By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 15 Dec 2024 Paper 2 Marathi, Question 104

Topic: Grammar

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरतीं
फुलराणी ही खेळत होती
गोड निळ्या वातावरणांत
अव्याज मनें होतीं डोलत
प्रणयचंचला त्या भ्रूलीला
अवगत नव्हत्या कुमारिकेला
आईच्या मांडीवर बसुनी
झोंके घ्यावे, गावीं गाणीं
याहुनि ठावें काय तियेला
साध्या भोळ्या फुलराणीला

पुरा विनोदी संध्यावात
डोलडोलवी हिरवें शेत
तोंच एकदां हांसत आला
चुंबून म्हणे फुलराणीला
“छान माझी सोनुकली ती
कुणाकडे ग पाहत होती?
कोण बरें त्या संध्येंतून
हळुच पाहते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा
आवडला अमुच्या राणींना?”
लाजलाजली या वचनांनीं
साधी भोळी ती फुलराणी!

Q104

फुलराणीच्या संदर्भात कवीने वापरलेला ‘प्रणयचंचला’ हा शब्द काय आहे?

  1. (1) विशेषणCorrect answer
  2. (2) सर्वनाम
  3. (3) शब्दयोगी अव्यय
  4. (4) विशेषनाम

Solution.

CBSE answer: (1)

उत्तर: (1) विशेषण

  1. ‘प्रणयचंचला’ म्हणजे प्रणयाने चंचल झालेली.
  2. हा शब्द ‘भ्रूलीला’ (भुवयांचे नखरे) यांचे वर्णन करतो, म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती देतो.
  3. नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द विशेषण असतो.

सावधान: (4) विशेषनाम हे व्यक्ती किंवा स्थळाचे नाव असते, ते इथे नाही.