लेखकाला श्रावणाचे अस्तित्व कशामुळे जाणवत होते?
- (1) मावळत्या सूर्यकिरणांमुळे
- (2) ओलसर प्रसन्नतेमुळे
- (3) मखमली दुलईमुळे
- (4) हिरव्या माळरानामुळे
सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
आषाढातला तो पहिलाच दिवस होता. श्रावणसरींच्या स्पर्शाने हिरवी मखमली दुलई ल्यालेली धारा सूर्याच्या मावळत्या किरणांनी फार लोभस दिसत होती. मंद वारा वाहत होता. सर्वत्र भरून राहिलेली ओलसर प्रसन्नता नुकताच निरोप दिलेल्या श्रावणाच्या अस्तित्वाची आठवण करून देत होती. त्याच परिसरात हिरव्यागार माळरानावर तितक्याच हिरवाईने ओथंबलेली एक लहानशी टेकडी दिसली. टेकडीवरती एका बाजूने उंचावलेली एक दरड मावळतीचे सूर्यकिरण झेलत अशी झोकात उभी होती की, तिला ओलांडून मला पुढे जाववेना. खाली उतरण्याचा मोह मला पुढे सरकू देईना. तसाच खाली उतरलो. त्या दणकट दरडीला माझ्या दीर्घ अन् सामर्थ्यवान् बाहूंनी धरून ठेवत तिला टक्कर देण्यातला आनंद लुटू लागलो. त्या दरडीवर पाय ठेवून सर्वत्र एकदा नजर फिरवली. सूर्यास्ताच्या किरणांचा सोनेरी लेप मिरवणारी ती टेकडी मला एखाद्या सम्राटाच्या राजसिंहासनासारखी भासली. भ्रमंतीचा सारा शीण क्षणात दूर झाला अन् आता इथेच जरा विसावा घ्यावा, असा विचार करत असतानाच त्या टेकडीवर उभा असलेला, माझ्याकडे एकटक नजरेने बघत असलेला एक मानव माझ्या दृष्टीस पडला. दुःखाने विदीर्ण झालेल्या त्या मानवाला ना त्याच्या देहाची शुद्ध होती, ना त्याच्या वस्त्रांची! दुःखाने सैरभैर झालेल्या त्या माणसाच्या मनातलं काहूर त्याच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झालं होतं. माझ्या नुसत्या दर्शनानेच त्याच्या हळव्या अंतःकरणाचा बांध फुटला होता. त्याच्या व्याकूळ नेत्रांमधल्या अश्रुपटलांनी मला तिथेच खिळवून ठेवलं. मानवी भावभावनांच्या गुंत्यात कधीही न अडकणाऱ्या मला त्या घनव्याकूळ डोळ्यांनी तिथेच अडवून ठेवलं अन् त्याच क्षणी पृथ्वीवरील मानवाच्या भावनांशी असलेल्या माझ्या नात्याचा प्रवास सुरू झाला. कुबेराने तडीपार केलेला तोच तो अलकानगरीतला यक्ष होता. विरहवेदनेने विद्ध झालेला-करुणार्त! रामगिरीवर बरसणाऱ्या श्रावणसरींनी आधी त्याला भिजवलं असेल, त्या रेशमी जलधारांनी त्याच्या मनःपटलावर असंख्य इंद्रधनुष्यही उमटवली असतील; प्रिय पत्नीच्या आठवणींचं हिरवंगार मोरपीस त्याच्या मनात थरारलं असावं! अशा वेळी अचानक सामोऱ्या आलेल्या मला पाहून यक्षाला काय वाटलं असेल बरं?
लेखकाला श्रावणाचे अस्तित्व कशामुळे जाणवत होते?
CBSE answer: (2)
उत्तर: (2) ओलसर प्रसन्नतेमुळे
सावधान: मखमली दुलई आणि मावळती सूर्यकिरणे यांचे वर्णन धरेच्या सौंदर्याबद्दल आहे, श्रावणाच्या आठवणीबद्दल नाही.