापासूनच्या जीवनशैलीचा महत्त्वाचा साक्षीदार! त्याच्या गरजांप्रमाणे, सवयींप्रमाणे आणि लहरीप्रमाणे निरंतर बदलत आलेला! निसर्गातला प्रत्येक प्राणी कळपात राहतो. जिथे त्याचा कळप जातो तिथे त्याचं घर असतं. प्राण्यांना आडोसा लागत नाही, भिंत लागत नाही पण मनुष्यप्राण्याला मात्र त्याच्या भटक्या काळातही निवारा हवा असे, आसरा हवा असे. समुहात तो त्याला मिळतही असे. समूहात त्याला सुरक्षितही वाटत असे पण शेतीचा शोध लागला, जमिनीचं महत्त्व समजलं, कुटुंबभावना निर्माण झाली आणि मग ते जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी ‘घर’ ह्या बंदिस्त, सुरक्षित आणि ‘खाजगी’ वास्तूची निर्मिती झाली आणि मग न हलणाऱ्या, न बदलणाऱ्या, दणकट, कायमस्वरूपी घराचा जन्म झाला. पशू-पक्षी हे अन्नपाण्याच्या शोधात फिरतात आणि तिथेच वास्तव्य करतात पण माणूस मात्र त्याला हवं तिथे आधी घर बांधतो, त्याला हवं ते अन्न आणि पाणी तो घरात आणून ठेवतो. तो घराजवळ पाणी निर्माण करतो. अन्नधान्य, भाजीपाला, फळं हे सारं काही तो त्याला हवं त्या पद्धतीने मिळवतो, जमवतो आणि साठवून ठेवतो ते घरामुळे! घर म्हणजे माणसाला सांभाळणारा, सावरणारा आणि गोंजारणारा मित्र! त्याला निवारा अन् संरक्षण देणारा वास्तुपुरुष अन् असंख्य भावनांचा अनुभव देणारा भावसखा.
उताऱ्याप्रमाणे पुढीलपैकी कोणती बाब घराला लागू होत नाही?
CBSE answer: (3)
उत्तर: (3) सामुहिक
सावधान: प्रश्न ‘लागू होत नाही’ असा आहे; उताऱ्यात आलेले तीन शब्द वगळा.